Skip to main content

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.  या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.   https://ajinkya1030.blogspot.com

 

कोरोना, आणि ई-शिक्षण

मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा, कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १०, १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या. आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल. 

नैसर्गिक आपत्ती महापुर, वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी, काही सरकारी शाळा, कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम, गूगल क्लासरूम, गूगल डॉक, यू ट्यूब, व्हाट्स अप, टेलिग्राम, टेस्टमोझ सारख्या विविध माध्यमाचा वापर केला आणि वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, कारण शिक्षक आणि विद्यार्थी याच्यासाठी सोशल डिस्टन्सिंग सांभाळात विद्यादानाचा ई-शिक्षण हा एकच पर्याय समोर दिसत आहे. अशी परिस्थिति भविष्यात पुढे देखील येऊ शकते हे ओळखून येणार्‍या काळात ई-शिक्षण प्रणाली विकसित होणार त्यात शंकाच नाही. भारतामध्ये कायमस्वरूपी ऑनलाइनचा वापर करायचा झाल्यास काही फायदे तोटे निश्चितच असणार आहेत त्याच बरोबर आज असणारे ऑनलाइनची साधने या बाबतीत चर्चा होणे आवशक्य आहे जेने करून भविषयात योग्य असा तोडगा काडता येईल.

सर्वप्रथम डिजिटल पायाभूत सुविधा हा ऑनलाइन वर्ग घेण्यासाठीचा कणा आहे. या मध्ये प्रामुख्याने तिन सुविधांची आवशक्यता भासते. १ वीज (Electricity) २ स्मार्ट फोन, कम्प्युटर ईत्यादी उपकरणे ३ इंटरनेट त्याचा वेग आणि दर्जा या तिन्हिहि सुविधांची भ्रारतातील परिस्थिति चा आढावा घेऊया.

वीज :  भारत सरकारचा यंत्रने नुसार भारताच्या ९९% क्षेत्रात वीज पुरवली गेली आहे. अर्थात सरकारी धोरणानुसार एखाद्या गावात एका घरात देखील वीज आली असेल तर वीज पुरवठा पोहोचला आहे असे समजले जाते. त्यामुळे मुळात एका गावत किती घरात वीज पोहोचली हा प्रश्न गंभीर आहे. शहरी आणि निमशहरी भागात वीज असली तरी भारनियमन आहेच. उन्हाळ आला तर ही समस्या अधिकच बळावते. भारत सरकारच्या अंत्योदय योजणे अंतर्गत झालेल्या एक परीक्षणा नुसार २०% घरात दिवसातील ८ तासापेक्षा कमी वेळ वीज उपलब्ध आहे तसेच ४७% घरात फक्त १२ तास वीज असते. जनरेटर चा वापरा प्रदूषण करणारा आणि न परवडणारा असून यूपीएसचा वापर देखील तोडकाच असेल. अश्या तोडक्या वीज पुरवठा मध्ये ऑनलाइन शिक्षणाची योजना आखली तरी त्याचा पूर्ण परिणाम मिळणार नाही बरीचशी मुले वीजे अभावी शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे सर्वप्रथम घर घर वीज २४ तास पोहोचवणे हे आव्हान असणारा आहे.

इंटरनेट, स्मार्ट फोन, कम्प्युटर उपकरणे

२०१८ साली झालेल्या परीक्षणानुसार २४% लोकसंखेकडे (१/३) स्मार्ट फोन आहेत. कम्प्युटरच्या तुलनेने स्वस्त असणारे स्मार्ट फोनची संख्या कमी असेल तर लॅपटॉप, आणि कम्प्युटर घरी असण्याची संख्या याहून नक्कीच कमी असेल. या मध्ये देखील एकाच घरात २ किवा अधिक मुळे असतील तर घरात असणारा एकमेव कम्प्युटर/ स्मार्ट फोन कोणाला वापर्‍याला द्यावा. भारतात असे बरेच पालक आहेत ज्यांना शिक्षणाचा महत्व नाही किंवा असून देखील शिक्षण देता येत नाही, हे पालक ४,५ तास आपल्या मुलांना आपला स्मार्ट फोन देतीलच असे नाही. ई शिक्षण सुरू असतांना स्मार्ट फोन वरती कॉल येऊन चालणार नाही. आणि त्यातूनही फोन, कम्प्युटर मिळालाच तरी इंटरनेट डेटा त्यासाठी मोजावी लागणारी किंमत सगळ्यांनाच परवडेल असे नाही. सरासरी भारतात स्मार्ट फोन असणार्‍याना १ जीबी डेटा सहज उपलब्ध आहे. लॉकडाउनच्या काळात जागतिक स्तरावर इंटरनेटचा वेग १८% कमी झाला आहे असे स्पीड टेस्ट या वेबसाईटच्या अभयसातून समोर आले आहे. खिशाला परवडेल एवड्या डेटा आणि वेगामध्ये ऑनलाइन वर्ग होणे शक्य वाटत नाही.

National Statistic Office (NSO), राष्ट्रीय सांखिखी विभागाच्या परीक्षणानुसार (key Indicator of Household Social Consumption on Eduction in India 75thRound जुलै २०१७-जून २०१८). शहरी, गावी असणार्‍या इंटरनेट आणि उपकरणाची आकडेवारी पाहिली तर समजून येईल की ऑनलाइन वर्ग घेणे कितपत शक्य होईल आणि हे आव्हाना पेलायचे असेल तर कुठे आणि कसे काम करणे आवशक्य आहे हे समजून येईल. आकडेवारी पाहून अंदाज घेऊ.

उपकरणे: खेडेगाव ४.४% शहर २३.४% = सरासरी १०.७%

इंटरनेट: खेडेगाव १५% शहर ४२%  = सरासरी २४.०%

भारतता महाराष्ट्र हे एक पुढारलेले, आधुनिक राज्य आहे या राज्यातील आकडेवारी देखील फार समाधानकारक आहे असे नाही. उपकरणे आणि इंटरनेट अश्या दोन्ही गोष्टी वापरणार्‍याची संख्या खाली नमूद केली आहे.

उपकरणे: खेडेगाव ३.३%, शहर २७.४ % = सरासरी १४.३%

इंटरनेट: खेडेगाव १८.५% शहर ५२%  = सरासरी ३७.७%

ही आकडेवारी फक्त उपकरणे आणि इंटरनेट घरी असणार्‍याची आहे. आता ही उपकरणे आणि नेट कसे वापरले पाहिजे याचे ज्ञान असणार्‍याची आकडेवारी अजून निराशाजनक आहे. स्त्री आणि पुरुष यांचा विचार केला तर ग्रामीण स्त्रीयांचे प्रमाण कमी आहे. एकूण कम्प्युटर आणि इंटरनेट घरात असून वापरास येण्याची संख्या संपूर्ण भारतता फक्त ८% आहे त्यामध्ये २ मुले असतील तर कोणाची हजेरी लागेल सांगता येत नाही. 

सध्या भारतातील प्राथमिक, माध्यमिक व ईतर शिक्षकाना ऑनलाइन तास कसा घ्यावा याचे शिक्षण देणे महत्वाचे आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे सामाजिक एकत्रीकरणाची भावना कमी हीऊ शकते. मुलाना त्यांचे मित्र, मैत्रिणी पासून दूर जाऊन कम्प्युटरला आपला मित्र करावा लागेल. शाळेत फक्त पुस्तकी ज्ञानच मिळते असे नाही, सामाजिक बाधीलकी, मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम देखील होत असतता त्यामुळे मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो. सपूर्ण शिक्षण ऑनलाइन केल्यास येणार्‍या पिढी मध्ये सामाजिक आत्मीयता कमी होऊ शकते. मुलाच्या  मध्ये एकटेपणा, चिडचिड, तसेच फोनचा अतिवापरामुळे डोळे, मेंदू, जडत्व ईत्यादी अवयवाच्या व्याधी लागू शकतात. शाळा, कॉलेज मधील वर्गामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक समोर असतात त्यामुळे किती आणि कोणाल आकलन झाले हे समजते. ऑनलाइन तास चालू असताना पालाक घरी नसतील तर सर्वच विद्यार्थी हजार असतील असे नाही फक्त लॉग इन करून ते गेम, पिक्चर पाहणे, social media ईत्यादी काही करू शकतील यांचा वर पाळत ठेवणे अवघड आणि मानसिक विकाससाठी त्रासाचे आहे. स्वातंत्रापासून आज पर्यन्त शिक्षण आणि आरोग्य सेवाया बाबतीत सरकारी धोरणे प्रभावी ठरली नाहीतच आणि ऑनलाइनच्या या खेळात मात्र आणखी लोखो शिक्षक बेरोजगार होतील. 

ऑनलाइन शिक्षणामचे काही फायदे पाहू. ई-शिक्षणामुळे स्कूल बसचे होणारे अपघात टाळू शकतील, मोठ्या शहरातील प्रदूषित वातावरणामधील जीवघेणा प्रवास कमी होईल. वेळ वाचेल. एखादी संकल्पना समजली नाही तर वारंवार पाहता येईल. 3D विडियो, Animation माध्यमातून संकल्पना अधिक सोप्या पद्धतीने समजून सांगता येईल. एकच शिक्षक एकाच वेळी जास्तीत जास्त विद्यार्थी पर्यन्त पोहोचेल.

या सगळ्या अडचणीवर मत करण्यासाठी आपणास ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पद्धतीचे शिक्षण देणे आवशक्य आहे. सुरवातीला हा दोन्ही प्रकारे अभ्यासक्रम पूर्ण करून २०% अभ्यासक्रम पुन्हा ऑनलाइन घेऊन त्याची सवय आणि आवड निर्माण करावी लागेल. ऑनलाइनसाठीच्या पायाभूत सुविधा ट्टप्याट्टप्याने वाढवात जावे लागेल. सुरवातील प्राथमिक, आणि उच्च शिक्षणामद्धे प्रयोग करत यशस्वी प्रयोग घेऊन माध्यमिक शिक्षणाकडे वळावे. शाळा कॉलेज मध्ये ई शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक आणि संस्था यांनी खडू आणि फळा या संकल्पने सोबात पीपीटी, अॅनिमेशन विडियो ईत्यदि साधनाचा वापर वाढवून ई शिक्षणाची मानसिकता अमलात आणायला हवी.  

पाशच्यात देशातील ऑनलाइन शिक्षणाचे अनुकरण न करतात भारतात नेमकी गरज कशाची आहे हे ओळखून पुढील पावले उचलली गेली पाहिजेत.  आपण आपल्या प्रतिकिया ब्लॉग वर कळवा.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

https://ajinkya1030.blogspot.com


Comments

  1. डॉ. अजिंक्य,
    हीच खरी वस्तस्थिती स्तिथिी आहे. खुप छान मांडणी केली आहे. आणि काही झाले तरी ऑफलाईन शिक्षणाला पर्याय नाही.

    ReplyDelete
  2. Dear Ajinkya Sir,
    The blog is written very well and up to do the mark as far as today's situation. No dought OFFLINE teaching is the best way for Indian education system. But, it can be further extended through ONLINE as well. Nice to read about your article.

    ReplyDelete
  3. Very nice information sir. Very well described basic problems in the updated education system in India. Thank u so much for this information. Keep it up sir.

    ReplyDelete
  4. थोडक्या शब्दांत सुंदर मांडणी आणि नक्कीच उपयोगी माहिती आहे. खूप छान काम करत आहात जनजागृती होतेय यातून. 👍👍

    ReplyDelete
  5. सध्या कोरोणा मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.ह्या काळात अनेक घटना घडत आहेत.त्याचे अनेक ठिकाणी विश्लेषण वाचनात येत पण आपल्याकडून ह्या ब्लॉगच्या माध्यमातून जे काही महत्वाच्या मुद्यांवर प्रसिद्ध होणारे लिखाण हे अगदी अभ्यास पुर्ण आणि मुद्देसूद असल्याने आमच्या ज्ञानात नक्कीच भर पडत आहे.काही नवीन नवीन गोष्टी आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून शिकण्यास मिळत आहेत.सध्या आपण जे लिखाण करत आहात त्यात येणारे मुद्दे हे विश्लेषनात्मक असल्याने त्याचे परिपूर्ण ज्ञान मिळत असल्याने आपले सगळेच लेख मी नेहेमीच वाचत असतो .तसेच पुढील ब्लॉग कधी प्रसिध्द होतो याकडे ही माझे मेहमीच लक्ष् असत .असेच आपण ब्लॉगच्या माध्यमातून आम्हास योग्य आणि उचित ज्ञान द्यावे .
    -रवींद्र पाटील(दैनिक पुढारी)

    ReplyDelete
  6. Success in the implementation of E-learning educational system as one of the main approaches in managing knowledge and educational needs of higher education will not be achieved without identifying the different skill, technical and cultural challenges. Due to the enrolment of cross-continental students in a class, there is variety of students in a class. Therefore variations in problems faced in accessing the e-learning system. Online classes are not feasible for students with research and application based work as an essential component. The student verification is also one of the major challenges which needs an instant focus for its resolution.Because it is essential to verify whether the enrolled student is attending it or someone else. There is also low transparency in attending the regular online tests by students.

    Congratulations Sir. Your blog is just doing great impact as it is covering each and every aspect with deep analysis about the virus as well as upcoming circumstances .

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for such comment can you please mention your name

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...