Skip to main content

Corona Series Part 89 : कोरोना आणि Dexamethasone

Corona Series Part 89

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि Dexamethasone

Dexamethasone Anti- inflammatory (दाह घालवणारे औषध) या औषधाला कोरोनाच्या काळात जीवन रक्षक औषध म्हंटले आहे. या आधी Hydroxychloroquine (Game changer), Remdesivir (Reduces 15days hospitalization to 11days) अशी औषधे कोरोनावर वापरली जात असताना या औषधाना जीवन वाचवणारे औषध म्हंटले गेले नाही परंतु Dexamethasoneला मात्र जीवन रक्षक संबोधले गेले, याचे कारण म्हणजे औषधाची किंमत 5 ते 6 रुपये असून औषधा गुण उत्तम आहे. तसेच फार जुने औषध असल्यामुळे बरेच संशोधन झाले आहे. प्रामुख्याने Dexamethasone हे सूज कमी करण्यासाठी, डोळ्यांना झालेले संक्रमण, मज्जातंतू आणि मेदूचा कॅन्सर अश्या आजारांवर उपयुक्त आहे. सध्या देखील कोरोनाच्या बाबतीत उत्तम प्रकारे काम करत आहे.

ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये जगातील सर्वात मोठी चाचणी ज्याचे नाव Recovery trail : Randamized Valuation of COVID-19 Therapy सुरू आहे. या अभ्यासामध्ये कोणतेही नवीन ड्रग्स शोधले जात नसून पूर्वी पासून अस्तीत्वात असलेले ड्रग्स आणि लस यांचे कोरोना विषाणूवर प्रात्यक्षिक चालू आहे. या अभ्यासामधेच Dexamethasone ड्रग्स २१०० कोरोना संक्रमित लोकांना देऊ केले आणि ४३०० कोरोना संक्रमित लोक ज्यांना हा ड्रग दिला नाही त्यांचा बरोबर तुलना करण्यात आली. यामधून असे लक्षात आले अतिदक्षता विभागामधील ५०% रुग्ण जे व्हेंटिलेटरवर आहेत आणि Dexamethasone ड्रग्सचा उपचार घेत आहेत त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा झाली, तसेच ज्या रुग्णांना फक्त ऑक्सिजन देण्यात आला त्यातील २०% रुग्णाचे  आयुष्य वाचले. जर हे औषध सुरवातीपासून वापरले गेले असते तर जगभरता ४.५२,०८४ पैकी ५०,००० आणि युके मध्ये आणि ४२,१५३ मधील ५००० रुग्णाचे प्राण वाचवने शक्य होते आणि म्हणूनच याला जीवन रक्षक औषध म्हंटले आहे. हे औषध injection आणि गोळी या दोन्ही रूपात आहे. अतिदक्षता विभागामधील रुग्णांना 10 दिवस injection दिले जाते तर ईतर रुग्णांना गोळी दिली जाते. सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांनावर हे औषध वापरले जात नाही. डब्ल्यूएचओ ने देखील या दुजोरा दिला आहे.

Dexamethasone किंमत कमी असल्याने विकसनशील देशासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. भरतामध्ये zydus cadila Dexamethasoneची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. भारतामध्ये 5 ते 6 रुपये किंमतीच्या या ड्रग्सचा व्यवसाय 100 करोड रुपयाचा आहे. Drug Price and Control Board ने आधीच निर्धारित केली आहे. त्यामुळे कोरोनावर जारी उपयुक्त ठरले तरीही याची किंमत फार वाढणार नाही. वैज्ञानिक आपली परकाष्टा करून हळू हळू जगावर आलेले संकट टाळण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांचा या कष्टाला सलाम.  

   

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. Nice information sir 👍👍 thanks 👍

    ReplyDelete
  2. Pan mag he medicine ajun Bhartat available zal nhi ka?

    ReplyDelete
    Replies
    1. भारतामध्ये 5 ते 6 रुपये किंमतीच्या या ड्रग्सचा व्यवसाय 100 करोड रुपयाचा आहे. Drug Price and Control Board ने आधीच निर्धारित केली आहे. त्यामुळे कोरोनावर जारी उपयुक्त ठरले तरीही याची किंमत फार वाढणार नाही. MENTIONED IN BLOG
      BUT ITS STEROIDAL ANTI INFLAME TROY DRUG NEED TO CHECK SIDE EFFECT

      Delete
  3. Corona varcha aushad. Kahi yenar

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...