Skip to main content

Corona Series Part 32 : कोरोना, आणि वसुंधरा


Corona Series Part 32
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोना, आणि वसुंधरा                       
      22 एप्रिल 1970 पासून युनायटेड नेशनच्या मार्गदर्शनाखाली आजचा दिवस आपण जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करतो. लॉकडाउनमुळे 50 वर्षामध्ये प्रथमच वसुंधरा दिनावेळी मोठ्या प्रमाणात वसुंधरेला हानी होईल अश्या गोष्टी मजबूरीने टाळल्या गेल्या.   मजबूरीनेच कारण वसुंधरा दिन आहे म्हणून या आधी प्रदूषण करणारे घटक या दिवशी प्रदूषण करायचे थांबले नव्हते, व्हाट्स up, फेसबूक वर एक पोस्ट टाकली की आपण प्रदूषण करायला मोकळे, अश्या प्रकारे आज पर्यन्त वसुंधरा, पर्यावरण ईत्यादी दिन साजरे होतता. मानवाच्या अश्या वागणुकीला कंटाळून स्वत निसर्गानेच वसुंधरा दिन साजरा करायचे ठरवले आहे. लॉकडाउन होऊन बसलेल्या मानवाला कमीतकमी वसुंधरा, पर्यावरण दिन कसे साजरे करावेत हे दाखवून देत आहे.
      आजचा कोरोनाच्या लॉकडाउनमुळे जगभरात प्रदूषनाची पातळी 50%हून अधिक खाली  आली आहे. नासा तसेच यूरोपियन स्पेस एजन्सिच्या कोपरणीकस या उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रा मधून इटली मधील मिलान, लंबारटी, चीन मधील वुहाण, दक्षिण कोरियातील सेऊल मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत हवा प्रदूषणाचे  (NO2, SO2, CO2) प्रमाण 50% पेक्षा अधिक खाली आले आहे व ओझोनची प्रत वाढली आहे. 2019च्या जानेवारी– फेब्रुवारीमध्ये चीनमधून 800 मिलियन टन CO2 वातावरणात येतो परंतु 2020 मध्ये त्याच कालावधी मध्ये CO2चे प्रमाण 25% ने कमी होऊन 600 मिलियन टन वर आले आहे. 25% जगाच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. कारण फक्त चीनमध्ये प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यू चे प्रमाण १०लाख/ प्रती वर्ष असे आहे. २००८ च्या आर्थिक मंदीमध्ये अश्या प्रकारे प्रदूषण कमी प्रमाणात दिसून आले परंतु त्यानंतर झालेले नुकसान भरून काडण्यासाठी २०१५ पर्यन्त कारखानदारांनी ४ पट उत्पादन वाढवले. त्यामुळे २००८ ते २०१५ प्रदूषणामध्ये भरपूर वाड झाली होती.  2019 च्या वर्ल्ड एयर क्वालिटी इंडेक्स मध्ये जगभरातील 30 प्रदूषित शहरामधील 21 शहरे ही भारतात आहेत. लोकसंख्या, क्षेत्रफळ, आणि प्रदूषण या नुसार भारत हा बांगलादेश, पाकिस्तान, मोंगोलीय, अफगाणिस्थान नंतर पाचव्या स्थानावर आहे. हवेचे प्रदूषण कमी झाल्याने पंजाब मधील काही शहारामधुन आज हिमालय दिसू लागला आहे. Central Polution Control Board आणि system of Air Quality & Weather Forcasting Research (SAFAR) जे Earth Science मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. भारतातील (मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बंगलोरे आणि पुणे) 5 प्रमुख शहरा मध्ये Perticulate Matter (PM2.5) आणि NO2चे प्रमाण 40-50% कमी आले आहे. NO2 प्रामुख्याने जीवाश्म ईंधनाच्या ज्वलनाने आणि कारखान्यामधील चिमण्यानंमधून बाहेर पडतो. आज भारतभर रेल्वे, ईतर वाहतूक, औद्योगिक कामकाज बंद असलेने वातावरणात नाट्यमय बदल झाला आहे. मागील 1 महिन्यात कोरोनाने फक्त 653 लोक दगावलेत परंतु NO2, SO2 मुळे मागील वर्षी 16,000 अस्थमाचे रुग्ण तयार झाले आहेत. असे अनेक आजार प्रदूषनामुळे होत आहेत. या वसुंधरेवर असणारे नैसर्गिक साधनान मधील फक्त हवा प्रदुषणया विषयावर आपण चर्चा केली. पानी, भूमीचे प्रदूषण, वृक्षतोड, वाइल्ड लाइफ  ईत्यादी विषय अजून चर्चले गेले नाहीत. या वर वेगळा लेख लिहायची गरज आहे.
      कोरोनासारखा विषाणूच्या निमित्ताने झालेल्या लॉकडाउनमुळे किवा, २००८ मध्ये आलेल्या आर्थिकमंदी मध्ये उद्योगधंदे बंद झाल्यामुळेच ही वसुंधरा प्रदुषणमुक्त वातावरणात मोकळा श्वास घेणार आहे का! मानव वसुंधरेचा किवा पर्यावरणाचा विचार करणार आहे का! अश्या प्रश्नाचे उत्तर काय असेल.   
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...