Corona Series Part
18
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न
करत आहे.
कोरोना आणि Cytokine Stroms
New York Times या वृतपत्रात एक
बातमी The Corona Virus Patients Betrayed by Their Own Immune
system शक्यतो शीर्षक वाचून नेमका काय म्हणायचा आहे हे
आपल्याला उमगल नसेल. तर सरळ सोप्या भाषेत सांगायच म्हणजे आपणच आपल्या पायावर
धोंडा मारून घेणे. आता मनात प्रश्न पडला असेल ते कस काय? पाहूया चला.
जन्म
आणि मृत्यू हे एक असे चक्र आहे, जे अविरत चालू राहते. ज्या व्यक्तीने जन्म घेतला त्याचा मृत्यू निश्चित आहे. जन्म
झाल्या पासून मनुष्य बर्याच अवस्था पार करत शेवटी वृद्धापकाळा जातो आणि
वृद्धापकाळा शरीर क्षीण झाल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. हे मृत्यु चे नैसर्गिक
कारण झाले. आज च्या जगत ह्या नैसर्गिक कारणामुळे होणर्य मृत्यू पेक्षा अनैसर्गिक
कारणेच जास्त आहेत. त्यातील आजच्या वेळेतील मोठ कारण म्हणजे करोना विषाणू, या विषाणू मुळे माणूस मरतो कसा
नेमका कारण काय असेल!
कोरोंनाच्या
संक्रमणामुळे मृत्यू होण्याची कारणे अनेक आहेत आपले फुफुस निकामी होते. फुफुस हे एका लोहारच्या भात्या सारखा काम करत असते.
करोना विषाणू मुळे फुफुसाचे ह्या भात्या सारखे काम करण्याची शक्ति कमी होऊ लागते
आणि त्याची लवचिकता कमी होते त्यामुळे शरीरात पुरेसा प्राणवायू मिळत नाही आणी
आपल्या पेशी प्राणवायू शिवाय जिवंत राहू शकत नाहीत आणि आपला शरीराचा शेवट प्राणवायू
न मिळाल्याने होतो. त्याचप्रमाणे तसेच आपल्याच रोगप्रतिकार शक्ति मध्ये झालेल्या
बिघाडामुळे देखील आपला मृत्यु होऊ शकतो. Cytokine Stroms (वादळ) असे त्याला वैद्यकीय भाषेत म्हंटलं जाता. सायटोकीन चे वादळ आपल्या
शरीरामध्ये इतर आजार मध्ये देखील येतता. त्या बाबतीत आज थोड जाणून घेऊया.
शरीराची
रोगप्रतिकार शक्ति काय असते ? ते काशी काम करते? त्याचे घटक कोणत हे आपण Corona Series Part 13 जाणून घेतला आहे. संदर्भ द्यावा लागतो कारण ह्या सगळी
गोष्टी एकमेकाशी जोडलेल्या आहेत. आपण जर भारतीय आर्मी ची यंत्रणा पहिली तर त्यात
विविध बटालियन आहेत 3 वेगवेगळी दल आहेत त्या प्रमाणे रोगप्रतिकार शक्ति मध्ये
देखील काही विभागणी केली गेली आहे. प्लाजमा, लाल आणि पांढर्या (सैनिक) रक्त पेशी तसे अनेक पेशी
आहेत. प्रामुख्याने पांढर्या पेशी 5 प्रकारात मोडतात त्या Neutrophils, Lymphocytes, Eosinophils, Monocytes आणि Basophils. ह्या सर्वांचे काम
असतं ते म्हणजे शरीरात येणार्या कोणताही विषाणू, जिवाणू, किटानू, ह्यांना मारून टाकणे तसेच शरीरातील मृत पेशी किवा बिघाड झालेल्या पेशी यांचे
कार्य स्थगित करणे किवा त्यांची योगी ती विलेवाट लावणे. हे सगळे काम करत असताना
रोगप्रतीकरक शक्तिमधील ह्या सर्व घटकाचे नियोजन सुसूत्रता असवी लागते आणि त्यासाठी
सूचना द्यावी लागते हे काम सुधा ह्या पांढर्या पेशीचा गट करत असतो. हे करत
असतातना इथे पेशींचा समुहामध्ये मध्ये सायटोकीनची मात्रा वाढते. हे सायटोकीन
म्हणजे एक प्रकारचे प्रोटीन आहे. ह्या सायटोकीन च्या तयार होण्यामुळे सर्व सैनिक पेशीन
मध्ये सुसूत्रता येते योग्य सूचना दिल्या जातता आणि सारे मिळून ह्या विषाणूला रोखण्याचा
प्रयत्न केला जातो.
आता
बिघाड कुठे होतो तर जेव्हा आपल्या सैन्याला आपला शत्रू कश्या प्रकारचा आहे त्याचाकडे
कोणती साधन आहेत, संख्या किती आहे, युद्ध कुठे करायचे, अश्या कोणत्याही गोष्टी ची कल्पना नसते तेव्हा आपल्या रोगप्रतिकार शक्ति
मध्ये अधिक मात्रा मध्ये हे सायटोकिन तयार होऊ लागले आणि ते साठायला लागत. जेव्हा
करोना विषाणू चे संक्रमण होते तेव्हा हा विषाणू आपल्या फुफुसा मध्ये जाऊन बसतो आणि
अधिक प्रमाणात mucus तयार करायला लागतो तो इतक्या अधिक प्रमाणात होतो की फुफुसा मध्ये साठायला
लागतो पण ह्या मुळे माणसाचा मृत्यू होत नाही फक्त त्याला प्राणवायू ची कामतरता
होते आणि मग दमल्या सारखे होणे, श्वास घेण्यास अडथळा होतो, चपळता कमी होते. ही लक्षणे शरीरात दिसू लागल्यावर रोगप्रतीकरक शक्तिची
प्रतिक्रिया येते ह्या गोष्टींना मज्जाव करण्यासाठी आपल्या सैनिक पेशी प्रतिकार
करायला लागतात पण त्यांना हे माहीत नसत की विषाणू कुठे, कसा, किती प्रमाणात आहे त्यामुळे सैनिक पेशी फक्त हल्ला करत राहतात त्यातून ह्या सायटोकीनचे
प्रमाण आपल्या फुफुसामध्ये अधिक वाढायला लागते तेव्हा माणसाला प्रचंड वेदना होऊ
लागतात. आणि कधी कधी ह्या मुळे माणसाचा मृत्यू होतो. म्हणजे प्रतेक वेळी ह्या cytokine storm मुळेच मृत्यू होतो असे नाही. (COVID-19: consider cytokine storm syndromes and
immunosuppression. Meheta. P Lancet. 2020, 395(10229), 1033-1034). वुहाण मध्ये
झालेल्या एक अभ्यासा नुसार करोना ची लागण झालेल्या 150 रुग्ण मध्ये अश्या प्रकारे
मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे (Clinical predictors of mortality
due to COVID-19 based on an analysis of data of 150 patients from Wuhan, China. Ruan Q:, Intensive Care Med. 2020). उदाहरण द्यावयाचे झाल्यास HIV झालेल्या माणसाना क्षय रोगाची
लागण होते आणि त्याचा मृत्यू होतो तेव्हा मृत्यू चे कारण हे क्षय आजार सागीतले
जाते एचआयव्ही नाही पण प्रत्येक एचआयव्हीच्या रुग्णाल क्षय होऊन तो त्याच आजाराने मरेल अस नाही.
एक
सर्वे नुसार करोना विषणूचा लागण मुळे मृत्यू चे प्रमाण हे फक्त 1% आहे त्यात सुधा
जर रोगप्रतीकरक शक्ति मधील नियोजन, सुसूत्रता आणि सुचनाचा अभावमुळे माणसाचा मृत्यू होत असेल तर आज शास्त्रज्ञ आणि
संशोधक यान नक्कीच ह्या बाबतीत विचार करावा लागेल. आणि आपल्या रोगप्रतिकारशक्ति
मुळे आपला मृत्यू होऊ नये या साठी काही उपाय योजना असणारी यंत्रणा उभी करावी
लागेल. अर्थातच रोगप्रतिकार शक्तिमध्ये बिघाड हा करोना विषाणू चे शरीरात होणार्या
शिरकवा मुळेच होता परंतु भविषात असे संक्रमण होत राहणार आहे आज कोविड 19 उद्या 20 असे.
हे थांबवता येणार नाही पण आपली रोगप्रतिकार शक्ति चे काम मात्र आपण सुधारू शकू हे नक्की.
त्या करिता Novarties आणि Incyte ह्या दोन कंपनी आता सध्या ह्या
साईटोकिन चे शरीरात येणार्या वादळाला रोखण्यासठी औषध शोधून काढत आहे त्या औषधाचे
नाव आहे JAKAVI (जाकावी) आपण आशा करू की हे औषध
लकरत लवकर सुरक्षित रित्या बाजारात
येवो.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Reference
1] doi:
10.1016/S0140-6736(20)30628-0.
2] doi:
10.1007/s00134-020-05991-x.
Kai kai hotaoy sharirat
ReplyDeleteits very informative blog
ReplyDelete