Skip to main content

Corona Series Part 67: कोरोना, आणि ब्राझील

Corona Series Part 67

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, आणि ब्राझील

 फूटबॉलची पढरी म्हणून जगप्रसिद्ध असणारा देश म्हणजे ब्राझील. दक्षिण अमेरिका मधील आणि जगामध्ये क्षेत्रफळाचा दृष्टीने 5 व्या स्थानावर असणारा २१करोड लोकसंखेचा देश. जगाला प्राणवायू देणारा देश अशी ज्याची ख्याति आहे परंतु ही ख्याति बदलून आता कोरोना विषाणूशी सहज सामना करू शकतो असा अति आणि फाजील आत्मविश्वास बाळगल्यामुळे कोरोना सोबत चालू असणार्‍या युद्धामद्धे लोटांगण घालणारा देश अशी प्रतिमा बनली आहे. सारे विश्व कोरोनामुळे लॉकडाउन जरी असला तरी ब्राझील मात्र लॉकडाउन झाला नाही उलट जगाची लॉकडाउन करण्याची पद्धत म्हणजे एखाद्या फ्लू सारख्या विषाणू समोरील ओवर रिएक्शन आहे असे या देशाच्या पंतप्रधांनानचे मत आहे. कोरोना ही एक वैश्विक महामारी आहे अश्या निष्काळजी पनाची किंमत ब्राझील भोगतोय परंतु सार्‍या जगाला पुन्हा कोरोनाच्या खाईत नेऊ शकतो.

ब्राझीलमध्ये सध्या कोरणाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहे. आज रोजी ३,९४,५०७ रुग्ण असून २४५९३ मृत्यू झाले आहेत. असाच आकडा वाढत राहिला तर अमेरिकेलाही मागे टाकून ब्रझिल प्रथम क्रमांकावर पोहोचेल. जास्तीतजास्त तपासण्या झाल्या असतील असे आपणसा वाटू शकेल परंतु आता पर्यन्त ७ ते ८ लाख तपासन्या झाल्या आहेते भारताचा तुलनेने देखील या तपासण्या कमी झाल्या आहेत. तरीही रुग्ण संख्या वाढत आहे याचे काय कारणं शोधले तर ब्राझील सरकारचा फाजील आत्मविश्वास, निष्काळजीपणा, चुकीचे धोरणे या सार्‍यामुळे ब्राझीलमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. ब्राझीलमधील जवळपास १.३करोड लोकसंख्या फावेलास (झोपडपट्टी) मध्ये राहते ईथे सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळणे आतिशय अवघड आहे सामाजिक संसर्ग होण्यास मदत होऊ शकते. तसेच अमेझोन सारखी मोठी नदी शेजारी आदिवासी जमातीचे लोक रहाताता यांचा मध्ये कोरोना विषाणू बाबतील जनजागृती करणे वेळ खाऊ आणि अवघड काम आहे.

ब्राझीलचे माननीय पंतप्रधान बोलसेनारोच्या विचारानुसार कोरोना विषाणू म्हणजे एक साधा फ्लूचा विषाणू आहे त्या साठी सारी अर्थव्यवस्था थाबंवणे गरजेचे नाही. स्वत:ह पंतप्रधान ब्राझीलमध्ये होत असणार्‍या लॉकडाउनच्या विरोधात आंदोलन करणार्‍याच्या काळपात सामील झाले. मंत्रिमंडळातील सारेच लोक बोलसेनरो सारखे विचार करणारे नाहीत, ब्राझीलचे आरोग्य मंत्री लुईज हेंरिकूए मानिदेत्ता यांना कोरोनामध्ये होत चाललेल्या गंभीर परिस्थितीचा अंदाज आला असल्याने पंतप्रधानाना सल्ला देण्यास गेल्यावर पक्षातून काढून टाकण्याची धमकी दिली गेली, आणि पुढे जाऊन केले ही तसेच. आज जगभरातून पंतप्रधानांच्या कार्याची टीका केली जात आहे याचा नकारात्मक प्रभाव ब्राझीलच्या परराष्ट्राचा संबंधावर पडत आहे. ब्राझीलमध्ये कोरोंनाचा विळखा वाढला असला तरी येथील सरकार मात्र याचे खपार चीन वर फोडण्यात व्यस्त आहे पंतप्रधानाचे चिरंजीव चीन विरुद्ध प्रतिक्रिया देत आहे चीन असले आरोप खपून घेत नाही सर्वज्ञात आहे त्यामुळेच ब्राझीलमधील चीनचे अधिकारी म्हणतात बोलसणारो परिवार म्हणजे ब्राझीलसाठी एक विष आहे. आरोप प्रत्यरोप करण्याची ही वेळ नाही हे समजण्या ईतके दोन्हीही देशाचे राजकीय नेतृत्व सक्षम नाही का?

माननिय पंतप्रधानाचा ब्राझील लॉकडाउन न करण्या मागचा हेतु आपण लक्षात घेतला तर २०१५ साली ब्राझील मोठ्या आर्थिक अडचीनी मधून नुकताच बाहेर आला आहे २०२० साली ब्राझीलचा विकास दर हा वजा (-४%) असण्याचा अंदाज वर्तवला जातोय असण्या वेळी लॉकडाउन केला तर विकास दर अजून खाई जाऊन कोरोना ऐवजी लोक उपासमारी आणि भुकमरी ने मारतील असा विचार करून ब्राझील लॉकडाउन न करण्याचा निर्णय घेतला गेला. म्हणजेच ब्राझील प्रशासना समोर ईकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिति होऊन बसली आहे. भारत आणि ब्राझील यांचे मैत्रीपूर्ण आणि व्यापारी सबंध राहिले आहेत. कोरोंना पूर्वी १२ अब्ज डॉलरचा व्यापार होत असून त्यातील ८ अब्ज डॉलरची भारताकडून ब्राझील आयात करतो. तसेच २६ जानेवारी २०२० च्या प्रजासताक दिनी बोलसणारो हे प्रमुख पाहुणे होते. भविष्यात देखील कोरोनाचा प्रभाव पाहता भारताने ब्राझीलचे मार्गदर्शन करणे गरजेचे वाटू लागले आहे.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग,

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

https://ajinkya1030.blogspot.com

 


Comments

  1. वास्तविकतेचि जाण करून देणारा लेख. काही देशांना अर्थव्यवस्था महत्वाची वाटली म्हणून त्यांनी निर्बंध नाहीत लादले ते आता त्याची फळे भोगत आहेत. आशा करूया जग लवकर यातून बाहेर पडेल.
    जनजागृती करणारा असा लेख आहे. शुभेच्छा 👍💐

    ReplyDelete
  2. Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete
  3. Nice information sir thank you so much

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...