Skip to main content

Corona Series Part 40 : कोरोना, आणि अफ्रिका खंड


Corona Series Part 40
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोना, आणि अफ्रिका खंड

कोरोना ही वैश्विक महामारी बनून जगासमोर उभी राहिली आहे. म्हणूनच कोरोनाचा प्रभाव हा जागतिक असल्याने याचा विचार ही जागतिक समस्या प्रमाणे करणे आवशक्य आहे. सर्व प्रथम चीन, युरोप, अमिरिका आणि ईतर देशातमध्ये हाहाकार ठाकला आहे. आशिया मधील चीन, युरोप खंड, अमिरिका खंड तसे पहिले तर हे वैद्यकीय आणि आर्थिक दृष्ट्या पुढारलेले आहेत. त्या मानाणे अफ्रिका खंड मात्र फार प्रगत नाही. आता पर्यन्त आफ्रिकेमध्ये हा कोरोना अजून फार फोफावला नाही आहे साधारणपणे २६,००० रुग्ण असून १३०० मृत्यू झाले आहेत. परंतु कोरोनाचा उत्पात पाहता आफ्रिकेसारख्या मागास खंडामध्ये कोरोना धुमाकूळ घातल्या शिवाय राहायचा नाही.
त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा अंतर्गत कार्यरत असणारी १९५८ साली स्थापन झालेली United Nation Economic Commission for Afrika (UNECE) यांच्या कोरोना आणि अफ्रिका खंड याचा अहवाल प्रसिद्धा झाला आहे. या अहवाला मध्ये २ शक्यता वरतावल्या आहेत. लॉकडाउन सोशल डीसटनसिंग, जास्तीत जास्त तपासण्या एत्यादी सर्व नियमचे काटेकर पालन झाले, आणि  दुसरी शक्यतामध्ये वारी सर्व गोष्टीचे काहीच पालन केले गेल नाही तर काय होऊ शकते. पहिल्या शक्यतेमध्ये अंदाजे १० ते १२ करोड लोकाना कोरोनाची बाधा होईल जावपास ३ लाख लोक मृत्यूमुखी पडू शकतील. आणि दुसर्‍या शक्यतेमध्ये अंदाजे १२० करोड (जवळपास सर्वच) जनसंखेला बाधा होऊन ३३ ते ३५ लाख लोक मृत्यूमुखी पडू शकतील. दुसरी शक्यत अस्थिवात येणे शक्य नाही परंतु पहिल्या शक्यते मधील अंदाज देखील खूप मोठी हानी करून जात आहे. असे घडण्याची काही कारणे आहेत कारणं जवळपास ८६% आफ्रिकन नागरिकांच्या घरी सुस्थितीमध्ये हात धुण्याची व्यवस्था नाही. संपूर्ण आफ्रिका खंडात आरोग्या सेवांची अवस्था अतिशय दयनीन आहे. प्रती १००० लोकांमध्ये २ लोकांसाठी बेड आहेत. एबोला, एचआयव्ही सारख्या आजारावर डब्ल्यूएचओ मार्फत औषधाच पुरवठा केला जातो.  सर्व औषधांची (९४%)
आयात ५०% युरोप आणि २०% भारतातून करावी लागते. एबोला, एचआयव्ही, क्षय, मलेरिया,  कुपोषण असे रोग प्रतिकारक शक्ति कमकुवत करणारे आजाराचे प्रमाण जास्त आहे. आफ्रिकन देशात काही प्रमुक देशात ठरविक शहरे विकसित असल्याने शहरीवस्ती दाटीवाटीने राहते त्यामुळे   सोशल डीसटनसिंग पाळणे शक्य होत नाही. या सगळ्या अडचणी पाहत अफ्रिका खंडा साठी आर्थिक, सामाजिक मद्त करणे महत्वाचे ठरते कारण भारत, चीन अमिरिका सारख्या देशातून जरी कोरोना नाहीसा झाला तरी लॉकडाउन निघाल्यावर आफ्रिकेमधून तो पुन्हा माघारी येऊ शकतो. त्यासाठी कमीत कमी ४४ व जास्तीत जास्त ४४६ दशलक्ष आमरेकी डॉलर ईतकी आर्थिक मदतीची गरज लागेल. ही मदत करत असताना डब्ल्यूएचओ सारख्या संघटनांना देखील फार कसरत करावी लागणार आहे.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...