Corona Series Part 54
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social
Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे. https://ajinkya1030.blogspot.com
कोरोना, आणि ऑपरेशन संजिवनी
संजिवनी मंत्र असो वा संजिवनी बुटी या दोन्हीमुळे
मनुष्याचा जिव वाचला आहे. त्यामुळचे
भारतीय वायु सेनेच्या कोरोनाच्या मदत कार्याच्या ऑपरेशनचे नाव संजिवनी
ठेवण्यात आले आहे. २०१३ सालचे उत्तराखंड महापुरामधील ऑपरेशन राहत किंवा २०१८ केरळ
मधील ऑपरेशन करुणा असो ईतिहास साक्षीदार आहे आपतीच्या काळी भारतीय सेनेची तिनही
दले सदैव तत्पर राहात आपले कर्तव्य करत असतता. सर्वप्रथम वूहान मधून भारतीय
नागरिकांबरोबर मालदिवचे ०९ विद्यार्थांना चीन मधुन भारत/ मालदिव आणण्याकरिता
वायुसेनेची कामगिरी.
मालदिव हा अरबी समुद्रामधील टापू असून समुद्र मार्ग
किवा हवाई मार्गानेच प्रवास करणे शक्य आहे. भारताने मालदिव सोबत मैत्रीपूर्ण सबंध
राखले आहेत. मैत्रीचाच एक भाग म्हणून १४ मार्च रोजी ५.५ टन जिवनावशक्य वस्तु
मालदिवला देऊ केल्या कारण मालदिव शेतिप्रधान देश नाही आणि या लॉक डाउनच्या काळात
काहीच उपलब्ध होणार नाही. त्या बरोबर कोरोनाशी सामना करण्यासाठी १४ तज्ञ डॉक्टराची
तुकडी रवाना केली होती. जानेवारी २० मध्ये ३०,००० Measles ची लस देऊ केली आहे. १ एप्रिल
रोजी बहरतीय वायु सेनेचे super Hercules- C१३०J विमान ६ टन वैद्यकीय उपकरणे आणि
भारता कडून खरेदी केलेली औषधे लॉकडाउन च्या काळात मालदिव मध्ये पोहोचवन्याचे काम
केले. भारतीय
भुदल आणि वायु दलाचे संयुक्त ऑपरेशन होते सर्वप्रथम भारतातील विविध भागातून सारी
साधनसामग्री भूदलाने एकत्रित केली आणि दिल्ली, मुंबई, चेन्नई, मदूराई येथून वायु दलाने साहित्य गोळा करत आपला प्रवास मालदिव पर्यन्त केला. ऑपरेशन
समुद्र सेतूचा एक भाग ऑपरेशन वंदे भारत आहे. या वर आपण पुढच्या लेखात चर्चा करू.
कोरोनाच्या काळात सीमेवर आपले कर्तव्य अखंडपने आपले
जवान कारित आहेतच त्या सहित असे मदत कार्याचे ऑपरेशन भारतीय नागरिकांसोबात परदेशी
नागरिकांनाचा देखील जिव वाचवत आहेत. या त्यांच्या कार्यामुळे भारत विश्वात नाव
लौकीक मिळवत आहे आणि खात्री आहे की हे फक्त भारतच करू शकतो. अश्या
पुण्यकर्माचे येणार्या काळात नक्कीच फलश्रुति मिळेल. कर भला तो हो भला.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज
कोल्हापूर
Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍
ReplyDelete