rona Series Part 87
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना आणि धारावी
आजार आणि त्यावरील उपचाराचा खर्च पहिलं की आपण सहज बोलून जातो हा आजार गरिबांचा आजार नाही. कोरोनामध्ये विमानातून येणार, मिनरल वॉटर पिणारे आजारी पडतील ईथे सरकारी शौचालय वापरणारे आणि गल्लीत क्रिकेट खेळताना गटारीतून चेंडू काडणार्याना काही होत नाही असे व्हाट्स अप विद्यापीठावर बर्याच गमती जमती चालत. परंतु, कोरोनाच्या बाबतीत मात्र गरीब, श्रीमंत, पुरुष, स्त्री, जात पाहत नाही तो कोणालाही सोडत नाही. दादर, माहीमच्या शेजारी धारावीमध्ये असणारी आशियामधील सर्वात मोठी अशी २.५ sq. Km मध पसरलेली सेवावस्ती (झोपडपट्टी) जिथे ४ ते ८ लाख लोक राहतात. (आकड्यामध्ये तफावत आहे).
जेव्हा 1 एप्रिलरोजी धारावीमध्ये पहिला रुग्ण सापडला तेव्हा सर्वांच्या अंदाजानुसार मुंबई मधीलच नाही तर महाराष्ट्रामधील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरेल असा अंदाज वर्तवला जात होता. कारण कोरोना रोखण्यासाठी आवशक्य असणारी पद्धत लॉकडाउन आणि सामाजिक अंतर राखणे जवळपास शक्य नव्हते. कारण सरकारी शौचालय, स्वचता, १० X १२ च्या खोलील ४ ते १० लोकांचे राहणीमान,वैद्यकीय सेवांचा अभाव असे नाना अडचणी समोर होत्या परंतु धारावी मधील लोकांनी कोरोना विषाणूपासून पळून जाण्या पेक्षा त्याचा सामना करण्याचे धाडस दाखवले आणि त्यात यशस्वी होताना दिसत आहेत. दिनाक १६ जुन रोजी धारावीमध्ये कोरोनाचा चढता आलेख सपाट झाला आहे. आज महाराष्ट्रमध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू संख्या देखील जास्त आहे. धारावी मध्ये १२ जून रोजी २०१३ रुग्ण होते असे असताना ३० मे ते ८ जूनच्या दरम्यान धारावी मध्ये १ ही व्यक्तिचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. ८ ते १६ जून मध्ये ४ व्यति दगावले आहेत. मुंबईचा विचार केला तर कोरोनाचे संक्रमण होण्याचा दर ३% ते ५% आहे धारावीमध्ये मात्र हा दर १.५७% आहे. तसेच रुग्णसख्या दुप्पट होण्यासाठी मुंबई शहराला २२ दिवसाचा कालावधी लागला तर धारावीमध्ये ४४ दिवस लागले. मुंबईमध्ये कोरोना हाहाकार माजवात असताना धारावीमध्ये आपेक्षित असे संक्रमण झाले नाही. मुंबईचे सहायक महापालिका आयुक्त किरण दिघावकर म्हणाले काम अपयशी ठरले असे मानले जात होते, पण आम्ही सर्वांना चकित केले आहे. असे कसे झाले याची काही कारणे म्हणजे कॉनटॅक्ट ट्रेससिंग, चाचणी, विलगीकरण, अलगीकरण अश्या गोष्टीमध्ये केलेले योग्य नियोजन.
बृहन मुंबई महानगर पालिका आणि काही सामाजिक संस्था यांनी केलेले कार्य आणि लोकांनी दाखवलेला सहभाग. महानगर पालिकेने सर्वप्रथम घरोघरी जाऊन कोरोनाची लक्षणे आहेत का याची तपासणी चालू केली ४७,००० नागरिकांची तपासणी झाल्यावर लक्षात आले की लोकांचा दारीजाण्या पेक्षा विविध ९ ठिकाणी शिबीराचे नियोजन केले. या मध्ये ३५० हून अधिक स्थानिक पातळीवरील तज्ञ डॉक्टरानचा समुह नेमण्यात आला. स्थानिक डॉक्टर असल्यामुळे नागरिक देखील त्यांचाशी दिलखुलास आणि खरी माहीत सांगू लागले. जवळपास ३ लाखहून अधिक लोकांची चाचणी केली यामध्ये १ लाखाहून अधिक वृद्ध लोकांचा समावेश होता. महानगर पालिका ने ७००० तपासणी आणि सामाजिक संस्थामार्फत २००० तपासण्या करण्यात आल्या.
धारावीमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरून आलेला मजुरांची संख्या अधिक आहे सध्या ते आपल्या आपल्या राज्यात गेले असल्यामुळे नागरिकांची घनता कमी झाली आणि आपसूकच कोरोना प्रतिबंधास मदत झाली.
मोठ्या प्रमानामध्ये quarantine ची योजना करनायत आली लक्षणे दिसली की लगेच विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले त्यामुळे संक्रमण प्राथमिक स्तरावर राहिले. विलगीकरण कक्षात देसखील नागरिकांचे आरोग्य आणि मनोबल वाढीसाठी योगा, प्राणायाम, एरोबीक्स असे कार्यक्रम घेण्यात आले. राजीव गांधी मैदान असो किवा सरकरी शाळा ३,८०० बेड बनवण्यात आले. तसेच महानगर पालिकेने सुरवातीच्या काळातच ५ खाजगी रुगानलये ताब्यात घेऊन विलगीकरण कक्षात रूपांतरित करण्यात आले. जस जशी अंख्या कमी होऊ लागली तसे शाळा पुन्हा खाली करण्यात आल्या. या मुळे नागरिकान मध्ये मानसिक बळ निर्माण झाले. या सरवण मुळे आज धारावीमध्ये कोरोना नियंत्रणात आला आहे.
रोगराई घेऊन येणारा मान्सूनचा पाऊस पुर, माघारी येणारे कामगार आणि कोरोनाची दुसरी लाट यामुळे पुन्हा आजा डोकेवर काढू शकेल.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...
Nice information sir 👍👍 thanks sir 👍
ReplyDeleteNice info
ReplyDelete