Skip to main content

Corona Series Part 45 : कोरोना, आणि Human Challenge Trials


Corona Series Part 45
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com

कोरोना, आणि Human Challenge Trials
Corona Series Part १-मध्ये आपण लस कशी तयार केली जाते त्याचे ट्टपे कोणते, लागणारा वेळ या सर्व बाबतीत चर्चा केली आहे. सध्याचा कोरोनाचा संक्रमण पाहता लागणारा वेळ कसा कमी करता येईल या बाबतीत चर्चा चालू आहे. आता पर्यन्त जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी २५४ औषधे आणि ९५ लसी यावर प्रामुख्याने संशोधन केन्द्रित आहे या मधून १ लस आणि १ ते २ औषधे कोरोनावर प्रभावी ठरतील. लस मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी प्राथमिक संशोधन, औद्योगिक निर्मितीची मान्यता, कागदपत्रे, कारखाने स्थापित करणे ईत्यादी गोष्टी वेगाने करता येतील. क्लिनिकल ट्रायलचा वेग वाढवता येणं तसे धोक्याचे आहे. त्यासाठी क्लिनिकल ट्रायलच्या ३ चरणात काही थोडे बदल शक्य आहेत परंतु ते देखील जीवघेणे ठरू शकतील. असे असले तरीही कूछ पाने के लीये कूछ खोना पडता हे. या उक्ती प्रमाणे  Human Challenge Trials चा आणि लसची अचूकता पहाण्यासाठी placeboचा  वापर करावा लागणार आहे.
Placebo (All ingredient of drug other than API) प्रथम प्लासीबो बद्दल माहिती घेऊया क्लिनिकल ट्रायलच्या ३र्‍या भागात १०००किंवा अधिक लोकांच्यावर प्रयोग केला जातो. तेव्हा काही रुग्णांना लसीचा डोस न देता रुग्णांना न सांगता सलायनचे पानी दिले जाते. त्याला कंट्रोल ग्रुप असे म्हंटले जाते. पुढे जाऊन आजाराची लागण आणि लक्षणे कोणाला दिसतात हे पहिले जाते ज्यांना लस दिली आहे त्यांना जर लक्षणे आणि आजारपण दिसले नाही आणि कंट्रोल ग्रुप मध्ये आजार दिसला तर बनवलेली लस किंवा औषध योग्य काम करत आहे असे समजले जाते. ईथे कंट्रोल ग्रुप मधील स्वयंसेवकांना आजारा बाळवण्याचा धोका असतो.
Human Challenge Trials (HCT) चा विचार करू. आतापर्यंत एबोलाची लस कमी म्हणजे ५ वर्षामध्ये निर्माण झाली. Flu, Vaicella २८-तर Human Papilioma virus, Rotavirus ला १५-वर्ष लागली आहे. परंतु कोरोनाची लस मात्र ६ ते २४ महिन्यात बनवली पाहिजे अशी अपेक्षा आपण बाळगून आहोत. हे शक्य करायचे असल्यास क्लिनिकल ट्रायलचा वेग वाढवला पाहिजे असे काही शास्त्रज्ञाचे मत आहे. Human Challenge Studies to Accelerate Coronavirus Vaccine Licensure.; Eyal.; N. et.al The Journal of Infectious Diseases  30 March 2020 या शोध निबंधामध्ये या HCTआणि क्लिनिकल ट्रायल चा फरक सांगितला आहे.
क्लिनिकल ट्रायलमध्ये स्वयंसेवकान फक्त लस दिली जाते आणि पुढे ३ ते ५ वर्ष आपण त्याचे परिणाम पाहत असतो. HCT मध्ये मात्र आपण आधी त्या स्वयंसेवकान कोरोनाने बाधित करून त्यांना रुग्ण बनवतो आणि मग लस दिली जाते. कोरोना बाधित झाल्यामुळे १४ दिवसात रुग्ण लक्षणे दाखवतो आणि काही महिन्यातच लस काम करते किंवा नाही हे समजते. ईतर आजारात देखील अश्या प्रकारे HCTकेले गेले आहे परंतु त्या वेळी लस निर्माण करण्यापूर्वी आजारावर उपचार करण्याकरीता कोणते ना कोणते औषध उपलब्ध होते परंतु कोरोनाच्या बाबतील कोणतेही औषध आज आपलायकडे नाही आहे. आणि म्हणूनच कोरोनाच्या HCT मध्ये स्वयंसेवकांच्या जिवाला जास्त धोका आहे. असे असून देखील जगभरातून ५२ देशातून जवळपास ८००० स्वयंसेवक स्वतहून तयार झाले आहेत परंतु हे सगळे निरोगी आणि तरुण आहेत. या प्रक्रिये मध्ये देखील वृद्ध किंवा रोगप्रतिकार शक्ति कमकुवत असणार्‍या लोकांवरील परिणामाचा आभास करता येणार नाही ही एक अडचन ठरू शकते.  HCT बाबतील WHO ने रिसर्च पेपर Detail Guideline of Human Challenge Trials for Vaccine Development Geneva १७ ते २६ ओक्टो २०१६ साली मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत त्या तत्वानुसार काम काज केले जाते.
लवकारत लवकर लस आणि औषधे बनवण्यासाठी असे काही शॉर्टकट आपल्याला धोका पत्कारून करावे लागतील परंतु वेग वाड्व्न्यासाठी असे जीवघेणे शॉर्टकट वापरत राहिलो तर भविष्यात कोरोना झालेला बरा पण लस, औषधाचे दुष्परिणाम नको असे म्हणायची वेळ येऊ शकते. त्यामुळे संशोधक, शास्त्रज्ञ या बुद्धिजीवीवर अतिरिक्त राजकीय, सामाजिक दबाव आणू नका. कोणता देश, कोणती कंपनी सर्वात आधी लस काढेल याची स्पर्धा लावू नका. याचे परिणाम चांगले होणार नाहीत. शास्त्रज्ञ त्यांची सत्सत विवेकबुद्धी वापरुन या कोरोनावर नकीच रामबाण उपाय शोधून काढतील तोपर्यंत आपन शांत राहून त्यांना यश मिळो ही भगवंताकडे प्रार्थना करू.    

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

  1. Very nice information sir 👍 thankuuu very much sir 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...