Corona Series Part 49
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social
Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com
कोरोना, आणि अफ्रिकन स्वाइन फ्लू
चीन मध्ये असणार्या खाण्या-पिण्याचा संस्कृतीमुळे मानवास
हानिकारक जिवाणू, विषाणूना पोषक वातावरन निर्माण
होते हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. हा विषाणू मनुष्यासाठी किवा
प्राणीमात्रासाठी अपायकरणारा असला की त्याची नाळ चीनशी जोडलेली असतेच. जगतात दहशदवाद म्हणजे पाकिस्तान आणि विषाणू म्हणजे
चीन असे समीकरण झाले आहे. दुर्दैव जगाचे, सर्व माहीत असून देखील ठोस कारवाई करता येत नाही. सार्स, एमईआरएस, हांटा, स्वाइन फ्लू, आणि कोरोना या सगळ्या विषाणूच्या फैलाव आणि
निर्मितमध्ये कुठे ना कुठे चीन चे धागेदोरे समोर येतात. हा निव्वळ योगायोग आहे असे आपणच आपल्याळ समजून
सांगायचे. कारण चीनची आर्थिक ताकत त्यातून सुरू असणारी सावकारी, पुरवठा साखळी मधील स्थान, तंत्रज्ञान, नवे संहारक शस्त्रसाठा, अवकाशातील संशोधन, राजकारणातील मुत्सद्देगिरी विकासाच्या नवाखाली छोटे देश, टापू यांचे अधिग्रहण ईत्यादी. एखाद्या विरोध केलाच तर
आर्थिक निर्बंध लावायचे आणि दबाव निर्माण करायचे अश्या सर्वच ठिकाणी आपला दबदबा
निर्माण केलाय या दबावामुळेच चीन विरोधात ठोस कारवाई होत नाही हे चीनी कम्यूनिस्ट
सरकारला पुरेपूर माहीत आहे त्यामुचे बेकायदेशीर, विध्वंसक, अशास्त्रीय जे जे म्हणून करता
येईल ते सर्व काम करण्यात प्रथम क्रमांक मिळवत असतात.
कोरोनाच्या महामारी दरम्यान मागच्याच महिन्यात हांटा विषाणू
जो उंदराशी संबंधित होता त्याची काही उदाहरणे बाहेर आली आणि आता अफ्रिकन स्वाइन
फ्लू चीन मधून डूक्करा मध्ये पसरतोय दोन्ही विषाणू मानवास हानीकारक नाहीत परंतु
असेच चालत राहिले तर या विषाणू मध्ये बदल होऊन हे देखील प्राण्याच्या मार्फत मानवजाती
येण्याची भीती निर्माण होते.
अफ्रिकन स्वाइन फ्लू सर्वप्रथम १९०७ मध्ये अफ्रिका येथे आढळला
होता म्हणून त्याला अफ्रिकन स्वाइन फ्लू म्हणतता, कोरोना कुठे सापडला ! कोरोना विषाणूचे नाव चीनी कोरोना विषाणू असले पाहिजे होते! असो, पुढे जाऊन १९२१
साली संशोधनातून समजले हा विषाणू केनिया मधून निर्माण झाला. युरोपियन देशात पाळीव
डूक्कराचे मास (पोर्क) खाल्ले जाते. त्यासाठी अफ्रिकामधून पाळीव डूक्कर नेले जात
असत यातूनच १९५७ साली स्पेन आणि पोर्तुगाल मध्ये एंडामिक (ठराविक भागात होणारी महामारी)
निर्माण झाली, आणि डूक्कर मरू लागले. या
आजारारमध्ये संशईत डुक्कराला मारले जात होते. त्या नंतर आता पर्यन्त या विषणूचा
प्रादुर्भाव फार मोठा प्रमानात दिसून आला नाही. परंतु चीन मधील xizang प्रांत मध्ये २०१९ मध्ये आणि काल त्यानंतर आसाम मध्ये ४८ तासात ३०००
पाळीव डुक्कराचा मृत्यू झाला आहे. अफ्रिकन स्वाइन फ्लू विषाणू आणि कोरोना
विषाणू मध्ये साम्य नाही कारण अफ्रिकन स्वाइन फ्लू विषाणूमध्ये दुहेरी डीएनए आहे.
तसेच हा या विषाणू चे ३ मूळ प्रकार आहेत. क्लासिकल स्वाइन फ्लु या विषाणूवर लस
उपलब्ध आहे. अफ्रिकन स्वाइन फ्लू आणि स्वाइन फ्लू एच१एन१ या दोन्हीवर लस उपलब्ध
नाही. चीन मध्ये हा विषाणू सापडला असला तरीही नेहमी प्रमाणे चीनी सरकार मान्य
करायला तयार नाही. चीनच्या म्हणण्यानुसार कोरोनासाठी अमेरिका आणि अफ्रिकन स्वाइन
फ्लू विषाणूसाठी इंडोनेशिया कारणीभूत आहे. एकंदरीत भविष्यामध्ये अश्या
प्रकारचे विषाणूचे संक्रमण येत राहणार काही मानवास बाधित करतील तर काही
प्राणीमात्रना सारे मिळून यावर उपाय केला पाहिजे. विषाणू निर्माण करणार्यांवर ठोस
कारवाई होणे गरजेचे आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज
कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.comBOOKS
Nice information sir 👍 thanks sir 👍 👍
ReplyDeleteThe only option to defeat china is stop buying Chinese good as much as possible... This is the only way to weaken their economy and thereby their power...
ReplyDelete