Skip to main content

Corona Series Part 18 : कोरोना आणि Cytokine Stroms


Corona Series Part 18
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना आणि Cytokine Stroms
      New York Times या वृतपत्रात एक बातमी The Corona Virus Patients Betrayed by Their Own Immune system शक्यतो शीर्षक वाचून नेमका काय म्हणायचा आहे हे आपल्याला उमगल नसेल. तर सरळ सोप्या भाषेत सांगायच म्हणजे आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेणे. आता मनात प्रश्न पडला असेल ते कस काय? पाहूया चला.
      जन्म आणि मृत्यू हे एक असे चक्र आहे, जे अविरत चालू राहते. ज्या व्यक्तीने जन्म घेतला त्याचा मृत्यू निश्चित आहे. जन्म झाल्या पासून मनुष्य बर्‍याच अवस्था पार करत शेवटी वृद्धापकाळा जातो आणि वृद्धापकाळा शरीर क्षीण झाल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. हे मृत्यु चे नैसर्गिक कारण झाले. आज च्या जगत ह्या नैसर्गिक कारणामुळे होणर्‍य मृत्यू पेक्षा अनैसर्गिक कारणेच जास्त आहेत. त्यातील आजच्या वेळेतील मोठ कारण म्हणजे करोना विषाणू, या विषाणू मुळे माणूस मरतो कसा नेमका कारण काय असेल!
      कोरोंनाच्या संक्रमणामुळे मृत्यू होण्याची कारणे अनेक आहेत आपले फुफुस निकामी होते. फुफुस  हे एका लोहारच्या भात्या सारखा काम करत असते. करोना विषाणू मुळे फुफुसाचे ह्या भात्या सारखे काम करण्याची शक्ति कमी होऊ लागते आणि त्याची लवचिकता कमी होते त्यामुळे शरीरात पुरेसा प्राणवायू मिळत नाही आणी आपल्या पेशी प्राणवायू शिवाय जिवंत राहू शकत नाहीत आणि आपला शरीराचा शेवट प्राणवायू न मिळाल्याने होतो. त्याचप्रमाणे तसेच आपल्याच रोगप्रतिकार शक्ति मध्ये झालेल्या बिघाडामुळे देखील आपला मृत्यु होऊ शकतो. Cytokine Stroms (वादळ) असे त्याला वैद्यकीय भाषेत म्हंटलं जाता. सायटोकीन चे वादळ आपल्या शरीरामध्ये इतर आजार मध्ये देखील येतता. त्या बाबतीत आज थोड जाणून घेऊया.
      शरीराची रोगप्रतिकार शक्ति काय असते ? ते काशी काम करते? त्याचे घटक कोणत हे आपण  Corona Series Part 13 जाणून घेतला आहे. संदर्भ द्यावा लागतो कारण ह्या सगळी गोष्टी एकमेकाशी जोडलेल्या आहेत. आपण जर भारतीय आर्मी ची यंत्रणा पहिली तर त्यात विविध बटालियन आहेत 3 वेगवेगळी दल आहेत त्या प्रमाणे रोगप्रतिकार शक्ति मध्ये देखील काही विभागणी केली गेली आहे. प्लाजमा, लाल आणि पांढर्‍या (सैनिक) रक्त पेशी तसे अनेक पेशी आहेत. प्रामुख्याने पांढर्‍या पेशी 5 प्रकारात मोडतात त्या Neutrophils, Lymphocytes, Eosinophils, Monocytes आणि Basophils. ह्या सर्वांचे काम असतं ते म्हणजे शरीरात येणार्‍या कोणताही विषाणू, जिवाणू, किटानू, ह्यांना मारून टाकणे तसेच शरीरातील मृत पेशी किवा बिघाड झालेल्या पेशी यांचे कार्य स्थगित करणे किवा त्यांची योगी ती विलेवाट लावणे. हे सगळे काम करत असताना रोगप्रतीकरक शक्तिमधील ह्या सर्व घटकाचे नियोजन सुसूत्रता असवी लागते आणि त्यासाठी सूचना द्यावी लागते हे काम सुधा ह्या पांढर्‍या पेशीचा गट करत असतो. हे करत असतातना इथे पेशींचा समुहामध्ये मध्ये सायटोकीनची मात्रा वाढते. हे सायटोकीन म्हणजे एक प्रकारचे प्रोटीन आहे. ह्या सायटोकीन च्या तयार होण्यामुळे सर्व सैनिक पेशीन मध्ये सुसूत्रता येते योग्य सूचना दिल्या जातता आणि सारे मिळून ह्या विषाणूला रोखण्याचा प्रयत्न केला जातो.
      आता बिघाड कुठे होतो तर जेव्हा आपल्या सैन्याला आपला शत्रू कश्या प्रकारचा आहे त्याचाकडे कोणती साधन आहेत, संख्या किती आहे, युद्ध कुठे करायचे, अश्या कोणत्याही गोष्टी ची कल्पना नसते तेव्हा आपल्या रोगप्रतिकार शक्ति मध्ये अधिक मात्रा मध्ये हे सायटोकिन तयार होऊ लागले आणि ते साठायला लागत. जेव्हा करोना विषाणू चे संक्रमण होते तेव्हा हा विषाणू आपल्या फुफुसा मध्ये जाऊन बसतो आणि अधिक प्रमाणात mucus तयार करायला लागतो तो इतक्या अधिक प्रमाणात होतो की फुफुसा मध्ये साठायला लागतो पण ह्या मुळे माणसाचा मृत्यू होत नाही फक्त त्याला प्राणवायू ची कामतरता होते आणि मग दमल्या सारखे होणे, श्वास घेण्यास अडथळा होतो, चपळता कमी होते. ही लक्षणे शरीरात दिसू लागल्यावर रोगप्रतीकरक शक्तिची प्रतिक्रिया येते ह्या गोष्टींना मज्जाव करण्यासाठी आपल्या सैनिक पेशी प्रतिकार करायला लागतात पण त्यांना हे माहीत नसत की विषाणू कुठे, कसा, किती प्रमाणात आहे त्यामुळे सैनिक पेशी फक्त हल्ला करत राहतात त्यातून ह्या सायटोकीनचे प्रमाण आपल्या फुफुसामध्ये अधिक वाढायला लागते तेव्हा माणसाला प्रचंड वेदना होऊ लागतात. आणि कधी कधी ह्या मुळे माणसाचा मृत्यू होतो. म्हणजे प्रतेक वेळी ह्या cytokine storm मुळेच मृत्यू होतो असे नाही. (COVID-19: consider cytokine storm syndromes and immunosuppression. Meheta. P Lancet. 2020, 395(10229), 1033-1034). वुहाण मध्ये झालेल्या एक अभ्यासा नुसार करोना ची लागण झालेल्या 150 रुग्ण मध्ये अश्या प्रकारे मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे (Clinical predictors of mortality due to COVID-19 based on an analysis of data of 150 patients from Wuhan, China.  Ruan Q:, Intensive Care Med. 2020). उदाहरण द्यावयाचे झाल्यास HIV झालेल्या माणसाना क्षय रोगाची लागण होते आणि त्याचा मृत्यू होतो तेव्हा मृत्यू चे कारण हे क्षय आजार सागीतले जाते एचआयव्ही नाही पण प्रत्येक एचआयव्हीच्या रुग्णाल क्षय होऊन तो त्याच आजाराने  मरेल अस नाही.
      एक सर्वे नुसार करोना विषणूचा लागण मुळे मृत्यू चे प्रमाण हे फक्त 1% आहे त्यात सुधा जर रोगप्रतीकरक शक्ति मधील नियोजन, सुसूत्रता आणि सुचनाचा अभावमुळे माणसाचा मृत्यू होत असेल तर आज शास्त्रज्ञ आणि संशोधक यान नक्कीच ह्या बाबतीत विचार करावा लागेल. आणि आपल्या रोगप्रतिकारशक्ति मुळे आपला मृत्यू होऊ नये या साठी काही उपाय योजना असणारी यंत्रणा उभी करावी लागेल. अर्थातच रोगप्रतिकार शक्तिमध्ये बिघाड हा करोना विषाणू चे शरीरात होणार्‍या शिरकवा मुळेच होता परंतु भविषात असे संक्रमण होत राहणार आहे आज कोविड 19 उद्या 20 असे. हे थांबवता येणार नाही पण आपली रोगप्रतिकार शक्ति चे काम मात्र आपण सुधारू शकू हे नक्की. त्या करिता Novarties आणि Incyte ह्या दोन कंपनी आता सध्या ह्या साईटोकिन चे शरीरात येणार्‍या वादळाला रोखण्यासठी औषध शोधून काढत आहे त्या औषधाचे नाव आहे JAKAVI (जाकावी) आपण आशा करू की हे औषध
लकरत लवकर सुरक्षित रित्या बाजारात येवो.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Reference
1] doi: 10.1016/S0140-6736(20)30628-0.
2] doi: 10.1007/s00134-020-05991-x.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...