Corona Series Part 30
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, आणि Artificial Intiligance (AI)
कोरोना प्रकरण जसे चालू झाले तसे बरचे विषय नव्याने
चर्चेत येऊ लागले. आतापर्यंत आपल्या लक्षात आल असेल कोरोनामुळे मनुष्य दगावण्याचे प्रमाण
जागतिक पातळीवर 1% ईतके अत्यल्प असून, हे प्रमाण याहून ही कमी होऊ शकते जर आपण लवकरात लवकर निदान लावू शकलो. त्याच्यासाठी
सर्वप्रथम हॉटस्पॉट असणार्या ठिकाणी अधिक चाचण्या होणे आवशक्य आहे, आपण या आधी चाचण्या कोणत्या आणि किती कराव्यात हे समजून
घेतले आहे. चाचण्याच्या किटसाठी आज ही आपण विदेशी यंत्रणेवर अवलंबून होतो आता भारतात
बनवल्या जात आहेत. सरकारी यंत्रणेत असणारे तोडके मनुष्यबळ, असणार्या लॅब,
PPE किट असे बरेच प्रश्न
आहेत. शेवटी प्रत्येक गोष्टीला काही तरी मर्यादा आहेत. आणि त्याच मर्यादाचा शास्त्रीय
दृष्ट्या मार्ग काडण्याचा प्रयत्न संशोधक करत असतात पुष्कळ वेळा अपयश येत पण निराश
न होता पुन्हा पुन्हा प्रयत्न केला जातो. या कोरोनाचे निदान लवकर लागावे या करिता असाच
एक प्रयत्न जपान मधील क्योटो शहरात आयआयटी रूरकी मधील भारतीय संशोधक प्राध्यापक आणि
त्यांचा संघ करत आहे.
एखाद्या गोष्टीचा ध्यास आणि पुन्हा पुन्हा विचार
करू लागलो की आपल्याला त्याचे असे काही पैलू दिसतता की ते या आधी आपल्या समोर असतात
परंतु नजरेस येत नसतता. वैद्यकीय क्षेत्रात असणार्यांना अंदाज असेल जेव्हा एखाद्या
व्यक्तिला निमोनियाची लागण होते तेव्हा त्याचा
छातीचा एक्स-रे घेतला जातो आणि त्याचा फुफुसामध्ये किती पाणी (mucus) आहे हे पहिले जाते. कोरोनाच्या संक्रमनामध्ये देखील असेच
पाणी (mucus)
फुफुसामध्ये जमा होते. हाच साधा परंतु
थोडा वेगळा विचार या संशोधक संघाने केला, आणि Artificial
Intiligance (AI) च्या सहयाने एक सॉफ्टवेअर निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
नेमका काय आणि कसे हे तंत्र्ज्ञान कोरोन सारख्या विषाणूशी दोन हात करताना मदत करते
हे पाहू.
जसे फ्रॅक्चर, निमोनिया झाल्यावर एक्स-रे घेतला जातो तसे कोरोनाची लागण झाल्यावर
त्याचा
छातीचा एक्स-रे घेतला जाईल. पुढे त्याचे चित्र तयार होऊन कम्प्युटरमध्ये एका सॉफ्टवेअर
मधून प्रोसेस केले जाते आणि हे सॉफ्टवेअर त्या व्यक्तीच्या फुफुसा मध्ये कोरोना विषाणू
आहे किवा नाही याची माहिती उपलब्ध करून देईल. उत्सुकता अशी आहे की हे सॉफ्टवेअर कोरोनाच्या
विषाणूला कसे बरे ओळखत असेल! आतातपर्यंत शास्त्रज्ञानी कोरोनाचे रचना शोधली आहे त्याचा
RNA decode केला आहे या सगळ्याची माहिती त्या सॉफ्टवेअरमध्ये
पूर्वीपासूनच असेल. AI
च्या सहयाने सॉफ्टवेअर मध्ये असणार्या
महितीची तुलना एक्स-रे मधून आलेल्या माहिती बरोबर केली जाते. तेव्हा कोरोना विषाणू
शरीरात आहे की नाही हे समजले जाऊ शकेल त्याच बरोबर संक्रमण किती झाले आहे फुफुसमध्ये
पानी आहे का हे देखील समजू शकेल. कोणत्याही तंत्रज्ञानामध्ये फायदे, तोटे हे असतातच. आज ते देखील जाणून घेऊ एक तर अतिशय कमी
वेळेत आणि अत्यल्प दरात हे तंत्रज्ञान वापरू शकतो. 4 सेकंदा मध्ये आपण 100 एक्स-रे
काढू शकतो. या तंत्रज्ञानाची चाचणी जेव्हा pilot scale वर केली गेली तेव्हा त्याची अचूकता ९९ ते ९९.६० ईतकी आढळली आहे.
तसेच चाचनी करण्याकरिता रुग्णाच्या संपरकामद्धे राहण्याची आवशक्यता नाही. त्यामुळे
पीपीई सारखे किट जरी नसले तरी आपण काम करू शकतो. एखाद्या व्यक्तिला कोरोनाची बाधा नसेल
तरी त्याला सर्दी,
खोखला असेल तर तो नेमका कोणत्या कारणाने
आहे याची सूचना हे सॉफ्टवेअर आपल्याला देते. असे बरेच फायदे पाहून हे तंत्रज्ञान भारतातमध्ये
वापरण्यची चर्चा आणि चाचपणी चालू आहे. छोट्या प्रमानात जरी हे यशस्वी ठरले असले तरी
मोठ्या प्रमाणं तितकीच योग्यता सिद्ध झाली की या चाचनीला देखील परवानगी मिळेल. अश्या
वेगवेगळ्या मार्गाने या कोरोनावर मात करण्याचे प्रयत्न जगभरात चालू आहेत. अश्या संशोधनाचा
समाजाला नकीच फायदा होईल.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
Comments
Post a Comment