Skip to main content

Corona Series Part 81 : कोरोना, आणि जिवघेणी स्पर्धा

Corona Series Part 81

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

संशोधन क्षेत्रा मध्ये काम करणार्‍यांना विनंती आहे. आपण आपले संशोधनाचे अनुभव आणि मत वरील ब्लॉग वर व्यक्त करावे.  

 

कोरोना, आणि जिवघेणी स्पर्धा

कोणत्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा असणे चांगलीच गोष्ट असते परंतु स्पर्धकामध्ये असणारी अतिमहत्वाकांक्षा जिवघेणी ठरू शकतात. विशेष म्हणजे वैद्यकीय क्षेत्रा मध्ये काम करणार्‍या संशोधक डॉक्टरयांच्या मध्ये अशी महत्वाकांक्षा निर्माण झाली तर संपूर्ण समाजाचे आरोग्य धोक्यात आल्या शिवाय राहणार नाही. कोरोनाचा विषाणूचा अभ्यास करताना अशी स्पर्धा निर्माण होणे समाज हिताचे नाही. शास्त्रज्ञनामध्ये अशी स्पर्धा या पूर्वी ही दिसून आली आहे. निकोलास टेसला आणि एडिसन, ओपेंहयमर आणि हयजिनबर्ग असोत, दोन देक्षामध्ये देखील, विज्ञानातील स्पर्धा पहिली असेल अमेरिका आणि रशिया मधील चंद्र मोहीम असो, किंवा पोलियोची लस संशोधन. अश्या अनेक घटना या पूर्वी झाल्या आहेत या मधून यश मिळाले असेल परंतु हे यश आणताना समजला मोठे मूल्य मोजावे लागले आहे. आज ही भूतकाळातून मानवाने काही बोध घेतला गेलेला दिसत नाही. आज देखील या स्पर्धात्मक युगात समाजाला हानिकारक दुर्घटना होतील असे संशोधन समोर येत आहे त्यातही भारतिय मूळ असणार्‍या संशोधक डॉक्टरांचा सहभाग मनाला ठेच पोहोचवतो.

डॉ. मनदीप मेहरा Professor, Harvarnd university,Brigham&women Hospital Boston,

डॉ. संदीप देसाई Owner, CEO surgispher company

डॉ. अमित एन पटेल university of utha

डॉ. फ्रँक रुश्चइतझ्का, university Hospital of Zurich, Switzarland

अतिशय नामांकित असे हे डॉक्टर, या समूहाने 2 शोध निबंध कोरोना आणि hydroxichloroquine, कोरोना आणि अति रक्तदाब मध्ये वापरली जाणारी औषधे या बाबतीत आपले संशोधन (संशोधन म्हणजेच, माहिती गोळा करून अनुमान व्यक्त केले आहे) The Lancet आणि न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन (एनजेएमसी) अश्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अति प्रतिष्टीत जर्नलमध्ये आपल्या संशोधनाला स्थान मिळवले. या जर्नलमध्ये शोधनिबंद प्रकाशित होणे आपण समजतो एवडे सोपे काम नाही.

२२ मे २० रोजी The Lancet मध्ये या सशोधकांनी hydroxichloroquine (एचसीक्यू) च्या वापर घातक असल्याचा दावा केला. ६ खंडातील ६७१ रुग्णालयामधून ९६,०३२ रुग्ण ज्यांचे सरासरी वय पुरुष ५४ तर महिला ४६ वर्ष आहे. अश्या मधील १४,८८८ रुग्णांना एचसीक्यू देण्यात आले होते परंतु एचसीक्यू देऊनही  कोरोनाचे संक्रमण कमी झाले नाही किंबहुना या रुग्णामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे असे सांगण्यात आले, तसेच याचा समूहाने एनजेएमसी मध्ये प्रकाशित केलेलल्या निबंधानुसार, रक्तदाबावर नियंत्रण मिळवणार्‍या औषधे कोरोना रुग्णावर कोणताही विपरीत परिणाम करत नाही असा दावा करण्यात आला, उलट या आधी काही निबंध प्रकाशित केले होते त्यांचा म्हणण्या नुसार ACE inhibitor जे रक्तदाबावर नियंत्रण करणामध्ये सक्रिय यामुळे कोरोनाच्या मृत्यूदरावर गंभीर परिणाम होतो.

हे दोन्ही शोध निबंध पूर्वी झालेल्या संशोधनाच्या परस्पर विरोधाभास सांगात आहेत आणि म्हनून सार्‍या जगातून लक्ष केन्द्रित झाले. डब्ल्यूएचओने हे शोधनिबंध पाहून ३ दिवसामध्येच एचसीक्यूचवर चालू असणारी तपासणी थांबवली गेली. विविध संशोधकांनी या संशोधनावर प्रश्नाचा भडिमार केला. त्यातील काही प्रश्न ऑस्ट्रेलिया मधून मिळवलेल्या माहितीवर आधारित होते. दिनांक २१ एप्रिल रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये कोरोनाने मृत्यू झालेली संख्या ६७ होती परंतु निबंधामध्ये ही संख्या ७३ दाखवण्यात आली याचे प्रती उत्तर म्हणून आशिया खंडामधील काही रुग्णाची संख्या चुकून धरण्यात आली असे संगीतले गेले. पण मूळ विश्वासाचा मुद्दा उपस्थित होतो. संखेक्त गोंधळ असेल तर पुढील अभ्यासाची विश्वाहर्ता किती...! दुसरी गोष्ट कोरोनाचा जन्म होऊन सार्‍या जगाला समजू पर्यन्त 3 महीने देखील झाले नाहीत ईतक्या कमी वेळात जगभरातून फक्त ४ संशोधकांनी ही माहिती कशी मिळवली.

संशोधनाचे काम हे समूहात चालते लॉकडाउनच्या काळात ही माहीत घेत असताना शोधनिबंधामध्ये कमीत कमी १५ ते २० लोकांचे नावे अपेक्षित होती कारण अत्यंत महत्वाचा अश्या शोधाचा भाग होणे कुणाला नाही आवडणार. या शोध निबंधामध्ये २००८ साली स्थापन झालेल्या डॉ. संदीप देसाई जे या निबंधाचे एक लेखक आहेत त्यांचाच  surgispher कंपनीचे आभार मानले आहेत. आता ही कंपनी काय काम करते, सुरवातीला वैद्यकीय पुस्तक प्रकाशनाचे काम करणारी ही कंपनी आता स्वत:हाला वैद्यकीय माहीत गोळा करणारी, साठवणारी, विश्लेषण करणारी कंपनी आहे मानते ही कंपनी माहिती संलकलीत करताना रुग्णाची ओळख लपवली जाऊन रुग्णालयात विविध आजारचे किती रुग्ण आहेत, किती रुग्णाची कोणती कशी शस्त्रक्रिया झाली अशी माहीत गोळा करते. एक वेबसाईट सोडली तर तर या कंपनीमध्ये किती लोक कश्याप्रकारे काम करतता याची माहीत उपलब्ध नाही आता पर्यन्त संकलित केलेल्या माहिती नुसार ३ कर्मचारी आसल्याचे आढळून आले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया मधील रुग्णालयाची चौकशी केली असता कोणतीही माहिती अश्या कंपनीला दिली असल्याचे खंडन करण्यात आले. हे सर्व पाहता या कंपनीने कमी वेळेत अधिक माहीत कुठून गोळा केली असा यक्ष प्रश्न निर्माण झाला.  

The Lancetच्या संपादक मंडळाने या लेखकाकडे निबंधामध्ये प्रकाशित झालेल्या माहितीस समर्थन देत असणारी सारी माहीत देण्याची मागणी करण्यात आली तेव्हा ईतर लेखकांनी surgispher कंपनीकडे बोट दाखवले, परंतु surgispher कंपनी गोपनीयतेचा मुद्दा बनवत माहिती देण्यास नकार दिला. Surgispher कंपनी माहिती घेत असताना रुग्णाची ओळख लपवली जाते मग गोपनीयतेचा मुद्दा कसा उपस्थित होतो.

 या संशोधक समुहाचा अडचणी वाढत गेल्या नंतर वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मनदीप मेहरा यांनी The Lancent आणि न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन च्या संपादक मंडळाना शोध निबंध मागे घेन्याची विनंती केली. कारण या निबांधाच प्रमुख गाभा surgispher कंपनीकडे असणारी माहिती होती तीच प्रकाशित होणार नसेल तर या निबंधामधील माहिती योग्य आहे हे सिद्ध होत नाही. या सार्‍याचा अर्थ असा नाही की एचसीक्यू हे कोरोंनाचे जालिम औषध आहे अजूनही संशोधन चालू आहे.

पूर्ण सिद्धा न होणारी माहीती वैद्यकीय क्षेत्रामध्ये अति प्रतिष्टीत जर्नलमध्ये प्रकाशित झाल्यामुळे या जर्नलच्या विश्वाहर्ता वर देखील प्रश्न निर्माण होतो. संशोधन क्षेत्र हे राजकारण, वशिलेबाजी, कुत्सितवृती, जलसी, द्वेष, लोभ, गर्व या सारख्या मानवी स्वभावापासून वेगळे ठेवणे किती महत्वाचे आहे याचे एक नवीन उदाहरण आपले समोर आले आहे. भारत असो वा अन्न कोणताही देश आयआयटी असो वा राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय संशोधन संस्था सर्वच ठिकाणी संशोधन करत असताना सशोधकान असे अनुभव आले असतील. एक संशोधक म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे आपण आपले अनुभव आणि या संशोधनबाबतीतले विचार ब्लॉग वर व्यक्त करावेत.  असे संशोधन होऊ नये म्हणून काय उपाय योजना आखल्या पाहिजेत असे आपनास वाटते?

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. The Lancet, a medical journal, retracts controversial study that concluded that hydroxychloroquine was dangerous for Covid-19 patients. Obviously a poor attempt to promote the competing antiviral drug, Remdesivir, which would make billions for their promoters. Huge cost differential between the two. Remdesivir treatment costs USD 4460 per patient. Hydroxychhloroquine is available at a fraction of that cost…Perhaps as low as USD 50 per patient.

    ReplyDelete
  2. Just research s have to do dovted research for man kind not for self kind

    ReplyDelete
  3. Researcha word sati use krne imp ahe..aapn aaple nav kranesti jr research krt asel tr tya ghosticha kahich upyog Nahi aapn aplya country sati tila save kranesti research asva...hech khare desh prem..

    ReplyDelete
  4. This race is dangerous yo human health

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 76 : कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

Corona Series Part 76 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि एन-९५ मास्कचा इतिहास कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कोरोना योद्धा मास्क आणि पिपिई किट दोन्हीचा वापर करतात. भारतामध्ये मास्कचा वापर सध्या मार्च पासून वाढला असला तरी मास्कचा ईतिहास जवळपास ३०० वर्षापासूनचा आहे. मानव मास्क कसा , कशासाठी वापरू लागला. याची माहिती घेऊया. १७२०च्या दरम्यांन मारसेलीसच्या चित्रामध्ये मास्कचा वापर केलेला आढळून येतो मास्क म्हणण्यापेक्षा तोंडावर कापड लावलेले दिसून येते. अंदाजे त्यावेळी बुबोणिक प्लेग आला होता लाखो लोकांचा मृत्यू होत होते परंतु मृत्युचे कारन समजण्यापलीकडे होते . कारण त्याकाळी अजूनही विषाणू/ जिवाणूची संकल्पना अस्थित्वात नव्हती. मरणोत्तर मानवी शरीराला येणार वास आणि त्यामुळे हवा खराब होत आहे अशी एक धारणा होती हवा ही या रोगास कारणीभूत आहे असे वाटू लागले त्याला मियासमा म्हंटले जात. या मियासमा संकल्पन

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांनी mRNA 1273 न

Corona Series Part 92 : कोरोना आणि Favipiravir

Corona Series Part 92 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि Favipiravir सुरवातीच्या काळात चीन पाठोपाठ सिंगापूर , जपान , कोरिया या देशात कोरोंनाचे संक्रमण झालेली आपल्याळ दिसून येईल. तेव्हा पासूंनच चीन , सिंगापूर , जपान , कोरिया आणि जपान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान आणि विविध शास्त्रामधील तज्ञ शास्त्रज्ञानाचा वापर करत नवीन संशोधन करत आहेत. या मधील Hydrocychloroquin, Remdesivir, Favipiravir, Lopinavir, Ritonavir ड्रग्स बरेच चर्चेत होते कारण या ड्रग्स ची चाचणी काहीअंशी यशस्वी होताना दिसत होती. भाग 3 , 47 , आणि 52 मध्ये या ड्रग्स बाबतीत सविस्तर उल्लेख केला आहे. फूजीफिल्मजी पूर्वी कॅमेरा मधील रोल बनवत होते त्यांचीच Toyama Chemicals कंपनीमरफट   जपानमध्ये सर्वात प्रथम Favipiravir बनवण्यात आले. दिनांक १८ मार्च २०रजी वुहाण मध्ये सर्वप्रथम Favipiravir ( Pyarzine derivative) ची ३४० रुग्णांवर ( clinical trials) करणात