Corona Series Part 42
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, आणि सामाजिक वर्तुळाची निर्मिती
मानवाच्या
उत्क्रांतीच्या काळापासून आधुनिक मानवा पर्यन्तच्या प्रवासात मानव जातीत बरेच बदल
घडत गेले, परंतु काही बाबतीत अजूनही साधर्म
आहे, जंगलात राहतान मानवाला कळपात
राहण्यास आवडे आणि आजही लोकांनमध्ये मिळून मिसळून राहायला मानव जास्त पसंती देतो व
आपले सामाजिक वर्तुळ तयार करतो. या लॉकडाउनमुळे हे सामाजिक वर्तुळाचे आकुंचन झाले.
त्यात देखील बरेच लोक आपल्या कुटुंबापासून दूर गावी अडकले आहेत आणि म्हणूनच
त्यांना एकटेपणाची जाणीव होऊन आपल्या कौटुंबिक वर्तुळामध्ये येण्यासाठी प्रयत्न
करत आहेत. जे कुटुंबामध्ये आहेत ते कुटुंबासोबात सकारात्मक वेळ देत आहेत. काही आहे
तिथे थांबण्याची मानसिकता करून नवीन वर्तुळामध्ये सामावून जात आहेत.
बदलत
चाललेल्या संस्कृतीमुळे काही ठिकाणी कौटुंबिक वर्तुळामध्ये राहणे नकोसे झाले आहे.
वर्क फ्रॉम होम सांभाळत मुलांना शिकवणे त्यांचा अभ्यास (शाळा कॉलेज बंद), लहान मुलाना खेळण्यास बंदी बाहेर जाण्यास मनाई, घरातील मोठ्या लोकांची सेवा, घरकाम, काही ठिकाणी नात्यांमद्धे निर्माण
झालेले सोशल डिस्टन्स मोडून क्वारनटाईन झाल्यामुळे बर्याच रहस्यमय कथा उलघडत आहेत
त्यातून पुढे isolation ची वेळ येऊ शकेल. अशी कधी न केलेल्या
कामा सोबत करमणुकीच्या सगळ्या गोष्टी बंद आहेत (Pub, Resto, travel, Movi, bar, etc). या मुळे सामाजिक, मानसिक आरोग्याचे विषय समोर येऊ लागले आहेत. अश्या दोन्ही बाजू असल्या तरी प्रत्येक व्यति
स्वतचे असे सामाजिक वर्तुळ बाळगतो, त्यात कोण असावे
कोण नसावे हे तो स्वत: ठरवू शकतो. परंतु या कोरणामुळे हे सामाजिक वर्तुळ कसे असावे, कुणा सोबात आसवे अश्या गोष्टी जर सरकार ठरवणार असेल
तर आपणास रूचणार नाही. परंतु जगात काही देशातील सरकारे काही दिवसासाठी असे कठोर निर्णय
घेणायचा विचारानभूत आहे.
न्यूझीलंड
देशात मागील ३ दिवसात १ ही कोरोंनाचा रुग्ण आढळून आला नाही. आता पर्यन्त १४७९
बाधित तर फक्त १९ मृत्यू झाले आहेत. या देशात ही आधुनिक तंत्रज्ञान, योग्य वेळी लॉक डाउन, अधिक तपासणी आणि मर्यादित लोकसंख्या ईत्यादी जमेच्या बाजू
ठरल्या, महाराष्ट्रा मधील नागपुर जिल्हाची लोकसंख्या (४६-४७
लाख) ईतकी संपूर्ण न्यूझीलंड देशाची लोकसंख्या (४६ लाख) आहे. न्यूझीलंड कोरोना मुक्त झाले नसले
तरी सामुदायिक हस्तांतरण थांबले आहे म्हणून मा.पंतप्रधान Jacinda Ardern यांची जागतिक स्थरावर प्रशंसा केली जाता आहे. कोरोना
नियंत्रणात आल्यामुळे आता लॉकडाउन शीथिल करून यातून बाहेर पडण्याची नियोजन चालू
झाले आहे. त्यासाठीची योजना आखताना
पंतप्रधानानी सामाजिक वर्तुळाचा उल्लेख केला.
लॉकडाउन शीथिल करताना कोरोनाची दुसरी लाट येऊ नये याचा विचार करून ठराविक
अटी समाजावर लादण्यात येणार आहे.
सरकारला
आपल्या सार्वजनिक उपक्रम कळवून मंजूरी घ्यावी लागेल. आपल्या शहरातील १० लोकांची
नावे कळवावी लागतील ज्यांना सोबात आपण लॉकडाउन नंतर मिळून मिसळून राहू शकाल. या
लोकांच्या व्यततिरिक्त आपण कुणालाही भेटू शकणार नाही. शहराच्या बाहेर प्रवास करता
येणार नाही. आपले आई, वडील आपल्या सोबत नसतील तर
त्यांना देखील आपल्याला ठराविक नियम,
अटीचे पालन कारून भेट घेता येईल. आता आपल्या सामाजिक वर्तुळा मधील १० लोकांची नावे
कळवने किती प्रश्नांना तोड फोडू शकेल मित्र, नातेवाईक, शेजारी, ऑफिस मधील सहकारी, मुलांचे दोस्त, आपले स्वतःचे की बायको कडचे असे कोणत्या लोकांची
यादी करणार एकाचे नाव घेतले तर (प्रत्येक्ष किवा अप्रत्येक्ष) दूसरा नाराज.
ऑस्ट्रेलियाचे
मा. पंतप्रधानानी ट्रान्स- टसमान प्रवासी वर्तुळ निर्माण करण्यात यावे असे म्हंटले
आहे. म्हणजे न्यूझीलंड –ऑस्ट्रेलिया मधील नागरिक ठराविक ठिकाणीच पर्यटनासाठी
व्यापारासाठी जाऊ शकतील ईतर कुठे नाही. ठराविक काळासाठी असे कठोर पाऊल उचलावे लागत
आहे, असाच लॉकडाउन शिथिल कारण्याचा
न्यूझीलंड सारखा विचार स्कॉटलंड, बेल्जियम सारखे
यूरोपियन देश करत आहेत. कॅनडा मध्ये २ कुटुंबाचे वर्तुळ निर्माण केल आहे.
असा
विचार भारतात करणे शक्य आहे का ! वरील सर्व देश हे लोकसंखेच्या मानाने छोटे आहेत
तिथिल तंत्रज्ञान, संस्कृती, राहणीमान सर्वच वेगळे आहे. भारतीय नागरिकांचे सामाजिक आणि कौटुंबिक वर्तुळ
खूपच मोठे आहे. लॉकडाउन नंतर भारतीय समाजाला अश्या आकुंचीत सामाजिक वर्तुळामध्ये
बाधून ठेवने शक्य नाही. परंतु भारतीय नागरिकांनी समजून घेऊन, पुढे काही काळ स्वत:च्या मनाशी पक्का विचार करून
गरजे पुरता आपले सामाजिक वर्तुळ मर्यादित ठेवले तर असे नियम व अटी घालाव्याच
लागणार नाही. या व्यतिरिक्त दुसरी पर्याई व्यवस्था शोधून काढली पाहिजे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
Nice information sir 👍👍 thanks sir 👍
ReplyDeleteIt's very difficult in India
ReplyDelete