Corona Series Part 58
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social
Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com
कोरोना, मिशन सागर, वंदे भारत आणि ऑपरेशन समुद्र सेतु
भारताच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण तीनही दिशेला बंगालचा उपसागर, हिन्दी महासगार, अरबी समुद्र आहे. या समुद्रामध्ये
भारताच्या जवळ धोरणात्मक महत्व असणारे बरेचशे छोटे देश, श्रीलंका, मालदिव, श्रीशैल, मोरीशीस, मादागास्कर, कोमरोस ईत्यादी टापू आहेत इथे
देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बरेचशे देश हे शेतीप्रधान नाहीत लॉकडाउनमूळे या
देशांना होणारी पुरवठा साखळी खंडित झाली आहे. असेच चालू राहिले तर या ठिकाणी
कोरोंनापेक्षा उपासमारीचे प्रमाण वाढेल. याचा विचार करून हिंदी महासागरा मधील
श्रीशैल, मोरीशीस, मादागास्कर, कोमरोस, मालदिव या आर्कीपेलगो देशांनी भारत सरकारला विनंती केली. भारत नेहमीच या
देशांसाठी प्रथम मदतकर्ता ठरला आहे मागील वर्षी देखील डीआरडीओ च्या अंतरगत सागर
मैत्री मिशन आखले गेले होते (MAITRI) Marin & Allied Interdisplanry Traning & Research Institute. या ही वेळी देखील ही विनंती
मान्य करून परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन
समुद्र सेतु आणि मिशन सागर आमलात आणले. या मधील ऑपरेशन समुद्र सेतु हे ऑपरेशन वंदे
भारतचाच एक भाग आहे.
मिशन सागरमध्ये आयएनएस-केसरी या नौकेच्या माध्यमातून मालदिव, मोरेशीयससाठी ६०० टन खाद्य पदार्थ, कोरोंनासाठी लागणारयी औषधे, आयुष मंत्रालय मार्फतची विशेष आयुर्वेदिक औषदे, तसेच डॉक्टरयांची टीम. श्रीशैल, कोमरोस, मादागास्करसाठी hydroxichloroquine औषध तसेच डॉक्टरयांची टीमची
व्यवस्था केली आहे. अश्या प्रकारे मदत करून भारताला काय सध्या होत असेल हा एक
प्रश्न काही लोकांच्या मनात येत असेल. या मदतीमध्ये मानवता हा एक दृष्टीकोण आहेच
त्याच बरोबर भारताची सौम्य शक्ति वाडण्यास मदत होते. जागतिक स्तरवर संयुक्त
राष्ट्र व ईत्यादि ठिकाणी हे देश भारत एखादा मुद्दा मांडतो तेव्हा भारताचा बाजूने
उभे राहू शकतात. ही गोष्ट चीन ला पक्की माहीत आहे त्यामुळे चीनने देखील या देशांना
कर्जाचा, बेल्ट अँड रोड ईत्यादी माध्यमातून
मादा केली आहे परंतु त्या बदल्यात या छोट्या देशा मध्ये चीन आपली नोसेनाचे स्थानक
निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते हा धोका ओळखून देखील भारत या देशांना मदत करत
असतो.
वंदे भारत अभियान मधून विविध देशातील १.९०लाख लोकांना भारतता आणले
जाणार आहे. या मध्ये विद्यार्थी, खाडी देशातील
भारतीय कामगार यांचा समावेश आहे. ७ मे ते १४ मे च्या दरम्यान ६४ विमानातून कतार, सौदी, बांग्लादेश, ओमान, अमेरिका, यूके ईत्यादी देशातून १४,८०० लोकांचे स्थलानतरण केले गेले. या मध्ये भारतीय विमान सेवा देणारी एयर
इंडिया च प्रमुख सहभाग आहे त्याच बरोबार भारतीय हवाई सेनेचे super Herculas C130J, Globemaster या विमाचा वापर केला जाणार आहे.
विविध देशातील दूतावास मार्फत यादी करण्यात आली आहे. विशेष करून ज्या लोकांच्या
घरात मृत्यू झाला असेल, गर्भवती स्त्रिया, ज्या कामगारांची कोरोनामुळे नोकरी गेली आहे आणि
विद्यार्थी विसा संपलेले याना प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु प्रवास करताना
भारत सरकारने बनवलेले मार्गदर्शक तत्वे तंतोतंत पाळावी लागणार आहे जसे आरोग्य सेतु
वापरणे, सपूर्ण चाचणी केली जाणार आहे
लक्षणे असतील तर प्रवास बंदी केली जाणार आहे. त्याच बरोबर या लोकांचे विलगिकरण
करण्यात येणार आहे. या प्रवासासाठी आणि विलगिकरण मध्ये राहण्यासाठी या लोकांना
पैसे मोजावे लागणार आहे त्याचे कारण असे की बर्याच राज्य सरकारांनी घरी विलगिकरण
करण्याचा विरोध केला. या मुळे आलोचना देखील झेलावी लागली कारण खाडी देशातील कामगार
आणि विद्यार्थी परदेशी कमवा आणि शिका योजनेत होते त्यांच्यावर आधीच आर्थिक संकट
ओढावले आहे. परंतु कोरोंनाचे संकट पाहत लोक भारतता येत आहे हेच अधिक आहे. जसे
भारतातिल लोक भारता बाहेर आहेत तसे भारतता असणारे परदेशी लोकांना देखील त्यांचा
देशात त्या देशाचा समती नंतर सोडण्यात येणार आहे.
ऑपरेशन समुद्र सेतुच्या माध्यमातून मालदिव मध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना भारतात
आणणे हे उदीष्ट समोर ठेऊन आयएनएस-जलश्व, आयएनएस-मगर, या
नौका मधुन ७५० भारतीयांना भारतात आणले. मालदिव मध्ये २०,००० पेक्षा अधिक भारतीय लोक आहेत परंतु या ऑपरेशन च्या मधमातून प्रवासी, आणि आर्थिक अडचणीत असणारे भारतीय प्रवास करणार आहेत.
आयएनएस-जलश्व नौकेची क्षमता १७,५२१ टन असून ही
अमेरिकन बनावटीची आहे. अमेरिका देखील हे नौका वापरते भारतीय नोसेना मध्ये २००५
साली वापरात आणली गेली. तसे पाहत या नौकेची क्षमता अधिक आहे परंतु सध्या
कोरोंनाच्या काळात सामाजिक अंतर राखत प्रवास करणे गरजेचे आहेत याचा विचार नौसेने
केला आहे आपणास माहीत असेल भारतीय नोसेनेचा दर्जा उच्च आहे या अनुसरून या नौकेत
वैद्यकीय सहायता कक्ष, लॅब, दाताचा दवाखाना, आणि ४ ऑपरेशन थेटर आणि
नौका निर्जंतुक केली गेली आहे. या मनाने मगर नौका भारतीय बनावटीची असून
१९८७ पासून भारतीय नोसेनेत सेवा बजावत आहे. याची क्षमता ५,५७०टन ईतकी आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज
कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
ajinkya1030.blogspot.com
Nice Sir... 👌👍
ReplyDeleteNice information sir 👍 thanks sir 👍👍
ReplyDeleteBest
ReplyDelete