Skip to main content

Corona Series Part 83 : कोरोना, हर्ड इम्यूनिटी आणि भारत

Corona Series Part 83

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, हर्ड इम्यूनिटी आणि भारत

हर्ड इम्यूनिटी या बाबत आपण भाग ७१ आणि ७२ मध्ये चर्चा केली आहे या पद्धतीचा वापर भारतासारख्या देशात शक्य आहे का या बाबतीत चर्चा चालू आहे. हर्ड इम्यूनिटी म्हणजे कळपामध्ये नैसर्गिक रित्या निर्माण होणारी रोग प्रतिकारक शक्ति. भारतामध्ये ही प्रणाली यशस्वी ठरण्याची शक्यता जवळपास नाही आहे त्याची कारणे आज आपण पाहू. जेव्हा लोकसंख्येमधील जास्तीतजास्त व्यक्ति कोरोना विषाणूच्या बाबतीत इम्यून होतील तेव्हा विषाणूशी सामना सहज करू शकतील. हर्ड इम्यूनिटी प्रामुख्याने २ प्रकारे साधता येऊ शकते लसीकरण किंवा औषध उपचार आणि दुसरे विषाणूची लागण होऊन कोणत्याही पद्धतीने (उपचार घेऊन किंवा न घेऊन) बरे होणे. जे लोक बरे झाले किंवा लसीकरण किंवा औषध उपचार केला आहे त्यांना पुढे त्याच विषाणूचे संक्रमण होणार नाही झालेच तरी लगेच बरे होऊ शकतील असे लोक साथीचे रोग पुढे पसरवू शकणार नाहीत. एक उदाहरण पाहू measles (गोवर) संसर्गजन्य विषाणू असून १ व्यक्ति पुढे १८ व्यक्तींना संक्रमित करू शकतो (R0= 18) अश्या आजारामध्ये हर्ड इम्यूनिटी यायची असल्यास ९५% लोकांना इम्यून व्हावे लागेल आणि कोरोनाचा R0= २ तो ३ आहे म्हणजे १ व्यक्ति पुढे २ किवा ३ व्यक्तींना सकरमीत करतो कोरोनाच्या बाबतीत हर्ड इम्यूनिटी यायची असल्यास ६०% व्यक्ति इम्यून व्हावे लागतील.

भारतासारख्या अधिक लोकसंख्या असणार्‍या आणि गरीब देशमध्ये हर्ड इम्यूनिटीचा प्रयोग शक्य आहे असे एक परीक्षण समोर आले होते. पण भारतामध्ये खर्च हर्ड इम्यूनिटी शक्य होणार नाही त्याची प्रमुख कारणे पाहू.

१) करोना विषाणूच्या बाबतीत मानवी शरीर कश्या प्रकारे रोग प्रतिकारक शक्ति निर्माण करत आहे याचा पुरेपूर अभ्यास अजून झाला नाही. संशोधन अजूनही प्राथमिक स्थरावर आहे. करोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्ति मध्ये अजूनही पुनसंक्रमण किंवा पुनसक्रियन होत आहे. पुनसंक्रमण म्हणजे नव्याने पुन्हा बाधा होणे आणि पुनसक्रियन आहे तेच संक्रमण कालांतराने पुन्हा सक्रिय होणे. असे का आणि कसे होत आहे अशी माहीत सध्या तरी उपलब्ध नाही. हर्ड इम्यूनिटीच्या प्रमुख सिद्धांता नुसार एकदा इम्यून झाल्यावर पुन्हा संक्रमण होऊ शक्त नाही पण कोरोंनाचा बाबतीत असे घडताना दिसत नाही.

२) भारतामध्ये हर्ड इम्यूनिटी लागू करावी असे वाटते कारण भारत हा तरुणाचा देश आहे जवळपास ८०% जनसंख्या ४४ पेक्षा कमी वय असनारी आहे त्यामुळे रोगप्रतीकरक शक्ति सक्षम आहे असे म्हंटले जाते. ग्लोबल बर्डन डिसेजेस १९९०-२०१६ यांचा परीक्षणांनुसार भारतामधील ४०% जनसंख्या (४५ ते ५४) आणि २० ते ४४ वयोगटातील २२% तरुण यांना उच्च रकतदाबाचा त्रास आहे. १५ ते ४४ वयोगटातील ४% तरुण मधुमेह -२ ने बाधित आहेत. २.५ कोटी जनसंख्या एचआयव्ही ने बाधित आहे यात देखील ८३% १५ ते ४४ वयोगटातील तरुण आहेत. श्वसनाचे त्रास असणारे आणि अस्थमा असणारे जवळपास ४२% आणि ३% तरुण आहेत. ३३% जनसंख्या तंबाखूचे सेवन करते. अश्यामध्ये हर्ड इम्यूनिटी कशी सध्या काशी होईल. याच बरोबर टर्कीसारखे बाल आणि तरुणांनाचे लॉकडाउन केले तरी त्यांना बाधा होणार नाही कशावरून जर तरुण विविध आजाराने बाधित असतील तर वृद्ध लोकांची काय अवस्था असेल.

३) हर्ड इम्यूनिटी साधायची असल्यास वैद्यकीय सुविधा सक्षम असणे तितकेच महत्वाचे आहे कारण कळपामध्ये नैसर्गिक रित्या रोग प्रतिकारक शक्ति निर्माण होत असतान चार्ल्स डार्विन यांचा सिद्धांतानुसार जो शक्तीशाली असेल तोच टिकेल असे असेल तर जे अशक्त असतील त्यांना अतिदक्षता विभागाची गरज लागेल. भारतमध्ये १००० रुग्णाचा मागे ०.५५ बेड आहेत आणि सरकारी रुगांलयात ४८ ते ५०,००० व्हेंटीलेटर आहेत. याच बरोबर सांघिक एकत्रिकरन टाळणे हे देखील एक मोठे आव्हान आहे. भारतामध्ये हर्ड इम्यूनिटी सारखी एकच विचारप्रणाली एकाच वेळी लागू करणे योग्य ठरणार नाही हर्ड इम्यूनिटी सोबातच विविध स्थरावर आर्थिक सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक सर्वच ठिकाणी विविध योजना राबवणे आवशक्य आहे. सध्या तरी हर्ड इम्यूनिटीचा नदी लागणे जनहीताचे नाही.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

 


Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Nice information sir 👍👍 thanks sir 👍

    ReplyDelete
  3. This would be the first blog in India run by a teacher for the cause of CORONA AWARENESS.Last 83 parts,it provided factual information with scientific evidences and therby enriched the society. Prof. Ajinkay Patrawale really contributed his LOCK DOWN period in Nation building. Thanks to him...

    ReplyDelete
  4. In india when develop the herd immunity

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 76 : कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

Corona Series Part 76 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि एन-९५ मास्कचा इतिहास कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कोरोना योद्धा मास्क आणि पिपिई किट दोन्हीचा वापर करतात. भारतामध्ये मास्कचा वापर सध्या मार्च पासून वाढला असला तरी मास्कचा ईतिहास जवळपास ३०० वर्षापासूनचा आहे. मानव मास्क कसा , कशासाठी वापरू लागला. याची माहिती घेऊया. १७२०च्या दरम्यांन मारसेलीसच्या चित्रामध्ये मास्कचा वापर केलेला आढळून येतो मास्क म्हणण्यापेक्षा तोंडावर कापड लावलेले दिसून येते. अंदाजे त्यावेळी बुबोणिक प्लेग आला होता लाखो लोकांचा मृत्यू होत होते परंतु मृत्युचे कारन समजण्यापलीकडे होते . कारण त्याकाळी अजूनही विषाणू/ जिवाणूची संकल्पना अस्थित्वात नव्हती. मरणोत्तर मानवी शरीराला येणार वास आणि त्यामुळे हवा खराब होत आहे अशी एक धारणा होती हवा ही या रोगास कारणीभूत आहे असे वाटू लागले त्याला मियासमा म्हंटले जात. या मियासमा संकल्पन

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांनी mRNA 1273 न

Corona Series Part 92 : कोरोना आणि Favipiravir

Corona Series Part 92 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि Favipiravir सुरवातीच्या काळात चीन पाठोपाठ सिंगापूर , जपान , कोरिया या देशात कोरोंनाचे संक्रमण झालेली आपल्याळ दिसून येईल. तेव्हा पासूंनच चीन , सिंगापूर , जपान , कोरिया आणि जपान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान आणि विविध शास्त्रामधील तज्ञ शास्त्रज्ञानाचा वापर करत नवीन संशोधन करत आहेत. या मधील Hydrocychloroquin, Remdesivir, Favipiravir, Lopinavir, Ritonavir ड्रग्स बरेच चर्चेत होते कारण या ड्रग्स ची चाचणी काहीअंशी यशस्वी होताना दिसत होती. भाग 3 , 47 , आणि 52 मध्ये या ड्रग्स बाबतीत सविस्तर उल्लेख केला आहे. फूजीफिल्मजी पूर्वी कॅमेरा मधील रोल बनवत होते त्यांचीच Toyama Chemicals कंपनीमरफट   जपानमध्ये सर्वात प्रथम Favipiravir बनवण्यात आले. दिनांक १८ मार्च २०रजी वुहाण मध्ये सर्वप्रथम Favipiravir ( Pyarzine derivative) ची ३४० रुग्णांवर ( clinical trials) करणात