Skip to main content

Corona Series Part 97 : कोरोना आणि वर्ल्ड बँक

Corona Series Part 97

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि वर्ल्ड बँक

वर्ल्ड बँक International Bank of Reconstruction & Development (IBRD) आणि International Development Association (IDA), International Finance Carporation (IFC) अश्या विविध वित्तीय संस्थाची मिळून बनली आहे. विकसनशील देशअंतर्गत कोरोनाशी  लढा देण्यासाठी वर्ल्ड बँकने मदत म्हणून १.९ अब्ज डॉलर २५ देशांना देऊ केले आहेत, या मध्ये सर्वात मोठा वाटा भारताला १ अब्ज डॉलर मिळाला आहे. वर्ल्ड बँकेचचे प्रमुक डेविड मालपास यांनी कोरोनाच्या काळातील वर्ल्ड बँकची भूमिका स्पष्ट केली ही रक्कम मदत म्हणून गरीब आणि ज्या देशात कोरोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय सेवा कमी आहेत अश्या देशांना देण्यात येत आहे. या आधी ६५ देशात वर्ल्ड बँकमार्फत मदतकार्य चालू झाले आहे. प्रामुख्याने दक्षिण आशियाई देश जसे भारत १ अब्ज डॉलर, पाकिस्तान २०० दशलक्ष डॉलर, श्रीलंका १२८ दशलक्ष डॉलर, अफगाणिस्थान १०० दशलक्ष डॉलर, मांगोलीय, याच बरोबार साऊथ अफ्रीका आणि दक्षिण अमेरिका मधील विकसनशील देश जिथे दाट मनुष्य वस्ती आहे अश्या देशांना मदत केली आहे. 

ही मदत कशी वापरावी याचे सर्व अधिकार त्या त्या देशाच्या सरकारवर अवलंबून आहे. भारत सरकारने आधीच १.७३ लाख करोड रुपयाची मदत जाहिर केली आहे त्यामुळे ही आलेली मदत प्रामुख्याने पीएम केअरच्या माध्यमातून कोरोनाचे निदान लावणार्‍या लॅब तयार करण्यासाठी तसेच तपासणी चाचण्या, विलगीकरण आणि क्वारन्टाइन कक्ष बनवन्यासाठी वापण्यात येणार आहे. पाकिस्तान मध्ये हीच मदत कोरोनामुळे सर्वसामान्या लोकांची अडचणीत आलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी वापरली जाणार आहे. लॉकडाउनमध्ये नागरिकांना खाद्य पुरवणे, १५ दशलक्ष डॉलर शिखणावर खर्च केले जाणार आहेत. घाना सारख्या देशात ज्या लोकांचे लॉकडाउनमध्ये नोकरी गेली आहे त्यांना आर्थिक मदत केली जानार आहे.

 वर्ल्ड बँक कोरोना पूर्वी देखील १.७ अब्जं डॉलर ची मदत करत होते ती मदत आता कोरोनासाठी करण्यात येणार आहे. वर्ल्ड बँकेच्या International Finance Corporationचा मधायमातून अडचणीत आलेल्या व्यवसायांना ८ अब्जं डॉलर कर्ज स्वरुपात देण्यात येऊन IBRD च्या माध्यमातून ६ अब्जं डॉलर वैद्यकीय सेवा उपलब्ध करणायसाठी देण्यात येणार आहेत. तसेच पुढील १५ महिन्यामध्ये १६० अब्जं डॉलर खर्च करण्याची तयारी ठेवली आहे. वर्ल्ड बँकच्या या वित्तीय आधारामुळे विकसनशील देशांना कोरोना पासून मुक्त होण्याचा कालावधी कमी होईल.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

 


Comments

  1. New information read krayla bhetli tyat gk khup ch increase hot ahe sirr...so thanku very much sir 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...