Corona Series Part 57
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social
Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com
महिला, पुरुष आणि कोरोनाची बाधा
कोरोना हा विषयावर शास्त्रीय दृष्ट्या विविध प्रकारचे
संशोधनाने जोर धरला आहे. कोरोनाच्या वैश्विक महामारीने पृथ्वीतलावरील विविध भागात, वेगवेगळ्या जिवनशैलीत राहणारे स्त्री, पुरुष,
अर्भक, तरुण, वृद्ध सार्यांना आपल्या विळख्यात अडकवले आहे परंतु मृत्यू मात्र वृद्ध
लोकांचे आधिक होत आहेत. बाधित होणार्या लोकांचा अभ्यास करतान कोरोंनाची बाधा का, कशी, कशामुळे, कोणत्या मार्गाने, कोना मार्फत होते या एककचा विचार चालू आहे कारण आजारचे मूळ शोधून काडण्यात या
सार्या घटकांची माहिती असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्या साठी वैद्यकीय विज्ञानाला
संखीकीची साथ मिळात आहे. मानव जाती मध्ये महिला आणि पुरुष अश्या दोनच जाती आहेत
आणि म्हणून तुलनात्मक दृष्ट्या या दोन्ही जातीचा सकल अभ्यास केला असता महत्वाची
माहिती संशोधकाना हाती लागू शकते. चीन,
यूरोपियन देशात या बाबतीत संशोधन सुरू आहे आणि त्यातील काही माहिती नुकतीच
प्रसारित झाली आहे. या संशोधनानुसार कोरोंनाची बाधा महिलाच्या पेक्षा
पूरुषानमध्ये अधिक होत असल्याचा आकलन अभ्यासातून बाहेर आले आहे.
मार्च महिन्यात चीन मध्ये झालेल्या Jian-Min Jin et.al आणि ईतर जसे Clare Weanham et.al यांनी The Lancet या सुप्रसिद्ध जर्नलमध्ये आपला शोधनिबंध (Covid 19: Gender Impact of the outbreak) प्रसिद्ध केला. या नुसार ५८.१% पुरुष आणि ४१.९% महिलामध्ये कोरोनाचे संक्रमन
आढळून आले आहे. तसेच मृत्यू मध्ये देखील पुरूषांचे प्रमाण आधिक आहे. यूरोपियन
देशातील संशोधक Izigh
E et.al यांनी
१४८५ पुरुष आणि ५५७ महिलांवर अभ्यास केला या संशोधनात पुरुषांच्या मृत्युचे
प्रामान अधिक असण्यामागील कारणे सांगितली आहे. यासाठी प्रामुख्याने AES-2 सर्फेस प्रोटीन कारणीभूत असल्याचे समजते.
पुरुषाच्या रक्ताची चचणी केली असता AES-2 सर्फेस प्रोटीनची मात्रा महिलांच्या तुलनेत पुरुषांनमध्ये आधिक सापडली. Angiotensin-Converting Enzyme (AES-2) चे प्रमुख काम शरीरात रक्ताचा दबाव नियंत्रित करन्यास मदत करणे हा आहे.
धमण्यान मध्ये थोडी शिथिलता आणणे. Vasodilation. या
प्रक्रियेला endocytosis म्हणतात. AES-2 सर्फेस प्रोटीन एकप्रकारे कोरोंना विषाणूला आपल्या
पेशी मध्ये प्रवेश घेन्याची मान्यता देते. जसे कुलूपा मध्ये किल्ली बसावी तश्या
प्रकारची जुळना येथे होते. सध्या या प्रोटिन आणि विषाणू मधील संलग्नता कशी विलग
केली जाईल किंवा अडथळा आणणे यावर औषध विकसित करण्याचे कार्य चालू आहे.
शरीरातील फुफुसे, हृदय, किडनी आणि पुरुषांमध्ये असणार्या
वृषनामधील पेशीत या प्रोटिनची मात्रा अधिक असते नैसर्गिक महिला आणि पुरुष
यांची रचना भिन्न असल्याने या प्रोटीनची मात्रा तुलनेने महिलन मध्ये कमी
असते.
Western Journal of Emergency Medicine या मध्ये मानवाच्या गुणसुत्राचा
अभ्यास मांडला आहे. रोगप्रतिकारक शक्तिचा गुण हा X chromosome वर असतो. महिलांमध्ये २४ व्या गूण सुत्राची जोडी XX असून पुरुषा मध्ये XY असे संयोजन असते. म्हणजेच रोगप्रतकारक गूण हा महिला मध्ये पूरुषा पेक्षा अधिक
असतो. आणि म्हणूनच महिलापेक्षा पुरुष अधिक बाधित होत आहेत. या सारखी संशोधना मधून
काही कारणे समोर आली आहेत. तिसरे प्रमुख कारण म्हणजे सिगरेटचे सेवन पुरुष
महिलांपेक्षा आधिक सिगरेटचे सेवन करतात त्यामुळे त्यांचे फुफुस अशक्त असते. मृत्यू
झालेल्यान मध्ये फुफुसाचे, आजार श्वसनाचे
आजार असणारे लोक अधिक बळी पडले आहेत.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज
कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
Nice information sir 👍👍 thanks sir 👍
ReplyDeleteNice information Sir.... 👌👌👍👍
ReplyDelete