Corona Series Part
9
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लक्षात
घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोंना, आणि मध्यमवर्गीय चे आर्थिक लॉक
डाउन
साधारणतहा मार्चच्या 10 तारखेपासून
हा कोरोना चा विषय चर्चेत येऊ लागला. नोकरदार वर्गाचे पगार त्यांच्या बँकेच्या
खात्यावर आले होते. व्यापारी लोक मागील महिन्याचे हिशोब पूर्ण करून ह्या महिन्याचे
नियोजन लागले होते. शेअर मार्केट खरेदी–विक्रीचा हा सिलसिला नियमित चालू होता.
कुणालाच कल्पना नव्हती की पुढे हा करोंना विषाणू मजबूत होत जाऊन झगडत असणार्या
अर्थ व्यवेस्थेला मोठा दणका देणार होता. 1 दिवस आड कामावर हजर राहणे, जनता कर्फू, आणि आता 21 दिवस लॉक डाउन चालू
झाला. प्रत्येक कुटूंबाचे आर्थिक नियोजन कोलमडणार होते हे निश्चित होते पण
दुर्देव अस की त्याची कल्पना मात्र आपण करायची नाही हे पक्का आपल्या जनतेने ठरवलं
होत. दहशदवादी हल्ला होउदे नाही तर नाहीतर नैसर्गिक हानी होऊ दे सर्वात
प्रथम पिचतो तो मध्यमवर्गीय माणूस. आज मार्च मध्ये आपल सामाजिक आयुष्य लॉक डाउन
झाल आहे येणार्या काही महिन्यात मध्यमवर्गीय लोकांचे अर्थ खाते लॉक डाउन होऊ शकते.
जसा लॉक डाउन माननीय
पंतप्रधांनांनी जाहीर केला तशी जीवनावशक्य वस्तु खरेदी करण्यासाठी दुकानं समोर
रांगा च्या रांगा लागण्या न कुठल्या कोरोंनाच भय होत, ना पोलिसा यंत्रणेच न आणखी कोणाच, पण मला एक गोष्ठ समजत नाही जीवनावशक्य
वस्तु म्हणजे नेमके कोणत्या दोन वेळच जेवणच आणि वस्त्र व निवारा जो आपल्या कडे
आहेच पण झालय अस आपण आपल्या गरजा इतक्या वाडवून ठेवल्या आहेत की 21 दिवस लॉक
डाउन च्या निमिताने कधी नव्हे ते सर्व एकत्र आहेत आहे तर मग चमचमीत
पदार्थ बनवायचे बेत चालू झाले आहेत आणि आपण कोल्हापुरी, कोल्हापूर म्हणजे ताबडा पांढरा ची
पंढरी 3 आठवडे खायचा नाही शक्यच नाही त्या शिवाय चालत नाही ह्या मानसिकतेत आपण
आहोत. कुणी काय खाव ह्या वर आक्षेप नाही पण अजून ही
परिस्थितीच गांभीर्य येत नाही ह्याच वाईट वाटत. हे आपण रोजच्या जीवनात करतोच आपली
जगण्याची जीवनशैली ही चंगळवादी झाली आहे, प्रत्येक गोष्टीचा मोह जडला आहे आणि आजच्या परिस्थिति
मध्ये ती बदलायची आपली अजूनही मानसिकता नाही.
आज किराणा वाल्याच्या दुकानात
रांगा लागल्या आहेत दिवाळी दसरा ला जस साहित्य भरल जात तशी खरेदी चालू आहे. ह्या
रांगा माडून कोरोंना तुमच्या घरी प्रवेश करणार आहे. हे समजत असूनही आपण आपली लक्ष्मणरेषा
ओलांडत आहे. आज तुमच्या कडे कर्जाचे हफ्ते, घरभाडे, LIC, Saving चे EMI भरून फेब्रुवारी चा पगार/ नफा आहे
तेच तुम्ही तुमच्या चंगळवादी वृती वर खर्च करत आहात.
पण एक लक्षात घ्या जर सपूर्ण अर्थव्यवस्था जर ठप्प होणार असेल तर कोणते सरकार, कोण मालक, कोणती कंपनी, कोणती सहकारी / शिक्षण संस्था
किती दिवस आपल्या नोकरदारांना पगार देणार आहे. कोणता मालक नफा मिळवणार आहे. मग मार्च, एप्रिल, आणि मे च काय कुठून भरणार आहात LIC, Saving चे आणि कर्जजाचे EMI कर्ज काय कर्जाचा EMI थाबला तर त्या वरील दंड घेतला
जाणार नाही आहे पण कर्जाचा हफ्ता हा आहेच. जर कर्जाचा EMI माफ झालाच तर FD वरील व्याज देखील मिळणार नाही.
समजून घ्या आताची परिस्थिति ही
आणिबाणी सारखीच आहे इथ आपल्या गरजा कमी करून पैसा व अन्न धान्य पुरवून वापरनार तोच
पुढे नव्याने सुरवात होणार्या अति तणावपूर्ण जीवनात तनावमुक्त जगू शकेल.
जे फक्त जगण्यासाठी आवशयक आहे
त्याची पूर्तता करायची सपूर्ण तयारी आहे. तुम्हाला कल्पना नसेल पण भारत सरकार कडे
तुमच्या गरजा पूर्ण करण्या इतपत जीवनावशक्य (तांदूळ, गहू, साखर, ज्वारी) वस्तु उपलब्ध आहेत (137
कोटी लोकसंखेला वर्षाला 214 लाख टन इतका गहू आणी तांदूळ लागतोय आणि आपल्या FCI Godown मध्ये सध्या 565.11 लाख टन इतका
धान्य शिल्लक आहे. डाळ 40लाख टन, साखर 30लाख टन ईत्यादि म्हणजेच सपूर्ण जनतेला वर्षाला जेवड धान्य लागणार आहे
त्याचा 2.5 पट buffer stock शिलक आहे केंद्रा कडून राज्य सरकारला 3 महिन्याचे धान्य अॅडव्हांन्स मीळनार
आहे.) पण माणसाचा ह्याव्यास पूर्ण करन्यासाठी मात्र पुरेसा नाही. ह्या लॉक डाउन
च्या काळात पुरेल इतका साठा प्रत्येकाच्या घरात आहे. पण तरीही आपण साठे करायला
लागलोय ज्या वस्तूची गरज नाही त्या देखील आपल्या हव्यासापोटी खरेदी करत चाललोय
अश्या मुळे तुमचे खिसे रिकामे होतील आणि मध्यंवर्गीयांची कुटुंबाची
अर्थव्यवस्था मोडकळीस येणार आहे आणि साठे बाजार वाढेल ह्याला कारणीभूत आपणच
असाल. ह्याचा विचार करा
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Khara ahe pichto to middle class
ReplyDelete