Skip to main content

Corona Series Part 34 : कोरोना, भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देश


Corona Series Part 34
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोना, भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देश
पूर्ण विश्व या कोरोनाने व्यापले जरी असले तरी एक ना एक दिवस महामारीचा प्रभाव कमी होत जाणार आहे. आपल्या electronic साधनामध्ये (mobile) formate नावाचा पर्याय असतो. तो पर्याय निवडला की सगळं निघून जात आणि पुन्हा नव्याने विकत घेतलेल्या प्रमाणे ते साधन होऊन बसत. त्या प्रमाणे या महामारीमद्धे विश्वाचे जणू काही formatting चालू आहे. एकदा हे झाले की पुन्हा नव्याने उद्योग जगताला reset करावे लागणार आहे. त्यामुळे या वैश्विक महामारीच्या निमिताने चीनमधील उद्योगाचे भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देशात स्थलांतरण होत आहे. भारताचा विचार करताना नव्याने तयार होणार्‍या स्पर्धेत भारताने जास्तीत जास्त उद्योगधंदे भारतानं आणन्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी स्थालांतरीत होणार्‍या कंपण्यानचा कल कोणत्या भौगोलिक क्षेत्राकडे का आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांना भारतता आण्यासाठी काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे त्या वर आज आपण एक दृष्टीक्षेप टाकुया.
      जगात सगळीकडेच व्यापारयुद्ध चालूच असते. व्यापाराच्या दृष्टीने भविष्यात चीन जसा पुरवठा साखळीचा प्रमुख झाला आहे तसा कोणताही देश पुरवठा साखळीचा मालक होता कामा  नये, अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स च्या सर्वे नुसार बरेचसे उद्योगधंदे भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देश जसे थायलंड, विएतनाम, सिंगापूर, मलेशिया, इंडोंनेशिया ई देशाकडे आशेने पाहत आहेत. या देशांना झुकते माप देण्याची काही कारणे आहेत.
 भौगोलिक जवळीकता :
चीन मधून एकदमच सगळे उत्पादन स्थलांतरित करता येणार नाही. काही गोष्टींसाठी सर्व कंपन्यांना यानंतर ही चीनवर अवलंबून राहावे लागणार आहे तेव्हा चीन पासून दक्षिणपूर्व आशियाई देश जवळ असल्याने वाहतूक जास्त करावी लागणार नाही. चीनमध्ये Shenzhen नावाचे उत्पादन केंद्र आहे त्याच प्रकारचे विएतनाममध्ये Ho Minch chi नावाचे उत्पादन केंद्र मुळातच उपलब्ध आहे त्यामुळे नवीन सुविधा पुन्हा शून्यातून निर्माण करन्याची आवशक्यता नाही.
पायाभूत. सामाजिक सुविधा :
विएतनाम, थायलंड मध्ये पायाभूत सुविधा भारतापेक्षा आधिक चांगल्या पद्धतीने अस्तीत्वात आहेत. विविध कंपन्या स्थापन होत असताना शिक्षण, आरोग्यच्या सुविधा देखील छगल्या असव्या लागतात. भारत आपल्या nominal जीडीपीच्या ७.५% रक्कम शिक्षण आणि आरोग्यच्या सुविधा पुरवण्यावर खर्च करतो तर विएतनाम मात्र ७.५% रक्कम फक्त आरोग्यच्या सुविधा पुरवण्यावर खर्च करतो. १९९१ला ज्या पद्धतीचे बदल भारतता झाले त्याच पद्धतीचे बदल विएतनाम १९८६ पासून Doi-moi पॉलिसी अंतर्गत करण्यात आले आहेत. या मुळे छोट्या अर्थव्यवस्था असताना देखील पुष्कळ कंपन्या भारतापेक्षा दक्षिणपूर्व आशिया देशांना जास्त महत्व देत आहेत. भारताने अश्या सुविधा आता अधिक पुरवायला सुरवात केली तर या कंपन्यांच्या ओढा भारताकडे नक्कीच राहील.
उत्पादनातील साम्यता :
चीन ज्या प्रकारचे आणि ज्या पद्धतिचे उत्पादन करतो आणि निर्यात करतो. त्याच पद्धतीचे उत्पादन आणि निर्यात करण्यात विएतनाम (५०%) अव्वल स्थानावर आहे. भारत जावपास ५ व्या (४०%) स्थानावर आहे.
व्यवसाय करण्यातील सुलभता :
Ease of doing business या बाबतीत मात्र २०१८-च्या तुलनेत भारत विएतनाम, थायलंड किवा अन्य दक्षिणपूर्व आशियाई देशांच्या पुढे आहे. २०१८ साली ७७ स्थानावरून २०१९ साली ६३ स्थानावर आला आहे. या उलट विएतनाम मात्र ६९ वरुण ७०व्या स्थानावर पोहोचला आहे. नवीन व्यवसाय स्थापन करणे करिता भारतात जावपास १२ प्रक्रिया पूर्ण कारवया लागताता त्या साथी २७ दिवस ईतका कालावधी लागतो.
चलन विनिमय दर :
१९४७ आणि त्यानंतर काही काळ भारताचे चलन निश्चित विनिमय दर या प्रमाणे निश्चित राहायचे. परंतु आता आपण बदलती विनिमय दरप्रणाली वापरत आहोत. त्यामुळे भारतीय चलनाचा दर खाली येईल तेव्हा परकीय गुंतवणूक असणार्‍या कंपन्यांच्या फायद्यामध्ये घट होऊ शकते. या उलट विएतनाम मध्ये crawling विनिमय दरप्रणाली वापरली जाते या कारणाने त्याचे चलन स्थिर राहते यामुळे कंपन्यांना दूरगामी फायदा होतो.
 स्थलांतरीत होणार्‍या काही कंपनी आणि देश
1] Hardly Devidson, Merry Electronic       Thailand
2] Hasbro, Skechers, Foxconn             Viatnam or India
3] Procon Pacific                         India
4] Samsung, Ninterndo, Goertek           Viatnam                     
वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता दक्षिणपूर्व आशियाई देशांत भारतापेक्षा जास्त उद्योगधंदे स्थलांतरीत होत असले तरी या सगळ्या देशांचा मानाने आपणही बरी प्रगति करत आहोत असे मानायला काही हरकत नाही.


प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
ajinkya1030.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

Corona Series Part 76 : कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

Corona Series Part 76 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि एन-९५ मास्कचा इतिहास कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कोरोना योद्धा मास्क आणि पिपिई किट दोन्हीचा वापर करतात. भारतामध्ये मास्कचा वापर सध्या मार्च पासून वाढला असला तरी मास्कचा ईतिहास जवळपास ३०० वर्षापासूनचा आहे. मानव मास्क कसा , कशासाठी वापरू लागला. याची माहिती घेऊया. १७२०च्या दरम्यांन मारसेलीसच्या चित्रामध्ये मास्कचा वापर केलेला आढळून येतो मास्क म्हणण्यापेक्षा तोंडावर कापड लावलेले दिसून येते. अंदाजे त्यावेळी बुबोणिक प्लेग आला होता लाखो लोकांचा मृत्यू होत होते परंतु मृत्युचे कारन समजण्यापलीकडे होते . कारण त्याकाळी अजूनही विषाणू/ जिवाणूची संकल्पना अस्थित्वात नव्हती. मरणोत्तर मानवी शरीराला येणार वास आणि त्यामुळे हवा खराब होत आहे अशी एक धारणा होती हवा ही या रोगास कारणीभूत आहे असे वाटू लागले त्याला मियासमा म्हंटले जात. या मियासमा संकल्पन

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांनी mRNA 1273 न

Corona Series Part 92 : कोरोना आणि Favipiravir

Corona Series Part 92 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि Favipiravir सुरवातीच्या काळात चीन पाठोपाठ सिंगापूर , जपान , कोरिया या देशात कोरोंनाचे संक्रमण झालेली आपल्याळ दिसून येईल. तेव्हा पासूंनच चीन , सिंगापूर , जपान , कोरिया आणि जपान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान आणि विविध शास्त्रामधील तज्ञ शास्त्रज्ञानाचा वापर करत नवीन संशोधन करत आहेत. या मधील Hydrocychloroquin, Remdesivir, Favipiravir, Lopinavir, Ritonavir ड्रग्स बरेच चर्चेत होते कारण या ड्रग्स ची चाचणी काहीअंशी यशस्वी होताना दिसत होती. भाग 3 , 47 , आणि 52 मध्ये या ड्रग्स बाबतीत सविस्तर उल्लेख केला आहे. फूजीफिल्मजी पूर्वी कॅमेरा मधील रोल बनवत होते त्यांचीच Toyama Chemicals कंपनीमरफट   जपानमध्ये सर्वात प्रथम Favipiravir बनवण्यात आले. दिनांक १८ मार्च २०रजी वुहाण मध्ये सर्वप्रथम Favipiravir ( Pyarzine derivative) ची ३४० रुग्णांवर ( clinical trials) करणात