Corona Series Part 41
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, आणि सिंगापूर मॉडेल
दक्षिण
पूर्व आशियाई देशातील एक बेटरूपी देश. भौगोलिक, व्यापारीक दृष्टीने चीनच्या जवळील देश असल्याने जगातील 3रा देश होता जिथे कोरोनाची लागण झाली. सिंगापूर
तंत्रज्ञानात प्रगत असणारा, मानवी विकास
निर्देशांकमध्ये 9 व्या आणि नोमिनल जीडीपी मध्ये 7 व्या स्थानावर आहे. पर्यटन, उद्योग,
शिक्षण, आरोग्य अश्या सर्वच क्षेत्रात
अग्रणी असून दरडोई उत्पन्नमध्ये प्रथम 5 मध्ये या देशाचे नाव नोंद आहे. ५६ ते ५८
लाख लोकसंखेमध्ये ७४% चीनी, १३% मलय, ९% भारतीय नागरिक आहेत. छोट्याशा लोकसंखेत देखील
सर्वच नागरिक मूळ सिंगापूरचे रहिवासी नाहीत. फक्त ६१% नागरिक हे कायम स्वरूपीचे
नागरिक असून, नोकरी निमित रहिवासी नागरिकत्व
असणारे ९% व परदेशी कर्मचारी २९% (१६लाख) आहेत. या २९%च्या आधारावरच सिंगापूर
प्रगती साधत आहे. परंतु याच कर्मचारी लोकांची कोरोना मुळे गैरसोय चालू असून
तंत्रज्ञान मानणारे सिंगापूर सरकारणे केलेल्या थोड्याश्या दुर्लक्षितपनामुळे
सुरवातीच्या काळातील यशवी सिंगापूर मॉडल सध्या मात्र अपयशी होण्याचा मार्गावर आले
आहे.
सुरवातीच्या
काळात सिंगापूर मॉडल यशवी ठरले त्याची काही प्रमुख कारणे म्हणजे २००३मध्ये आलेल्या
सार्स चा अनुभव पाठीशी असल्याने सरकारला कोरोनाचे गांभीर्य समजायला वेळ लागला नाही, त्यामुळे झटपट निर्णय घेतले गेले. चीन मध्ये
कोरोनाची सुरवात झाल्या झाल्या प्रवास बंदी करण्यात आली, तपासणी चाचणीवर भर देण्यात आला (१३०००/ १लाख लोक). संशयित व्यक्तींना घरीच
राहण्याची विनंती केली गेली. तसेच बाधित रुग्ण isolate करून उपचार करण्यात आले. Isolation, quarantine चालू असताना सरकारने लॉकडाउन केला नसून फक्त social distancing वर भर दिला. (०३ रुग्ण) जानेवारी पासून मार्च पर्यन्त (९२६ रुग्ण आणि ३ मृत्यू) कोरोना सिंगापूरमध्ये
नियंत्रित होता. हे सर्व सिंगापूर सरकार कसे करू शकले त्याचे कारण म्हणजे
आरोग्य सुविधा, तंत्रज्ञानातील प्रगति, आणि सर्वात महत्वाचे मर्यादित लोकसंख्या ही एक जमेची
बाजू ठरली, महाराष्ट्रा मधील पुणे जिल्हाची लोकसंख्या (५९ लाख)
संपूर्ण सिंगापूर देशापेक्षा (५६-५८लाख)
अधिक आहे.
एप्रिल
महिना आला आणि परिस्थिति बदलू लागली आज एप्रिलच्या प्रत्येक आठवड्यात कोरोना
बाधितांची संख्या १०००ने वाढत आहे. आज १६१६९ बाधित
झाले असले तरीही (१६) मृत्यूचे प्रमाण
अजूनही कमी आहे. अचानक संख्या वाढण्याचे कारण म्हणजे अती आत्मविशावस मुळे
योग्य वेळीलॉक डाउन न करणे. ७ एप्रिल रोजी
१ जून पर्यन्त लॉक डाउन घोषित केला गेला आहे म्हणजे पहिला रुग्ण अढल्यापासून
जवळपास ४ महिन्यांनी, योग्य वेळी १६लाख परदेशी कर्मचारी
यांच्या बाबतील सिंगापूर सरकारची दुय्यम भावना, हे सर्व कर्मचारी मुंबई मधील सेवा वस्ती (झोपड पट्टी) जसे लोक दाटीवाटीने
राहतात तसे सिंगापूर मध्ये चाळीत राहत आहेत. सरकारने फक्त मूळ नागरिकांच्या तपासणी
चाचण्या केल्या जे लोकसंखेचा ६१% आहेत परंतु २९% लोकसंख्या असणार्या, social distancing पाळू न शकणार्या लोकांची तपासणी
केली नाही. जागतिक आर्थिक घडामोडी मर्यादिल
झाल्यामुळे हा कर्मचारी वर्ग देसखील अडचणीत आला आहे अश्यावेळी या लोकांना योग्या
आरोग्य सुविधा दिली गेली नाही. या सर्व गोष्टीचा परिणाम आज सिंगापूर मध्ये रुग्ण
वाढीतून दिसू लागला आहे.
हळूहळू
संपूर्ण जगामधील लॉक डाउनचा कालावधी संपून पूर्वपदावर येऊ लागेल, तेव्हा जगताता १ जरी रुग्ण शिल्लक राहिला तरी पुन्हा
कोरोना सर्वत्र पसरू शकेल. सिंगापूर सरकारने वेळीच लॉक डाउन करून या कर्मचारी
वर्गाला देखील तेवडीच प्राथमिकता दिली असती तर आज ही वेळ आली नसती. हा कोरोना
कोण्या एका देशापुरता मर्यादित विषय नाही, हे सिंगापूरला कधी समजणार.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज
कोल्हापूर
Nice
ReplyDelete