Skip to main content

Corona Series Part 42 : कोरोना, आणि सामाजिक वर्तुळाची निर्मिती

Corona Series Part 42
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोना, आणि सामाजिक वर्तुळाची निर्मिती

मानवाच्या उत्क्रांतीच्या काळापासून आधुनिक मानवा पर्यन्तच्या प्रवासात मानव जातीत बरेच बदल घडत गेले, परंतु काही बाबतीत अजूनही साधर्म आहे, जंगलात राहतान मानवाला कळपात राहण्यास आवडे आणि आजही लोकांनमध्ये मिळून मिसळून राहायला मानव जास्त पसंती देतो व आपले सामाजिक वर्तुळ तयार करतो. या लॉकडाउनमुळे हे सामाजिक वर्तुळाचे आकुंचन झाले. त्यात देखील बरेच लोक आपल्या कुटुंबापासून दूर गावी अडकले आहेत आणि म्हणूनच त्यांना एकटेपणाची जाणीव होऊन आपल्या कौटुंबिक वर्तुळामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जे कुटुंबामध्ये आहेत ते कुटुंबासोबात सकारात्मक वेळ देत आहेत. काही आहे तिथे थांबण्याची मानसिकता करून नवीन वर्तुळामध्ये सामावून जात आहेत.
बदलत चाललेल्या संस्कृतीमुळे काही ठिकाणी कौटुंबिक वर्तुळामध्ये राहणे नकोसे झाले आहे. वर्क फ्रॉम होम सांभाळत मुलांना शिकवणे त्यांचा अभ्यास (शाळा कॉलेज बंद), लहान मुलाना खेळण्यास बंदी बाहेर जाण्यास मनाई, घरातील मोठ्या लोकांची सेवा, घरकाम, काही ठिकाणी नात्यांमद्धे निर्माण झालेले सोशल डिस्टन्स मोडून क्वारनटाईन झाल्यामुळे बर्‍याच रहस्यमय कथा उलघडत आहेत त्यातून पुढे isolation ची वेळ येऊ शकेल. अशी कधी न केलेल्या कामा सोबत करमणुकीच्या सगळ्या गोष्टी बंद आहेत (Pub, Resto, travel, Movi, bar, etc). या मुळे सामाजिक, मानसिक आरोग्याचे विषय समोर येऊ लागले आहेत.  अश्या दोन्ही बाजू असल्या तरी प्रत्येक व्यति स्वतचे असे सामाजिक वर्तुळ बाळगतो, त्यात कोण असावे कोण नसावे हे तो स्वत: ठरवू शकतो. परंतु या कोरणामुळे हे सामाजिक वर्तुळ कसे असावे, कुणा सोबात आसवे अश्या गोष्टी जर सरकार ठरवणार असेल तर आपणास रूचणार नाही. परंतु जगात काही देशातील सरकारे काही दिवसासाठी असे कठोर निर्णय घेणायचा विचारानभूत आहे.
न्यूझीलंड देशात मागील ३ दिवसात १ ही कोरोंनाचा रुग्ण आढळून आला नाही. आता पर्यन्त १४७९ बाधित तर फक्त १९ मृत्यू झाले आहेत. या देशात ही आधुनिक तंत्रज्ञान, योग्य वेळी लॉक डाउन, अधिक तपासणी आणि मर्यादित लोकसंख्या ईत्यादी जमेच्या बाजू ठरल्या, महाराष्ट्रा मधील नागपुर जिल्हाची लोकसंख्या (४६-४७ लाख) ईतकी संपूर्ण न्यूझीलंड देशाची लोकसंख्या (४६ लाख) आहे. न्यूझीलंड कोरोना मुक्त झाले नसले तरी सामुदायिक हस्तांतरण थांबले आहे म्हणून मा.पंतप्रधान Jacinda Ardern यांची जागतिक स्थरावर प्रशंसा केली जाता आहे. कोरोना नियंत्रणात आल्यामुळे आता लॉकडाउन शीथिल करून यातून बाहेर पडण्याची नियोजन चालू झाले आहे. त्यासाठीची योजना आखताना पंतप्रधानानी सामाजिक वर्तुळाचा उल्लेख केला.  लॉकडाउन शीथिल करताना कोरोनाची दुसरी लाट येऊ नये याचा विचार करून ठराविक अटी समाजावर लादण्यात येणार आहे.
सरकारला आपल्या सार्वजनिक उपक्रम कळवून मंजूरी घ्यावी लागेल. आपल्या शहरातील १० लोकांची नावे कळवावी लागतील ज्यांना सोबात आपण लॉकडाउन नंतर मिळून मिसळून राहू शकाल. या लोकांच्या व्यततिरिक्त आपण कुणालाही भेटू शकणार नाही. शहराच्या बाहेर प्रवास करता येणार नाही. आपले आई, वडील आपल्या सोबत नसतील तर त्यांना देखील आपल्याला ठराविक नियम, अटीचे पालन कारून भेट घेता येईल. आता आपल्या सामाजिक वर्तुळा मधील १० लोकांची नावे कळवने किती प्रश्नांना तोड फोडू शकेल मित्र, नातेवाईक, शेजारी, ऑफिस मधील सहकारी, मुलांचे दोस्त, आपले स्वतःचे की बायको कडचे असे कोणत्या लोकांची यादी करणार एकाचे नाव घेतले तर (प्रत्येक्ष किवा अप्रत्येक्ष) दूसरा नाराज.
ऑस्ट्रेलियाचे मा. पंतप्रधानानी ट्रान्स- टसमान प्रवासी वर्तुळ निर्माण करण्यात यावे असे म्हंटले आहे. म्हणजे न्यूझीलंड –ऑस्ट्रेलिया मधील नागरिक ठराविक ठिकाणीच पर्यटनासाठी व्यापारासाठी जाऊ शकतील ईतर कुठे नाही. ठराविक काळासाठी असे कठोर पाऊल उचलावे लागत आहे, असाच लॉकडाउन शिथिल कारण्याचा न्यूझीलंड सारखा विचार स्कॉटलंड, बेल्जियम सारखे यूरोपियन देश करत आहेत. कॅनडा मध्ये २ कुटुंबाचे वर्तुळ निर्माण केल आहे.
असा विचार भारतात करणे शक्य आहे का ! वरील सर्व देश हे लोकसंखेच्या मानाने छोटे आहेत तिथिल तंत्रज्ञान, संस्कृती, राहणीमान सर्वच वेगळे आहे. भारतीय नागरिकांचे सामाजिक आणि कौटुंबिक वर्तुळ खूपच मोठे आहे. लॉकडाउन नंतर भारतीय समाजाला अश्या आकुंचीत सामाजिक वर्तुळामध्ये बाधून ठेवने शक्य नाही. परंतु भारतीय नागरिकांनी समजून घेऊन, पुढे काही काळ स्वत:च्या मनाशी पक्का विचार करून गरजे पुरता आपले सामाजिक वर्तुळ मर्यादित ठेवले तर असे नियम व अटी घालाव्याच लागणार नाही. या व्यतिरिक्त दुसरी पर्याई व्यवस्था शोधून काढली पाहिजे.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...