Skip to main content

Corona Series Part 76 : कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

Corona Series Part 76

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कोरोना योद्धा मास्क आणि पिपिई किट दोन्हीचा वापर करतात. भारतामध्ये मास्कचा वापर सध्या मार्च पासून वाढला असला तरी मास्कचा ईतिहास जवळपास ३०० वर्षापासूनचा आहे. मानव मास्क कसा, कशासाठी वापरू लागला. याची माहिती घेऊया.

१७२०च्या दरम्यांन मारसेलीसच्या चित्रामध्ये मास्कचा वापर केलेला आढळून येतो मास्क म्हणण्यापेक्षा तोंडावर कापड लावलेले दिसून येते. अंदाजे त्यावेळी बुबोणिक प्लेग आला होता लाखो लोकांचा मृत्यू होत होते परंतु मृत्युचे कारन समजण्यापलीकडे होते. कारण त्याकाळी अजूनही विषाणू/ जिवाणूची संकल्पना अस्थित्वात नव्हती. मरणोत्तर मानवी शरीराला येणार वास आणि त्यामुळे हवा खराब होत आहे अशी एक धारणा होती हवा ही या रोगास कारणीभूत आहे असे वाटू लागले त्याला मियासमा म्हंटले जात. या मियासमा संकल्पनेच्या आधारवार वास रोखण्यासठी लांब चोच असणारे मास्क युरोप खंडामध्ये तयार करून डॉक्टर वापरू लागले. या मास्क मध्ये पूर्ण चेहरा झळकल जाऊन नका समोर चोच असे याचा सहयाने डॉक्टर रुग्णाची तपासणी करीत विषाणू/ जिवाणूची संकल्पना माहीत नसल्याने आतापर्यंनात येणार वास रोखणे हे एकच ध्येय असे.

 

१८७०च्या दरम्यान संशोधकानी विषाणू/ जिवाणूची संकल्पना शोधून काढली, १७००चा काळा नंतर २०० वर्ष अशीच छोटे मोठे बदल करीत चोच असणारे वास किंवा खराब झालेली हवा टाळण्यासाठीचे मास्क बनत गेले. जेव्हा जिवाणूचा शोध लागून बरेच संशोधन होत गेले अश्यात रुमाला सारखे सर्जिकल माक्स वापरण्यास सुरवात झाली परंतु, न दिसणार्‍या कोणतीही गोष्ट मान्य करण्याची लोकांची मानसिकता लगेच बदलणे शक्य नव्हते. १९१० च्या दरम्यान उत्तरी चीन आणि रशिया यांचामध्ये सीमावाद असणार्‍या मंचूरिरा भागात प्लेगची साथ आली आणि या साथी मध्येच सध्याच्या एन-९५ मास्कची गोष्ट दडली आहे. या प्लेग मध्ये १००% मृत्यूदर होता २४ ते ४८ तासातच माणसाचा मृत्यू होत होता. या आजारावर उपचार शोधून काडणायची स्पर्धा चीन आणि रशिया यांचामध्ये सुरू झाली कारण जो देश या आजारपसून मुक्तता मिळवून देईल त्यांना या भागावर राज्य करण्याची संधि मिळनार होती. अश्यामध्येच चीन इंपेरियल कोर्ट ने तरुण केंब्रिज मधून शिकून आलेले डॉक्टर लीन-तेह-वू यांना रुजू केले. ते जेव्हा तेथील मरण पावलेल्या रुग्णाचे शवविछेदन करू लागले तेव्हा त्यांचा लक्षात आले, हा आजार हवा खराब (वास) असल्याने नाही तर हवेमध्ये असणार्‍या सूक्ष्मजंतूनमुळे मार्फत पसरत आहे. आणी म्हणून त्यांनी शवविछेदन करत असताना यूके मध्ये पाहिलेले काही मास्कचा अंदाज घेऊन स्वत:ह कापूस,आणि कापडयांचे स्तर करून मास्क बनवला जेणे करून हवा गाळली जावी. वयाने लहान आणि चीनी असण्याने त्याची या साठी बरीच अव्हेलना झाली. तसेच त्यांना तेथील स्थानिक भाषाही येत नसे. यांचा विरोधात काही डॉक्टर शवविछेदन करतान मास्कचा वापर न करताच काम करू लागले परंतु २ दिवसामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही घटना झाल्यावर लोकांच्या आणि खास करून हिणवणार्‍य डॉक्टर यांच्यामध्ये प्रकाश पडला आणि ईथुन पुढे डॉक्टर, नर्स ईतर कर्मचारी देखील मास्क वापरू लागले. शस्त्रक्रिया करताना ईतर वैद्यकीय काम करताना सर्वच ठिकाणी मास्कचा वापर करण्यात आला पुढे जाऊन याचे सर्जिकल माक्समध्ये रूपांतर झाले. प्रथम आणि द्वितीय विश्व युद्धंमध्ये देखील माक्सचा वापर करण्यात आला याचे रचना वेगळी होती. खानी मध्ये काम करणारे कामगार देखील मास्क वापरू लागले परंतु मास्क वापरणे त्रासचे होऊन बसले कारणं खानीमध्ये असणारे तापमान. सर्जिकल माक्स मध्ये हवेचे शुद्धिकरण केले जात नाही सध्या वापरत असणारा एन-९५ मास्क मध्ये मात्र हवा शुद्ध केली जाते म्हणून त्याला मास्क न म्हणता रेस्पिरेटर म्हंटले जाते. १९७०च्या दरम्यान एकवेळ वापरण्यासाठी उपयुक्त रेस्पिरेटर धूळ, प्रदूषना पासून वाचन्यासाठी करण्यात येऊ लागला. ३एम नामक अमेरिकान कंपनीच्या एन-९५ मास्क ला २५ मे १९७२ रोजी मान्यता देण्यात आली. परंतु सध्या असणारे मास्क आपण एकसारखा ८ पेक्षा जास्त वापरू शकट नाही. या मास्कमध्ये हवा गाळली जाते. आणि पार्टिकल जसे अडकत जटिल तसे हवा शुद्ध यू लागले परंतु प्रमाण कमी होते त्यामुळे गुदमरल्या सारखे होऊ शकते. तसेच लहान चेहरा  असणारे आणि लहान मुलांना हा मास्क बसत नाही कारण सर्व बाजूने हा मास्क बंद असला पाहिजे फक्त फिल्टर मधूनच हवा आत बाहेर जाने गरजेचे आहे. आजरोजी ही परिपूर्ण मास्क विकसीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे येणार्‍या काळात परिपूर्ण मास्क मिळतील हीच अपेक्षा.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...