Corona Series Part 32
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, आणि वसुंधरा
22 एप्रिल 1970 पासून युनायटेड नेशनच्या मार्गदर्शनाखाली आजचा
दिवस आपण जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करतो. लॉकडाउनमुळे 50 वर्षामध्ये
प्रथमच वसुंधरा दिनावेळी मोठ्या प्रमाणात वसुंधरेला हानी होईल अश्या गोष्टी
मजबूरीने टाळल्या गेल्या. मजबूरीनेच कारण वसुंधरा दिन आहे म्हणून या आधी
प्रदूषण करणारे घटक या दिवशी प्रदूषण करायचे थांबले नव्हते, व्हाट्स up, फेसबूक वर एक पोस्ट टाकली की आपण प्रदूषण करायला मोकळे, अश्या प्रकारे आज पर्यन्त वसुंधरा, पर्यावरण ईत्यादी दिन साजरे होतता. मानवाच्या अश्या वागणुकीला
कंटाळून स्वत निसर्गानेच वसुंधरा दिन साजरा करायचे ठरवले आहे. लॉकडाउन होऊन बसलेल्या
मानवाला कमीतकमी वसुंधरा, पर्यावरण
दिन कसे साजरे करावेत हे दाखवून देत आहे.
आजचा कोरोनाच्या लॉकडाउनमुळे जगभरात
प्रदूषनाची पातळी 50%हून अधिक खाली आली आहे. नासा तसेच यूरोपियन स्पेस एजन्सिच्या
कोपरणीकस या उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रा मधून इटली मधील मिलान, लंबारटी, चीन मधील वुहाण, दक्षिण कोरियातील सेऊल मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत हवा प्रदूषणाचे
(NO2, SO2, CO2) प्रमाण 50% पेक्षा अधिक खाली आले
आहे व ओझोनची प्रत वाढली आहे. 2019च्या जानेवारी– फेब्रुवारीमध्ये चीनमधून 800 मिलियन टन CO2 वातावरणात येतो परंतु 2020 मध्ये त्याच
कालावधी मध्ये CO2चे प्रमाण 25% ने कमी होऊन 600 मिलियन टन वर आले आहे. 25% जगाच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट
आहे. कारण फक्त चीनमध्ये प्रदूषणामुळे होणार्या मृत्यू चे प्रमाण १०लाख/ प्रती वर्ष असे आहे. २००८ च्या आर्थिक मंदीमध्ये अश्या
प्रकारे प्रदूषण कमी प्रमाणात दिसून आले परंतु त्यानंतर झालेले नुकसान भरून काडण्यासाठी
२०१५ पर्यन्त कारखानदारांनी ४ पट उत्पादन वाढवले. त्यामुळे २००८ ते २०१५ प्रदूषणामध्ये भरपूर वाड झाली होती. 2019 च्या वर्ल्ड एयर क्वालिटी इंडेक्स मध्ये
जगभरातील 30 प्रदूषित शहरामधील 21 शहरे ही भारतात आहेत. लोकसंख्या, क्षेत्रफळ, आणि प्रदूषण या नुसार भारत हा बांगलादेश, पाकिस्तान, मोंगोलीय, अफगाणिस्थान नंतर पाचव्या स्थानावर आहे. हवेचे प्रदूषण कमी झाल्याने पंजाब मधील काही शहारामधुन
आज हिमालय दिसू लागला आहे. Central Polution Control Board आणि system
of Air Quality & Weather Forcasting Research (SAFAR) जे Earth Science मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. भारतातील
(मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बंगलोरे आणि पुणे) 5 प्रमुख शहरा मध्ये Perticulate Matter (PM2.5) आणि NO2चे प्रमाण 40-50% कमी आले आहे. NO2 प्रामुख्याने जीवाश्म ईंधनाच्या ज्वलनाने आणि कारखान्यामधील
चिमण्यानंमधून बाहेर पडतो. आज भारतभर रेल्वे, ईतर वाहतूक, औद्योगिक कामकाज बंद असलेने वातावरणात
नाट्यमय बदल झाला आहे. मागील 1 महिन्यात कोरोनाने फक्त 653 लोक दगावलेत परंतु NO2, SO2 मुळे मागील वर्षी 16,000 अस्थमाचे रुग्ण तयार झाले आहेत. असे अनेक आजार प्रदूषनामुळे होत आहेत.
या वसुंधरेवर असणारे नैसर्गिक साधनान मधील फक्त हवा प्रदुषणया विषयावर आपण चर्चा केली.
पानी, भूमीचे प्रदूषण, वृक्षतोड, वाइल्ड लाइफ ईत्यादी विषय अजून चर्चले
गेले नाहीत. या वर वेगळा लेख लिहायची गरज आहे.
कोरोनासारखा विषाणूच्या निमित्ताने झालेल्या
लॉकडाउनमुळे किवा,
२००८ मध्ये आलेल्या आर्थिकमंदी मध्ये
उद्योगधंदे बंद झाल्यामुळेच ही वसुंधरा प्रदुषणमुक्त वातावरणात मोकळा श्वास घेणार आहे
का! मानव वसुंधरेचा किवा पर्यावरणाचा विचार करणार आहे का! अश्या प्रश्नाचे उत्तर काय
असेल.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
Save earth
ReplyDeletehttps://ajinkya1030.blogspot.com/2020/04/corona-series-part-34.html?m=1
Delete