Corona Series Part 33
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, आणि चीनमधील उद्योगाचे स्थलांतरण
कोरोनाचे जन्मदाता चीन बाबतील जगभरात नाराजीचा सुर
आहेच हळू हळू त्याचे परिणाम जागतिकीकरणामद्धे दिसू लागतील. आज घडीला २०१९च्या
आकडेवारी नुसार पूर्ण विश्वामधील २८-२९% उत्पादन एकट्या चीन मध्ये केले जाते
त्याच्या खालोखाल १६% अमेरिकेत, ७% जपानमध्ये तर भारतता केवळ ३% उत्पादन केले जाते. म्हणजेच चीन पुरवठा साखळी मध्ये सर्वात अव्वल
स्थानावार आहे हे स्थान मिळवला चीनला जवळपास ३०-३५वर्ष गुंतवणूक आणि जागतिक
स्तरावर उलाढाली, कारस्थाने करावी लागली आहेत. आज
कोरोनाच्या निमिताने विविध उद्योग धंदे चीन मधून बाहेर पडायचा विचार करीत आहेत, परंतु हे इतके सोपे आहे का ! चीन त्यांना सहजासहजी
बाहेर पडू देईल ! कोरोनाच्या
निमिताने जगाच्या पाठीवर नवीन उत्पादन केंद्र स्थापित होण्यासामोरील आव्हाने आणि
आजची परिस्थिति याचा आढावा घेऊया.
कोरोनाच्या महामारीत देखील आंतर्राष्ट्रीय माध्यम
जागतिक आर्थिक बादलावर लक्ष ठेऊन आहेत. चीन मधून सर्वात प्रथम दक्षिण कोरियाची
मोबाइल मधील एक अग्रणी कंपनी (samsaung) आपले
उत्पादन केंद्र विएतनाममध्ये स्थलांतर करण्याचा विचार करीत आहे. अमेरिका आणि चीन मधील
व्यापारी युद्धा मध्ये आता अमेरिका आपले फासे फेकायला सुरवात केली आहे. सर्वप्रथम
अमेरिकेत चीन मधून आयात केल्या जाणार्या गोष्टींवर जसतीचा कर लावला सुरवात केली
आहे. त्याच अनुषंगाने गूगल, अॅपल, मायक्रोसॉफ्ट ईत्यादी अमेरिकन कंपन्यांनी उत्पादनाचे
कारखाने चीन मधून काढून अन्य देशात स्थलांतरण करण्याचा विचारा चालू केला आहे.
त्यातिल काही प्रमुख उदाहरणे पाहू. गूगलचा piexel मोबाइलचे उत्पादन चीन मधून विएतनाममध्ये स्थलांतरित कोरोनाचे संकट यायच्या
आधीच केले गेल होते. Nest
Wi-fi Routor आणि
स्मार्टफोनसाठी लागणार्या गोष्टींचे उत्पादन गूगल बरोबर ईतर कंपन्यांनी थायलंडमध्ये
स्थलांतरित करण्याचा विचार सुरू केला आहे.
वरील सर्व गोष्टी लक्षात घेता आपणास एकदम सोपे वाटेल, आज निर्णय घेतला उद्या स्थलांतरण, परंतु हे सर्व करत असताना काही अडचणी आहेत. चीनच्या
मनाविरुद्ध गोष्टी घडताना चीन याला आडकाठी लावनारच. आज चीनमध्ये जवळपास ४०% तयार
उत्पादनेचे (Finished
Goods) व ६०% कच्चा
मालाचे कारखाने आहेत. तयार उत्पादनेचे कारखाने चीन मधून हलवण्याचा विचार झाला तरी
पुन्हा कच्चा मालासाठी पुन्हा चीनवर निर्भर राहावे लागेल. असे झाले तर बाहेर
पडणार्या कंपन्या अडचणीत येतील. उदाहरणार्थ कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात चीन
मधून टायर, ईत्यादी वस्तु न मिळाल्याने जपानमध्ये
Nissan कंपनीच्या चार चाकी वाहनाचा
कारखाना बंद करण्याची वेळ आली. चीनने पायाभूत सुविधा उभा करणे करिता ३०-४०वर्ष ची
मेहनत घेतली आहे तश्या सुविधा ईतर कोणताही देश तयार करण्यासाठी चीनपेक्षा अधिक
वर्ष लागू शकतील. एखाद्या देशांनी चीन मधून बाहेर पडण्याचा निर्णय जरी घेतला तरी
त्या बरोबर इतर देशाचा कंपन्यांनी देखील तसाच विचार करायला हवा कारण ऐनकेण प्रकारे
सर्व कंपन्या एकमेकांवर सर्विस, मनुष्यबळ, कच्चा माल,
या करिता अवलंबून आहेत. अॅपलचे सीईओ टिम कुक म्हणतात ज्या प्रकारची पुरवठा साखळी, मनुष्यबळ,
कच्चा माल चीन मध्ये आहे त्या प्रकारच्या गोष्टी इतर देशात त्वरित मिळणे मुश्किल
आहे. परंतु हे साखळी मोडण्यासाठी छोटे छोटे बदल मात्र नक्की होऊ शकतात.
असेच अनुकरण जपान सरकार देखील करीत आहे. चीन मधून
बाहेर पडण्याचे कोरोना हे एक निमितमात्र आहे चीन जपान यांचा मध्ये seankaku टापू वरुण पूर्वी पासून वाद आहेतच. त्यासाठी तेथील सरकारने
जापनीज उद्योजकासाठी भरघोस मदत जाहीर केली आहे. जपानची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन
डॉलर ईतकी मोठीअसून त्याचा २०% (१ ट्रिलियन डॉलर) मदत जाहीर करण्यात आली आहे. जपान
प्रामुख्याने २५% चीन, ११% अमेरिका, ५% ऑस्ट्रेलिया या
देशमध्ये वाहन, semiconductors, प्लॅस्टिक आदि वस्तु निर्यात करते
तर नैसर्गिक इंधन कपडे आदि वस्तु आयात केली जाते. जपान मध्ये सरकार मार्फत on future नावाची कमीटी स्थापन केली त्याचा अवहाला नुसार उच्च
उत्पादन मूल्य असणारे सर्व घटकाचे कारखाने चीन मधून जपानमध्ये आणि ईतर घटक हे
दक्षिण आशियाई देशात स्थलांतरीत करणे आवशक्य आहे. हे ईतर घटकाचे स्थलांतरण
करण्यासाठी जाहीर केलेल्या मदतीमधील २.२ बिलियन डॉलर खर्च केले जाणार आहे. Tokyo shoko Research LTD या सर्वे एजन्सी मार्फत २६००कंपणी मधील
९६२-कंपनीची स्थलांतरनासाठीची तयारी सुरू झाली आहे.
ज्या प्रमाणे अमेरिका, जपानमध्ये गोष्टी होत आहेत तश्या गोष्टी कमी प्रमाणात परंतु भारतात देखील होत आहेत.
इकनॉमिक टास्क फोर्से ची स्थापणा केली गेली आहे. करोडो रुपयाची मदत उद्योगासाठी
जाहीर होऊ शकते. चीन वरील API वरची निर्भरत
कमी करण्यासाठी १३००० करोड रुपयाचे मदत जाहीर झाली आहे. Bulk Drug Production साठी NCL पुणे इथे संशोधन पूर्णत्वास आले आहे.
तसेच ईतर उद्योगधंद्यासाठी कमी अधिक प्रमाणात मदत केल गेली आहे. भारतीय उद्योजकांनी
याच पुरेपूर फायदा घेत निर्यात वाढवल्यास अर्थव्यवस्थेला नवी चालना येऊ शकते.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
Comments
Post a Comment