कोरोना, आणि रिकव्हरी
ट्रायल
कोरोना विषाणू वरील लस शोधून काढण्या करिता आता ऑक्सफोर्ड
विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात लसची तपासणी करण्याची मोहीम आखली गेली आहे.
जागतिक स्तरावर सर्वत्र या प्रयोगाची दखल घेतली गेली असून सार्या जगाल या
प्रयोगापासून सकारात्मक निकालाची अपेक्षा आहे. आपल्या अंदाज असेल कोणताही एक
ड्रग्स जो कोरोनावर मात करू शकेल असा नाही त्यामुळे विविध ड्रग्स संयोजनात्मक
रीतीने रुग्णांना दिले जात आहेत म्हणूनच कोण्या एका ड्रग्सने कोरोना बरा होतो असे
म्हणता येत नाही. या प्रयोगाची 2 प्रमुख वैशिष्ट म्हणजे या प्रयोगात जगभरात जे
ड्रग्स कोरोनाचा उपचारासाठी वापरले जात आहेत ते सर्व ड्रग्सची चाचणी होणार असून
१६९ विभागातून अनियमित वाटप (Random Allocation)
नुसार ५८७६ स्वयंसेवकावर याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या बाबतीत
सर्वात मोठी माहिती वैज्ञानिकाना मिळणार आहे.
ChAdOx1 nCoV-19 नामक लसीची तपासणी केली जाणार
असून ड्रग्स मध्ये Hydroxchloroquine सर्वात पुढे आहे. चीनी आणि
यूरोपियन शास्त्रज्ञांना मिळालेल्या माहिती नुसार हा ड्रग्स कोरोना विषाणूचे
संक्रमण थोपवून धरू शकतो परंतु कोरोनाचा समूळ मनात करू नाही शकत. त्याच बरोबर azetromycine हे एक जिवाणू वर काम करणारे प्रतिजैवक आहे. जिवाणूवर
उपयुक्त असून विषाणूवर देखील गुणकारी ठरतं असले तरी हे देखील संयोजनात्मक रीतीने
रुग्णांना दिले जाते त्यामुळे या ही ड्रग्सचा अभ्यास करणे गरजेचे आहे. एचआयव्ही
वरील लोपिनावीर आणि रिटोनावीर असो किवा जापानीज अविकोण असो या सर्वच ड्रग्सची
चाचणी केली जाणार आहे. लो डोस dexamethasone
नावाचे steroid जे दाह कमी करायला वापरले जाते ते
देखील येथे कोरोनाचा तपासणी केंद्रात तपासले जाणार आहेत. ही सर्व माहिती जून
पर्यन्त शास्त्रज्ञांना मिळू शकेल आणि सर्व ठीक सुरळीत चालू राहिले तर सेप्टेंबर
पर्यन्त लस आणि एक औषध कोरोनाचा विरोधात आपणास मिळू शकेल. ऑक्सफोर्ड विद्यापीठा
बरोबर ईतर नामवंत संस्था देखील या विद्यापीठाचा छत्रछाये खाली कार्य करीत
आहेत.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
Comments
Post a Comment