Skip to main content

Corona Series Part 70 : कोरोना, आणि अश्वगंधा

Corona Series Part 70

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, आणि अश्वगंधा

वैश्विक महामरी कोरोनावर जगभरात सर्व प्रकारच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये इंग्लिश औषधे म्हणजेच अॅलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद या सर्वच क्षेत्रामध्ये जोरदार संशोधन चालू आहे. भारतीय संस्कृतीमध्ये योग आणि आयुर्वेदाचे महत्व अनन्य साधारण आहेच परंतु भारतीय लोकावर वर्षनूवर्षे चालल आलेली परकीय आक्रमणे आणि आपल्या संकृतीवर झालेले आघात या मधून भारतीय मानसाच्या गुणसूत्रामध्ये गुलामगिरीचे बीज रोवले गेलेलं आहे त्यामुळे आपल शस्त्र, शास्त्र आपल्याच लोकांना भरोसाचे वाटत नाही या उलट आपल्या संस्कृतीचा अभ्यास करून परिकीय भाषेत त्याचे भाषांतर करून कागदोपत्री सत्यात आणलेली औषदे मात्र आपण डोळे झाकून खातो. अर्थात बरोबर असेलही पण यामुळे आयुर्वेदाचे महत्व काही होत नाही. याच गोष्टी लक्षात घेऊन २०१४साली केंद्र सरकारने आयुष मंत्रालायची स्थापणा केली आणि भारतीय मुळ असणार्‍या आयुर्वेदिक औषदे आणि चिकित्सा प्रणालीची जागा भारतीय नागरिकांचा मनातनव्याने निर्माण करण्याचे योजले. आयुर्वेदिक संशोधनामध्ये म्हणवा तेवडा खर्च जरी केला नसला तरी काही अंशी यश मिळवले आहे.

सध्या कोरणाचा महामारीमध्ये रोगप्रतिकारक शक्ति मजबूत करण्यासाठी आयुष मंत्रालयाचा काडा नागरिकांना देण्याचे नियोजन आयुर्वेदिक विद्यापीठाच्या माध्यमातून सूरु आहे, घरगुती उपाय देखील चालू असतात जसे हळद मिश्रित दूध, नाकात कानात तिल तेल घालणे, ईत्यादी त्याच बरोबर भारत आणि जपान यांचा संयुक्त विद्यमाने आयुर्वेद आणि कोरोना विषाणू वर संशोधनाचे काम सुरू आहे. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलजी, DIALAB आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ अडवांस इंडस्ट्रियल सायन्स अँड टेक्नॉलजी जपान यांनी नुकताच एक संशोधन जर्नल ऑफ बायो मॉलीक्युलर स्ट्रक्चर अँड डायनमिक्स या मध्ये प्रसिद्ध केले.

अश्वगंधाचे शास्त्रीय नाव Withania Sommnifera, indian winter cherry अश्वगंधाचे मूळामध्ये विषाणूशी सामना करण्याची क्षमता आहे तसेच सर्दी, ताप, खोखला तसेच श्वसन संस्थेशी निगडीत सर्व आजारावर गुणकारी आहे. रोजच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ति बळकट होते.

अश्वगंधा सोबात प्रोपोलीसजे मधुमक्षीच्या मधून स्रावले जाते. संशोधणा नुसार अश्वगंधा आणि न्यूझीलँड मधील प्रोपोलीया आयुर्वेदिक औषधामध्ये कोरोनाशी सामना करण्यासाठी आवशक्य असणारे Withanon आणि प्रोपोलीसमध्ये Caffeic Acid Phenyl Ester (CAPE) नावाचे नैसर्गिक रसायन कोरोनाशी सामना करण्यात उपयुक्त आहे.  ही रसायने (एंजाईम) कशी काम करतता ते पाहू.

कोरोना विषाणूच्या पृष्ट भागावर एस प्रोटीन, ई प्रोटीन, मेन प्रोटीन असे तीन प्रोटीन असतात. या मधील एस प्रोटीन मानवाच्या एसीई-2 प्रोटीनशी जुळतात आणि कोरोना मानवाचा पेशी मध्ये प्रवेश करतो आणि (M Protein) नावाचे प्रोटीन कोरोंनाची प्रतिकृती बनवण्यास गरजेचे असते. Withanon, CAPE हे रसायन नेमक्या याच प्रोटीनचे काम बंद पाडण्याचे काम करतता त्यामुळे विषाणूची प्रतिकृती बनण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणून, विषाणू पासून होणारे संक्रमण रोखले जाते. अश्या प्रकारचा अभ्यास संशोधना मधून समोर आला आहे. या अभ्यासमुळे कोरोना विरोधात नवीन प्रतिबंधात्मक उपाययोजना आमलात येऊ शकेल. भविष्य काळात आयुर्वेदाची महती सार्‍या जगासमोर आणायची असल्यास आयुष मंत्रालायचा मार्फत आशे संशोधन करून प्रसिद्ध होणे गरजेचे आहे आणि असे झाल्यास सर्वसामान्य नागरिक देखील सहज आयुर्वेदिक औषधा कडे ओढला जाईल.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. Yes, Ayurveda is the origin of medical science... Just needs to be presented before the modern world with experimental proofs...

    ReplyDelete
  2. आयुर्वेद इतर शास्त्रा पेक्षा वेगळं आहे आजाराचे समूळ नाश करते

    ReplyDelete
  3. Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete
  4. जपानी नियतकालिका मधला संदर्भ देऊन महा भारतीय वैद्यांचे चिंतनाची दिशा ठरवण्याचे महत्वाचे काम या लेखातून होऊ शकते. आयुर्वेदाची महती मांडण्याचे तीन उपाय आहेत, 1. रुग्णाला बरे करून त्याचे रुग्णपत्रक संशोधन कार्यासाठी साठवून ठेवणे.
    2. आयुर्वेदिक औषधांचे या लेखामध्ये दाखवले आहेत असे विश्लेषण करून ठेवणे. 3. रस, गुण, वीर्य, विपाक, प्रभाव या कार्यकारी घटकांचा रिसर्च मेथोडोलॉजीस्टनी नीट अर्थ समजावून घेणे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...