Corona Series Part 78 :
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना, आणि लॉकडाउन शिथिल करण्यात घाई होते का ?
दिनांक ८ जुन २० म्हणजे उद्या पासून केंद्र शाशनाच्या
मार्गदर्शक तत्वानुसार भारतामध्ये लॉकडाउनचे नियम शिथिल होणार आहेत. परंतु हे नियम
शिथिल करण्याची वेळ आहे का असा एक प्रश्न काही लोकांच्या मनामद्धे निर्माण होतो, आता नाही तर मग कधी असे ही काही लोकांना वाटू लागले
आहे. मुळातच भारतीय नागरिकांची द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. समाजात
लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यावरून दोन मत प्रवाह आहेत. वाचकांना विनती आहे आपला
स्वतःचे विचार कृपया ब्लॉगवर पोस्ट करावेत. आज आपण कोरोनाची रुग्ण संख्या,तपासणी,
आणि लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे अर्था व्यवस्थेला चालना मिळणार आहे या मुद्यावर
चर्चा करू.
रुग्ण संख्या : आज ७ जुन रोजी भारात जागतिक पातलीवर ईटली ला मागे
टाकून ६व्या स्थानावर आहे. वाढत्या रुग्णाची संख्या आणि पावसाळा पाहता अल्पावधीमध्ये
प्रथम ३ स्थानावर जाण्याची दाट शक्यता आहे. आजपर्यंत २,४८,११४ रुग्ण बाधित असून
१,२१,८६७ सध्या संक्रमित आहेत. हा आकडा भारतीय लोकसंखेच्या मानाने कमी वाटतो पण
जागतिक पातलीवर कोरोनाने संक्रमित असणार्या ईतर देशांच्या तुलनेने जास्त आहे. अजूनही भारतामध्ये रुग्णांनाचा आलेख हा चढता आहे हा
आलेख अजूनही स्थिर (flatten)
झाला नाही. महाराष्ट्र, दिल्ली,
तमिळनाडू, गुजरात आणि राजस्थान ईथे १ दिवसागणिक
जवळपास १ ते २ हजार रुग्ण सापडत आहेत. केरळ सारख्या राज्यात कोरोनाची पहिली लाट सरून
दुसर्या लाटे मध्ये तीव्रता वाढलेली दिसत आहे आतापर्यंत दररोज दोन आकडी संखेमध्ये
रुग्ण सापडत होते मात्र काल एका दिवशी १११ रुग्णाची नोंद झाली आहे. भारतापेक्षा
प्रगतशील देश स्पेन, यूके, ईटली या सारखा देशांनी जेव्हा लॉक डाउनचे नियम शिथिल केला
तेव्हा त्यांचा रुग्ण वाढीचा आलेख स्थिरावला होता. उलट भारतामध्ये मात्र चडता आलेख
असताना नियायम शिथिल होणार आहेत.
तपासणी: तपासणीच्या बाबतीत कितिही उलट सुलट चर्चा झाली तरीही केंद्र
सरकारने समाधानकारक कार्य केले आहे असे म्हणावे लागेल ८ मे पासून प्रती दिन १ लाख
तपासण्या करण्याचे नियोजन केले. प्रती १०लाख लोकसंख्ये मध्ये १८० रुग्ण संक्रमित
आहेत आणि ३२८४/ प्रती १लाख लोकांची तपासणी केली जात आहे. आत्तापर्यन्त ४६,६६,३८६ तपासण्या केल्या गेल्या आहेत. जेवढ्या तपासण्या भारतामध्ये झाल्या आहेत तेवडी
स्पेनची लोकसंख्या आहे. आरोग्य विभागाच्या यंत्रणेला असलेला आत्मविश्वास कदाचित लॉकडाउन शिथिल करणायमद्धे हे
एक कारण असू शकते केंद्र सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे भारतामधील दुर्गम, डोंगरी, आदिवासी, नक्षली भागामध्ये आरोग्य सुविधा पोहोचायचा
आधी कोरोना जाऊन पोहोचला आहे. म्हणूनच शहरी निंमशहरी भागाबरोबर खेड्या पाड्यामध्ये
देखील तपासणी करणे महत्वाचे आहे. स्पेन ८६,०००/ १लाख, यूके ७६,०००/१लाख, आणि ईटली ६८,०००/१लाख, तपासण्या झाल्या आहेत यांचा तुलनेत भारतात तपासणी कमी झाली आहे म्हणूनच अमेरिकेचे
अध्यक्ष म्हणतात जर भारत आणि चीन मध्ये तपासनी वाढवल्या तर नक्कीच रुग्ण संख्या वाढेल.
अर्थव्यवस्था:
लॉक डाउन
शिथिल करन्यामागे प्रमुख कारण आहे ती म्हणजे अडचणीत आलेली अर्थव्यवस्था आज ग्रीन झोन
मध्ये बर्यापैकी दुकाने उघडली आहेत परंतु दुकाने जरी उघडली असली तरी म्हणावा असा व्यापार
अजूनही होत नाही आहे. ८ जून नंतर गर्दी होणारे दुकाने जसे मॉल, धार्मिक स्थळे, रेस्टोरंट आदी ठिकाणे उघडायची मान्यता देण्यात येणार आहे. दिल्ली मधील हॉटेलच्या संघटने नुसार लॉक डाउन शिथिल केल्या नंतरचे नियम हे लॉक डाउन मधील नियमानपेक्षा
जाचक आहेत. हॉटेल,
रेस्टोरंटचा वेळ कमी करण्यात आला आहे
तसेच महत्वाचा वेळी हॉटेल्स बंद असणारे आहेत. उद्योग धंद्याचि देसखील हीच व्यथा आहे.
केंद्र सरकारचा मार्गदर्शक तत्वे स्पष्ट नसल्याने गोंधळाचे वातावरन आहे. म्हणूनच लॉक
डाउन शिथिलकेल्या मुळे अर्थव्यवस्थेला नक्की मदत होईल असे वाटत नाही.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Tumche opinion correct ahe sirr..lock down strict rahavee... thanks sir 👍 for this information 👍👍
ReplyDeleteNeed to talk...
ReplyDeleteYes but we must need to learn with corona
ReplyDeleteSarv Jilhya Chya Sima Band Karun Parat 14 Divas Lockdown 1 Kela Pahije
ReplyDeleteLearn to live with corona
ReplyDelete