Skip to main content

Corona Series Part 88 : कोरोना आणि जागतिक अर्थव्यवस्था

Corona Series Part 88

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि जागतिक अर्थव्यवस्था

मार्च महिन्यापासून जगभरात सर्वच देशात कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था कोलमडत चालली आहे. भारतमध्ये देखील एप्रिल आणि मे मध्ये सर्व कारखाने, दुकाने, मॉल्स, बाजारपेठा खनिज तेल, धातू, पेट्रोल पासून चालणारे सर्वच उद्योग कडकडीत बंद असल्याने आर्थिक घडामोडी पुर्णपणे बंद होत्या कोरोना पासून बचाव करण्यासाठी अत्यंत महत्वाचे होते परंतु या सगळ्यात आर्थिक गतीविधी मात्र कमी झाल्या. एकूणच प्रशासनाला अंदाज आल्यावर हळू हळू अनलोकिंग चालू होऊन आर्थिक घडी मंदगतीने सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)च्या नुसार जागतिक वाढ ही -३% राहील असा अंदाज वर्तवला गेला आहे. २००९ साली जेव्हा अर्थ व्यवस्थामध्ये जागतिक मंदी असताना देखील एवढी मोठी घट दिसून आली नाही. प्रगत राष्ट्र अमेरिका -५.९%, जपान -५.२%, यूके -६.५%, जर्मनी -७.२%, फ्रांस -७, इटली -९.२%, आणि स्पेन -८% एकंदरीत २०२०साली सर्वच ठिकाणी घट होऊ शकते. हे सारे देश अडवांस अर्थव्यवस्था आहेत -६.१% आणि ईमजिंग अर्थव्यवस्था जसे भारत + १.९% चीन + १.२% वृद्धी होईल असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेला वाटत होते. परंतु नुकतेच आरबीआयच्या वृत्तानुसार भारत देखील नकारात्मक वाढ दाखवेल. असे झाले तर जागतिक वाढ -३% वरुण

-५% ईतकी खाली जाईल.

भारतासारख्या देशात या घटनेच्या खूप मोठा फरक पडू शकतो जवळपास ४० करोड जनसंख्या दारिद्र रेषेखाली जाईल. जागतिक स्तरावर गरीबीमध्ये वाढ होणार जर कोरोनाचा विषाणूचे संक्रमण झाले नसते गरिबीचा टक्का ७.९% असतं परंतु आता हा वाढून ८.६% वर पोहोचला आहे. याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे खनिज तेल, धातू, पेट्रोल या तीनही गोष्टींच व्यापारा मधील घट दळनवळण मध्ये ६०% तेल, नैसर्गिक वायु वापरला जातो आज सपूर्ण जग लॉकडाउन मध्ये असल्याने मागणीच नाही. धातूची सर्वात जास्त मागणी (५०%) चीन मध्ये असते पण कोरोना हा त्यांचा एक विषाणू आहे जो त्यांनी जगाला भेट म्हणून दिला आहे यामुळे धातूची मागणी शून्यावर आली आहे.

दुसरे प्रमुख कारण म्हणजे पर्यटन २००२ मध्ये सार्स-१ मध्ये असो किवा २००९ मध्ये आर्थिक मंदीच्या तुलनेत २०२० मध्ये पर्यटना मध्ये लक्षणीय घट झाली आहे. २०२० साली १४६ करोड लोक पर्यटन करतील असा अंदाज होता परंतु कोरोनामुळे ५८ ते ७८% घट होण्याचा अंदाज आहे. पर्यटनामध्ये सरस असणारे युरोपिन देशांना मोठा फटका बसला आहे. अन्न पदार्थच्या किमतीमध्ये देखील मोठी घट झाली कारण जागतिक स्थरावर उत्पन्न वाढून मागणी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवाल नुसार -२.६% घट सांगण्यात आली आहे.

यामधून मार्ग काडण्यासाठी सर्वच देशातील सरकार छोट्या आणि मोठ्या उद्योग व्यवसायना भरघोस मदत जाहीर केली आहे. एकूण अर्थव्यवस्थेच्या जपान २०%, अमेरिका १३%, भारत १०% चीन ३.६%, दक्षिण कोरिया २.२% यूके ५% मदत जाहित केली आहे. हळू हळू अर्थव्यवस्था प्रगती साधेल अशी आशा करू.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. Good morning Dr Ajinkya. . .
    I am very Happy to congratulate you from bottom of my heart for your continuous efforts on writings about COVID-19 pandemic Awareness. . . .
    In your articles you covering almost each n every aspcet associated with this.
    So your efforts are really superb.
    I am little curious in the digits of help declared by the government of India (10%) and China (only 3.6%). When we look towards the help declared by other countries it seems to be small. I didn't get why?
    It's just my curiosity and not the criticism.
    All the best for further writing.💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...