Corona Series Part
4
लॉक डाउन आणि अडाणी जनता
जगात 3 प्रकारचे लोक आहे
1) पुढंचास ठेच मागचा शहाणा 2) स्वतची ठेच स्वता
शहाणा 3) कितीही ठेचा अति शहाणा. आपण कोणत्या प्रकारात मोडता
22 जानेवारी 2020 रोजी चीन सरकार
ने वुहाण लॉक डाउन करण्याचा निर्णय घेतला. वूहान 23 जानेवारी 2020 रोजी लॉक डाउन झाले
सगितल जाता की हा लॉक डाउन च निर्णय ची अमलबजावणी अतिशया कडक करण्यात त्यामुलळे
जगाकडून चीन सरकारची आलोचणा देखील झाली 1 दिवस आधी घोषणा होऊन देखील वुहाण
सारखा इंडस्ट्रियल भागातून जवळ पास 11 लाख लोक स्थलांतरील झाले त्याच मुळे सपूर्ण
मध्य चीन मध्ये कोरोंना पसरण्यास मदत झाली. इटलीमध्ये देखील तसेच झाले तिथे फक्त
उत्तरी इटली लॉक डाउन करण्यात आली आणि सरकारने जाहीर करायच्या आधी लॉक डाउन ची
माहिती तेथील मीडियाने प्रसारित केली (मीडिया देखील करोना पसरवण्यास कारणीभूत आहेत) त्याचमुळे लोक लगेच
स्थलांतरील झाले आणि करोना ने सपूर्ण इटली वर आपला
विळखा घट्ट केला ह्या 2 घटना सांगून जातात की लॉक डाउन करायच आहे तर ते तातडीने
करण गरजेचं आहे 2 दिवस आधी लॉक डाउन ची माहिती होऊन उपयोग नाही. कोरोंना ग्रस्त
लोकांच्या अश्या स्थलांतरामुळे वुहाण जवळील 15 शहर मागील 2 महीने आणि इटली मध्ये
सपूर्ण इटली 1 महिना लॉक डाउन करावी लागली.
चीन मध्ये घरतून बाहेर पडन्याची
अनुमति कुणाला दिली नाही सपूर्ण सरकारी वाहतूक, शाळा मार्केट आधी एकाचवेळी बंद करण्यात आली एप्रिल
च्या पहिल्या आठवड्यात जर एक ही नवीन रुग्ण आढळला नाही तर हा लॉक डाउन काडण्यात
येणार आहे.
भारतता सरकारी वाहतूक यंत्रणा जीवनावशक्य
वस्तु आणि लॉक डाउन
सध्या भारतता 23 मार्च ते 31 मार्च
पर्यन्त सर्व च्या सर्व लांब पल्ल्याची प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे
आही हे अगदी योगी केल आहे कारण मुंबई पुणे खास करून मेट्रो शाहारातून आपल्या गावी
जान्याची झुंबड चालू झाली आहे मुंबई मध्ये आर्थिक हालचाली ठप्प झाली आहेत पुणे
सारखा ठिकाणी सपूर्ण हॉस्टेल कॉलेज बंद करण्यात आली आहे तसेच मुंबई सारखा
ठिकाणी रेल्वे स्थानकावर 22 मार्च च्या दिवसभरात 75000 नागरिक होते जे मुंबई पासून
उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल कडे स्वतचे मार्गक्रमण आणि करोनाचे संक्रमण करू पाहत आहेत. Social distancing कसं शक्य होणार.
आपण इटली सारखी परीस्थिति निर्माण
करत आहोत लक्षात घ्या 1 च आठवड्यात इटली च आकडा काही शेकडो मधून काही हजारत गेला, ह्याच कारण अस की जेव्हा इटली
सरकार ने लॉक डाउन जाहीर केला तेव्हा तेथील जनता त्यांचं social life जागण्यात गुंग होती तशीच काहीशी परीस्थिति
आज भारतात दिसत आहे पण इटली आणि भारतातिल फरक समजून घ्या दर 10000 लोकांचा मागे
मध्ये इटली मध्ये जवळपास 30 ते 50 बेड आहेत पण भारतात मात्र हाच आकडा 7 ते 10
आहे म्हणजेच जर करोना च इन्फेकशन भारतात पसरलच तर विना उपचाराचे लोक मरण पावतील.
इटली च्या चुका मधून आपण काय शिकल
पाहिजे की piecemeal attempts काम करत नाही, piecemeal attempts अर्थात आपण एक दिवास शाळा कॉलेज बंद करतोय एक दिवस भाजी मार्केट बंद करतो एक
दिवस जनता कुरफू करतोय एक दिवस सरकारी वाहतूक बस एक दिवस विमान सेवा एक दिवस बंद
असा करून कोरोंनाच संक्रमण थांबणार नाही. वायरसल प्रथिबंध करण्या साथी फारच छोटी संधि असते ती जर आपण घालवली तर हे
संक्रमण नियंत्रणात आणला 3 ते 4 महीने आणि काही हजारो लोकांचा बळी द्यावा लागेल.
त्या मुळेज्या शहरात संक्रमण झाले आहे ते सपूर्ण शहर आणि आस पास च भाग पूर्णा पने
लॉक डाउन करणे आणि तो तंतोतंत पाळणे गरजेचे आहे. एक सुजान नागरिक म्हणून आपली
जबाबदारी आहे की लॉक डाउन आहे तेव्हा आपन social distancing पाळलं पाहिजे गरज नसतातना
जीवनावशक्य वस्तु च कारण काडून बाहेर फिरू नये जिवावशक्य वस्तु च सानच्या कराची तर
काहीच गरज नाही. तर आज जर लॉक डाउन असेल तर स्वतहून मांनापासून पालन करा तरच करोना संकट लवकर
निघून जाईल स्वतची सतसत विवेक बुद्धी चा विचार करून4 5 दिवस घरी बसायच की 2 3 महीने जबरदस्ती घरी
बसायच हे तुमच्या हहातात आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
When people understand this
ReplyDelete