Corona Series Part 31
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, मास्क आणि स्वच्छता
2002 साली जेव्हा चीन मधून सार्सचा विषाणू पसरला, तेव्हा पासून चिन, जपान, तैवान, मध्ये मास्कचा वापर रोजचा झाला आहे. प्रदूषणयुक्त शहरांमध्ये मास्कचा वापर
करन गरजेचे आहे. आता तर कोरोनाचे संक्रमण पाहता सर्जीकल मास्कचा वापर अनिवार्यच
करायला हवा. हे खर आहे मास्कच्या वापराणे कोरोनाचे संक्रमण होण्यास अडथळा निर्माण
होईल. लॉक डाउनच्या काळात कदाचित मास्कचा वापर जास्त नसेल परंतु रोजचे जीवन चालू
झाले की प्रत्येक व्यक्तिला मास्कची गरज भासणार आहे. मास्कचा वापर करून झाल्यावर पर्यावरणाच्या
दृष्टीने एक नवीन प्रश्न उभा राहणार आहे. आज चीनच्या समुद्र किनारी ई ठिकाणी
प्लॅस्टिक सापडते तसे मास्क सापडू लागले आहेत. त्याची योग्य विल्हेवाट लावणं तितकेच
महत्वाचे आहे.
३ पदरी सर्जीकल मास्कमद्धे पातळ असे
प्लॅस्टिक, कापड आणि धातूचा पदर असतात.
मास्कचा वापर करून असेच कचर्यात टाकले असता सर्वप्रथम सफाई कामगार, सर्वसामान्य नागरिक आणि समुद्री जीव पशू पक्षी यांना
धोका संभवतो. ICMR च्या आताच्या मार्गदर्शक तत्वा
नुसार फक्त कोरोना बाधित रुग्णाचा मास्क वैद्यकीय कचरा म्हणून गणला जातो ईतर मास्क
नाही. त्यामुळे ईतर मास्कची विल्हेवाट लावणं स्वचता करन त्रासदाई ठरु शकते. अश्या
वेळी आपण मास्कची विल्हेवाट काशी करावी ते पाहू जेणे करून विषाणू विरहित वातावरणात
मोकळा श्वास घेता येईल.
मास्काच्या विल्हेवाट लावणे करिता केंद्राच्या
आरोग्य खात्याच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत. एक व्यक्तीचा मास्क दुसर्यांनी
वापरणे योग्य नाही,
मास्क जर घरी बनवलेला कापडी असेल तर
तो आधी उकळत्या मिठाचा पाण्यात टाकून उन्हात वळवला पाहिजे. मास्क पकडत असताना फक्त
मास्कच्या दोरीला स्पर्श झाला पाहिजे ईत्यादि.
सर्जीकल मास्क विल्हेवाट लावण्यासाठी २
प्रकार संगितले आहेत १) ५% ब्लीच किवा १% सोडियम हायपोक्लोराइड (NaClO४)चे द्रावण तयार करावे आणि मास्क त्यामध्ये थोडावेळ भिजत ठेवावा आणि त्या नंतर
वैद्यकीय कचरा उठाव करणार्यांकडे सुपूर्त करावा. २) मास्क पूर्णत जाळून टाकावा किवा खोल खड्डा कडून जमिनीत पुरावा. शहरवस्तीत राहणार्याना
जमिनीत पुरणे सोयीचे ठरणार नाही तसेच जाळून टाकणे देखील प्रदूषनास कारण ठरू शकते. (मास्क)
वैद्यकीय कचराच्या संदर्भात Central Polution Control Board- 18 मार्च 2020 यांच्या नुसार मास्क एक वेगळ्या पिवळ्या कचरा पेटी मध्ये गोला
करायल हवा आणि त्या नंतर वैद्यकीय कचरा वेगळा गोळा केला पाहिजे. हा वैद्यकीय कचरा पुढे
एक भट्टी (insinarator)मध्ये जाळून टाकला जातो शेवटी फक्त
राख राहते. नजीकचा काळात नगर, महानगर पालिका, पंचायत यांचा समोर मास्क, हातमोजे सारखा कचरा घरामधून वेगळं गोळा करण्याचे आवाहन राहणर आहे, अन्यथा कचर्याचा डब्यातून बाहेर गेलेला कोरोना पुन्हा
घरात येऊ शकतो. त्यामुळे लॉकडाउन नंतर रोजच्या कामाच्या व्यापात आपण मास्क इतरत्र टाकू
नका. आपला परिसराची स्वचता आपणच राखूया.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
Comments
Post a Comment