Skip to main content

Corona Series Part 82 : कोरोना, आणि टर्की

Corona Series Part 82

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, आणि टर्की

प्रगतशिल, पुढारलेले, आर्थिक दृष्ट्या मागास असे सर्वच देश कोरोनाचा सामना करत आहे. प्रत्येक देशाने आपल्या देशात उपयुक्त अशी योजना राबवली आहे काही ठिकाणी योजने नुसार योग्य काम झाले तर काही ठिकाणी योजनाची फसगत होत आहे. पुढारलेल्या देशापेक्षा मागास आणि प्रगतशिल देशांनी कोरोनाशी अधिक चांगल्या प्रकारे काम केलेल्याची उदाहरणे समोर येत आहेत. याचाच अर्थ पैसा, पायाभूत सुविधा अतिशय मजबूत असल्यावरच महामारीशी सामना करता येतो असा नाही तर देशासाठी निस्वार्थी काम करण्याची ईचाशक्ती असेल तर कमी संसाधणामध्ये देखील विजयी होऊ शकतो. असेच काम टर्की मध्ये झाले.

८२.३२ कोटी लोकसंख्या असणारा देश मार्च आणि एप्रिल मध्ये, मृतांची संख्या वाढल्यामुळे

टर्की, ईटलीची पुनरावृत्ती करतो की काय असे चित्र उभे राहिले होते. परंतु तीन महिन्यांत,  अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कोरोना महामारीचे संकट दूर केले. एप्रिलम महिन्यात टर्कीमध्ये दररोज सुमारे ४००० ते ६००० नवीन केसेस समोर येऊ लागल्या होत्या काही आठवड्या मध्ये रोज ५००० रुग्ण बाधित होत होते परंतु आता जून महिन्यात १००० पेक्षा कमी केसेस समोर येत आहेत. २३ एप्रिल च्या दरम्यान टर्कीने सर्वोच्च् ८०,००० रुग्ण संख्या गाठली मात्र ईथुन पुढे रुग्णाचा आलेख कमी होत जाऊन कोरोन मुक्त नागरिकांची संख्या वाढू लागली. मृत्यूदराचा विचार केला तर लक्षात येईल टर्कीमध्ये १९ एप्रिलला १२७ रुग्ण दगावले गेले, १७ ते २० एप्रिल च्या दरम्यान हा आकडा १२३ ते १२५ च्या दरम्यान होता भारतामध्ये सध्या लॉकडाउन शिथिल केल्यावर २५०+असा मृत्यूदर/ प्रती दिन आहे.

टर्कीमध्ये चाचणी दर हा पुढारलेल्या देशापेक्षा अधीक ठेवण्यात आला फ्रांस मध्ये २१००० / १०लाख ईतक्या चाचणी करण्यात येत होत्या तर टर्कीमध्ये हाच दर २७,००० /१०लाख नागरिक होता तुलनेने भारतामध्ये ३,५०० /१०लाख तपासणी केली जाते. टर्कीमध्ये ब्रिटनच्या तुलनेने मृत्यूदर १०पट कमी आढळून आला. इतर विकसित देशांकडे आपण पाहिले तर अमेरिकेत मृत्यूचे प्रमाण ५.३ टक्के, स्पेन १०.५ टक्के, इटली १३.२ टक्के, जर्मनी ३.५ टक्के, युके १३.५ टक्के, फ्रान्स १७.३ टक्के आहे.

टर्कीने महामारीशी लढण्यासाठी कोणत्याही एकाच योजनेचा आधार न घेता वेळेनुसार बदल केले. टर्कीमधील आधिकार्‍यांचा म्हणणयनुसार कोणतीही एकच योजना अश्या महामारीशी सामना करू शकत नाही म्हणूनच टर्कीने वेगवेगळ्या स्थारावर विविध योजना आमलात आणल्या. सामाजिक, राजकीय, शास्त्रीय आणि आर्थिक अश्या सार्‍या विभागामध्ये काम करण्यात आले. यामध्ये शास्त्रीय उपाययोजना अधीक कल दिसून आला आणि म्हणूनच डब्ल्यूएचओ मार्फत टर्कीचे कौतुक करण्यात आहे. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात १० मार्च रोजी टर्कीमध्ये ट्रॅवल हिस्टरीच्या मार्फत पहिलं रुग्ण शोधून काढण्यात आला जवळपास ६००० समूह कॉनटॅक्ट ट्रेसिंगचे काम ११ मार्च पासून करीत आहेत. यावरून लक्षात घेण्यासारखे आहे टर्कीने किती लवकर या विषाणूशी लडण्याची तयारी केली. डॉ. अस्लान कॉनटॅक्ट ट्रेसिंग च्या प्रमुख म्हणतात

आम्ही परदेशी बातम्याचे अनुसरण करतो.'', "आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा या व्हायरसबद्दल ऐकलं तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो. पण युरोप आणि अमेरिकेपेक्षा टर्कीने जलद गतीने विषणूचा सामना केला.

टर्कीमध्ये लॉकडाउन देखील ईतर देशाप्रमाणे केला नाही त्यामध्ये देखील गरजेच्या ठिकाणी बदल करण्यात आले. टर्कीमध्ये रूढीपरंपरांनाही कुलूप बंद केले आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था कोमात ठेवण्याऐवजी,अधिका-यांनी तरुणांना (२० पेक्षा कमी) आणि वृद्धांना (६५ पेक्षा अधिक) नागरिकांना घरी राहण्याचे आदेश दिले कारण कोरोनाचे प्रमुख बाधित याच वयोगटात जास्त दिसून आले आहेत, ईतर सर्वांना कामकरण्याची मुभा दिली. तसेच ग्राहकांशी थेट संपर्क येणारे सर्व व्यवसाय सलून, हॉटेल, मंदिरे ईत्यादी व्यवसी बंद केले. शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी मोठ्या शहरांना लॉक डाउन ठेवण्यात आलं होतं, नागरिकांनी देखील नियम तंतोतंत पाळत कॉफी शॉपला भेट दिली नाही,  गर्दीच्या बाजारात खरेदी केली नाही,  मशिदीत प्रार्थना केली नाही. ही टर्कीची रणनीती काम करत असल्याचे दिसते कारण टर्कीमध्ये १५ ते ६५ वय असणारे नागरिक ६७.८% आहेत ० ते १४ वयोगाट २३% आणि ६५ पासून पुढे असणारे फक्त ९% आहेत. ईटली च्या तुलनेत वृद्ध नागरिकांची संख्या कमी असणे फायद्याचे ठरले. म्हणून,

सर्वात जास्त संवेदनशील नागरिक विषाणू पासून वाचले काम करणारे प्रौढ लोक ज्यांना बाधा झाली होती ते लवकर बरे झाले.

डॉ. जेरेमी रॉसमनजे केंट विद्यापीठातील व्हायरॉलॉजीचे व्याख्याते आहेत यांच्या मते व्हायरल होणारा प्रसार कमी करण्यासाठी हा एक अतिशय लहान देश जरी असला तरीही "टर्की अनेक देशांच्या श्रेणीत बसतो, ज्यांननी चाचणी, शोध, विलगीकरण आणि हालचालींवर निर्बंध घातले आहेत.

टर्कीने हायड्रोक्सीक्लोरोक्विनला या औषधावर प्रचंड विश्वास दाखवला आज जरी या औषधाच्या वापरावर प्रश उठवत असले तरीही सुरवाती पासून टर्कीमध्ये हे औषध रुग्णांना देऊ केले. उलट अमेरिका आणि युरोप मध्ये हे औषध रुग्णाना शेवटच्या टप्प्यात देण्यात आले. टर्कीचे मुख्य वैद्यकीय आधिकारी वारांक हॉस्पिटलमधील मुख्य डॉक्टर आहेत डॉ Nurettin Yiyit  म्हणतात

हायड्रोक्झिक्लोरोक्विनचा वापर कोरोनावर करणे म्हणजे कोरोंनाची गुरुकिल्लीच आहे. ते म्हणतात, इतर देश हे औषध खूप उशिरा नेत आहेत. आपण फक्त सुरुवातीलाच त्याचा वापर करतो. या औषधाबद्दल आपल्याला संकोच वाटत नाही. आम्हाला वाटते की याचे परिणाम प्रभावी आहे.

टर्कीने अधिक चांगल्या पायाभूत सुविधा अतिशय कमी वेळेमध्ये उभा केल्या गेल्या काही दशकांत श्री. एर्दोगन आणि त्यांच्या सरकारांनी आरोग्य सेवेसाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले आहेत. अलीकडे आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या आकाराच्या हॉ रुग्णालयचे जाळे निर्माण करून. यातील सर्वात नवीन रुग्णालय २१ मे रोजी सुरू केले. त्यात २,७०० बेड आहेत. त्यातील १/६ बेड हे अतिदक्षता विभागात वर्ज केले आहेत. योग्य नियोजनामुळे टर्कीच्या आरोग्य विबागावर कधीच आतिरिक्त ताण आला नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे सरकार आणि विरोधी पक्षांनी एकत्रित केलेलं प्रयत्न एर्दोगन आणि त्यांचे प्रभावी आरोग्यमंत्री फहरेट्नकोका यांनी कोरोना संक्रमण रोखणायत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच विरोधी पक्षामध्ये असूनही विशेषतः इस्तंबूल आणि अंकारा मधील महापौरांनी निधी गोळा केला आहे आणि मास्क, पीपीई किटचे वाटप केले. विरोधी पक्ष सरकारने केलेल्या योजनाची आलोचना करणायसाठी नसतो हे टर्की सारख्या देशातील नेत्यांना समजले.

आज टर्कीने सामाजिक, राजकीय, शास्त्रीय आणि आर्थिक अश्या सार्‍या स्तरावर योग्य नियोजन पूर्वक काम कसे केले पाहिजे हे दाखवून दिले. कोणत्याही देशातील चांगली समाज हिताची  गोष्ट आत्मसात करणे कमीपणाचे ठरत नाही ईतर देशांनी यातून बोध घेणे आवशक्य आहे.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. खूप छान लेख झाला आहे आजचा!
    त्यासाठी केलेला गृहपाठ आणि सकारात्मक मांडणी यामुळे खूप कौतुक वाटते.

    ReplyDelete
  2. खूप चांगले विश्लेषण. भविष्यात हा उपयुक्त डेटा असेल.

    ReplyDelete
  3. Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 76 : कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

Corona Series Part 76 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि एन-९५ मास्कचा इतिहास कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कोरोना योद्धा मास्क आणि पिपिई किट दोन्हीचा वापर करतात. भारतामध्ये मास्कचा वापर सध्या मार्च पासून वाढला असला तरी मास्कचा ईतिहास जवळपास ३०० वर्षापासूनचा आहे. मानव मास्क कसा , कशासाठी वापरू लागला. याची माहिती घेऊया. १७२०च्या दरम्यांन मारसेलीसच्या चित्रामध्ये मास्कचा वापर केलेला आढळून येतो मास्क म्हणण्यापेक्षा तोंडावर कापड लावलेले दिसून येते. अंदाजे त्यावेळी बुबोणिक प्लेग आला होता लाखो लोकांचा मृत्यू होत होते परंतु मृत्युचे कारन समजण्यापलीकडे होते . कारण त्याकाळी अजूनही विषाणू/ जिवाणूची संकल्पना अस्थित्वात नव्हती. मरणोत्तर मानवी शरीराला येणार वास आणि त्यामुळे हवा खराब होत आहे अशी एक धारणा होती हवा ही या रोगास कारणीभूत आहे असे वाटू लागले त्याला मियासमा म्हंटले जात. या मियासमा संकल्पन

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांनी mRNA 1273 न

Corona Series Part 92 : कोरोना आणि Favipiravir

Corona Series Part 92 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि Favipiravir सुरवातीच्या काळात चीन पाठोपाठ सिंगापूर , जपान , कोरिया या देशात कोरोंनाचे संक्रमण झालेली आपल्याळ दिसून येईल. तेव्हा पासूंनच चीन , सिंगापूर , जपान , कोरिया आणि जपान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान आणि विविध शास्त्रामधील तज्ञ शास्त्रज्ञानाचा वापर करत नवीन संशोधन करत आहेत. या मधील Hydrocychloroquin, Remdesivir, Favipiravir, Lopinavir, Ritonavir ड्रग्स बरेच चर्चेत होते कारण या ड्रग्स ची चाचणी काहीअंशी यशस्वी होताना दिसत होती. भाग 3 , 47 , आणि 52 मध्ये या ड्रग्स बाबतीत सविस्तर उल्लेख केला आहे. फूजीफिल्मजी पूर्वी कॅमेरा मधील रोल बनवत होते त्यांचीच Toyama Chemicals कंपनीमरफट   जपानमध्ये सर्वात प्रथम Favipiravir बनवण्यात आले. दिनांक १८ मार्च २०रजी वुहाण मध्ये सर्वप्रथम Favipiravir ( Pyarzine derivative) ची ३४० रुग्णांवर ( clinical trials) करणात