Corona Series Part 74
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना, आणि थुंकणे
भारतीय लोक पर्यटनासाठी युरोप, अमेरिका सारख्या खंडामध्ये तसेच विविध प्रगत देशात
जातात. प्रवास करून आल्यावर प्रवास वर्णनामध्ये त्या देशातील सार्वजनिक स्वच्छता बाबतीत
हमखास चर्चा होते. परदेशात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका केल्यास किती दंड आहे तेथील लोक कसे नियम पाळतात. आपणही विदेशात असताना
नियम तंतोतंत पाळतो,
परंतु परतीच्या प्रवासात भारतीय
विमानतळावर पाय ठेवला की ईथले नियम, सार्वजनिक स्वच्छताचे
गांभीर्य याचा आपणास तुरंत विसर पडतो. आणि याही पुढे जाऊन परदेश कसा स्वच्छ आहे आणि
आपला देशात कशी घाण आहे या विषयावर चर्चा करण्यात आपण प्रमुख वक्ता होऊन जातो. मुळात
देश स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांचीच असली तरीही काही लोकांच्या गुणसुत्रामध्ये
नियम मोडन्याचा जिनोम ठासून भरलेला असतो. असो, आपणास ज्ञात आहे कोरोना हा साथीचा आजार आहे. थुंकणे या प्रक्रियेमुळे आजार पसरण्यामध्ये
मदत होते.
भारातमध्ये थुंकणे ही एक प्रक्रिये नसून आपल्या जीवनशैलीचा
एक भाग बनून गेला आहे. काही उदाहरणे पाहूया मराठी, हिन्दी भाषेत काही म्हणी
प्रचलित आहे. थू थू करना, थूक कर
चाटणा, छि थू करणे, तसेच थुंकणे हा एक अंधश्र्धेचा भाग देखील आहे रस्त्यावर बर्याचवेळा
उतारा (लिबू मिरची) पडली असल्यास तिथून व्यक्ति मार्गस्थ झाला तर तो व्यक्ति पुढे जाऊन
थुंकतो. नोट मोजताना, पुस्तके, वही यांची पाने पलटताना, बस वाहक तिकीट देत असताना, घाणेरडा वास आला, विविध खेळ खेळताना अशी बरीच कार्य आहेत जिथे नकळत थुंकीचा वापर केला जातो.
समाजात सर्वात मोठी थुंकन्याची प्रक्रिया पार पडते ती म्हणजे गुटका, पान, मावा,
खाणार्या
आणि सिगरेट ओढणार्या लोकांच्या मार्फत. असले पदार्थ खाऊन थुंकने म्हणजे त्या व्यक्तीस प्रतिष्ठाचे
वाटू लागले आहे. कोणी थुंकन्यामुळे होणारे तोटे सांगण्यास गेलाच तर अस्सल कोल्हापुरी
विशेषणे आपल्याला ऐकवली जातात.
मागील 2 महीने लॉकडाउन असल्याने अश्या गोष्टींचे प्रमाण
कमी होते परंतु लॉकडाउन शिथिल झाल्यावर अश्या जीवनशैलीचे अनुसरण जर करायचे असेल तर मागील 2 महीने
पाळलेली संचारबंदी पाण्यात गेल्याशिवय राहणार नाही कोरोना पसरायचा तसा पसरनारच. व्यक्ति
थुंकताना त्याच्या थुंकीमध्ये लाळ असते आणि शास्त्रीय दृष्ट्या कोरोना सारखा विषाणू
लाळेमध्ये असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोनाच काय क्षय रोगाचा जिवाणू असो किवा एचआयव्ही
असे ईतर जिवाणू/ विषाणू देखिल थुंकीमध्ये असताता. थुंकीमुळे आजार पासरवनारे विषाणू
आसपासच्या वातावरनामध्ये दबा धरून बसतता आणि जास्तीतजास्त लोकांना संक्ररमन होण्याचा
धोका वाढतो. आपनास थुंकणे अनिवार्यच असेल
तर त्याची योग्या विल्लेवाट लावणे ही देखील आपलीच जबाबदारी आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या बाबतीत
बरेच कायदे नियम पारित झाले. प्रत्येक राज्य सरकारचे स्वतहाचे नियम आहे. मद्रास हेल्थ
अॅक्ट १९३९, पासून ते नुकताच महाराष्ट्र सरकारने
जाहीर केलेला नियम आणि दंड असो. परंतु या नियम आणि दंडचा परिणाम होतणा दिसत नाही भारतीय
जनतेची दंड तुरूंगवास भोगन्याची मानसिकता बनली आहे. नुकतेच कोल्हापूरमध्ये थुंकन्यामुळे
वाद विवाद होऊन दंड तुरूंगवास झाल्याचे उदाहरण समोर आले आहे. या जीवनशैली मधून समाजाला
कसे बाहेर काडता येईल या बाबतीत आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा प्रत्येक
भारतीयाने थुंकन्याची सवय मोडली तर देशासाठी मोलाचे योगदान ठरू शकते.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Nice information sir.👍👍.. thanks sir 👍
ReplyDeleteNice explanation and deep study
ReplyDelete