Skip to main content

Corona Series Part 41 : कोरोना, आणि सिंगापूर मॉडेल


Corona Series Part 41
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, आणि सिंगापूर मॉडेल
दक्षिण पूर्व आशियाई देशातील एक बेटरूपी देश. भौगोलिक, व्यापारीक दृष्टीने चीनच्या जवळील देश असल्याने जगातील 3रा देश होता जिथे कोरोनाची लागण झाली. सिंगापूर तंत्रज्ञानात प्रगत असणारा, मानवी विकास निर्देशांकमध्ये 9 व्या आणि नोमिनल जीडीपी मध्ये 7 व्या स्थानावर आहे. पर्यटन, उद्योग, शिक्षण, आरोग्य अश्या सर्वच क्षेत्रात अग्रणी असून दरडोई उत्पन्नमध्ये प्रथम 5 मध्ये या देशाचे नाव नोंद आहे. ५६ ते ५८ लाख लोकसंखेमध्ये ७४% चीनी, १३% मलय, ९% भारतीय नागरिक आहेत. छोट्याशा लोकसंखेत देखील सर्वच नागरिक मूळ सिंगापूरचे रहिवासी नाहीत. फक्त ६१% नागरिक हे कायम स्वरूपीचे नागरिक असून, नोकरी निमित रहिवासी नागरिकत्व असणारे ९% व परदेशी कर्मचारी २९% (१६लाख) आहेत. या २९%च्या आधारावरच सिंगापूर प्रगती साधत आहे. परंतु याच कर्मचारी लोकांची कोरोना मुळे गैरसोय चालू असून तंत्रज्ञान मानणारे सिंगापूर सरकारणे केलेल्या थोड्याश्या दुर्लक्षितपनामुळे सुरवातीच्या काळातील यशवी सिंगापूर मॉडल सध्या मात्र अपयशी होण्याचा मार्गावर आले आहे.
सुरवातीच्या काळात सिंगापूर मॉडल यशवी ठरले त्याची काही प्रमुख कारणे म्हणजे २००३मध्ये आलेल्या सार्स चा अनुभव पाठीशी असल्याने सरकारला कोरोनाचे गांभीर्य समजायला वेळ लागला नाही, त्यामुळे झटपट निर्णय घेतले गेले. चीन मध्ये कोरोनाची सुरवात झाल्या झाल्या प्रवास बंदी करण्यात आली, तपासणी चाचणीवर भर देण्यात आला (१३०००/ १लाख लोक). संशयित व्यक्तींना घरीच राहण्याची विनंती केली गेली. तसेच बाधित रुग्ण isolate करून उपचार करण्यात आले. Isolation, quarantine चालू असताना सरकारने लॉकडाउन केला नसून फक्त social distancing वर भर दिला. (०३ रुग्ण) जानेवारी पासून मार्च पर्यन्त  (९२६ रुग्ण आणि ३ मृत्यू) कोरोना सिंगापूरमध्ये नियंत्रित होता. हे सर्व सिंगापूर सरकार कसे करू शकले त्याचे कारण म्हणजे आरोग्य सुविधा, तंत्रज्ञानातील प्रगति, आणि सर्वात महत्वाचे मर्यादित लोकसंख्या ही एक जमेची बाजू ठरली, महाराष्ट्रा मधील पुणे जिल्हाची लोकसंख्या (५९ लाख) संपूर्ण सिंगापूर देशापेक्षा  (५६-५८लाख) अधिक आहे. 
एप्रिल महिना आला आणि परिस्थिति बदलू लागली आज एप्रिलच्या प्रत्येक आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या १०००ने वाढत आहे. आज १६१६९ बाधित झाले असले तरीही (१६) मृत्यूचे  प्रमाण अजूनही कमी आहे. अचानक संख्या वाढण्याचे कारण म्हणजे अती आत्मविशावस मुळे योग्य वेळीलॉक डाउन न करणे.  ७ एप्रिल रोजी १ जून पर्यन्त लॉक डाउन घोषित केला गेला आहे म्हणजे पहिला रुग्ण अढल्यापासून जवळपास ४ महिन्यांनी, योग्य वेळी १६लाख परदेशी कर्मचारी यांच्या बाबतील सिंगापूर सरकारची दुय्यम भावना, हे सर्व कर्मचारी मुंबई मधील सेवा वस्ती (झोपड पट्टी) जसे लोक दाटीवाटीने राहतात तसे सिंगापूर मध्ये चाळीत राहत आहेत. सरकारने फक्त मूळ नागरिकांच्या तपासणी चाचण्या केल्या जे लोकसंखेचा ६१% आहेत परंतु २९% लोकसंख्या असणार्‍या, social distancing पाळू न शकणार्‍या लोकांची तपासणी केली नाही. जागतिक आर्थिक घडामोडी मर्यादिल झाल्यामुळे हा कर्मचारी वर्ग देसखील अडचणीत आला आहे अश्यावेळी या लोकांना योग्या आरोग्य सुविधा दिली गेली नाही. या सर्व गोष्टीचा परिणाम आज सिंगापूर मध्ये रुग्ण वाढीतून दिसू लागला आहे.
हळूहळू संपूर्ण जगामधील लॉक डाउनचा कालावधी संपून पूर्वपदावर येऊ लागेल, तेव्हा जगताता १ जरी रुग्ण शिल्लक राहिला तरी पुन्हा कोरोना सर्वत्र पसरू शकेल. सिंगापूर सरकारने वेळीच लॉक डाउन करून या कर्मचारी वर्गाला देखील तेवडीच प्राथमिकता दिली असती तर आज ही वेळ आली नसती. हा कोरोना कोण्या एका देशापुरता मर्यादित विषय नाही, हे सिंगापूरला कधी समजणार. 
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...