Corona Series Part 29
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, आणि तिरंगा
स्वित्झरलँड मधील आल्पाईन प्रदेश, ज्याला पारंपरिकपद्धतीने स्विस आल्प्स म्हणून ओळखले
जाते, स्विस आल्प्सची पर्वत रांगा ह्या स्वित्झरलँड, इटली, मोनको, औस्ट्रिया,
जर्मनी, स्लोवेणीया ई प्रमुख यूरोपियन
देशात 1200 किलोमीटर इतकी लांब पसरली आहे. त्यातील सर्वात उंच पर्वत Mont Blanc असून त्याची ऊंची 15,777 फुट इतकी आहे. नैसर्गिक वैशिष्ट्यने परिपूर्ण असणारे बरेच पर्वत इथे आहेत
त्यातील एक जो इटली आणि स्वित्झरलँड सीमेवर असणारा Mattehorn पर्वत [14,692 फुट
(4478 मीटर) ऊंची]. Mattehorn पर्वत म्हणजे छायाचित्र काढण्यासाठी
सर्वात देखणा असा आहे. या पर्वतावर स्वित्झरलँड सरकारच्या वतीने एकताचा संदेश
देण्यासाठी लाइट प्रॉजेक्टरच्या सहयाने भारतीय तिरंगा झळकवण्यात आला. या पूर्वी स्वित्झरलँड
सरकारने अमेरिका, स्पेन, यूनायटेड किंगडम, जर्मनी या देशाचे झेंडे या
पर्वतावर झळकवले आहे आणि आता या यादीत भारत देखील सामील झाला आहे.
आज स्वित्झरलँड देखील कोरोना विषाणूने त्रस्त आहे. आज रोजी 27,740 रुग्ण आणि 1,381
मृत्यू झाले आहेत. परंतु तरी देखील
भारत ज्या पद्धतीने कोरोनाशी सामना करीत आहे त्याची दाखल घेऊन भारतीयांचे मनोबल
वाढवण्यसाठी हा उपक्रम केला गेला. पुढारलेल्या देश ज्यांचे औषध निर्माण क्षेत्रात
नावलौकिक आहे अत्याआधुनिक तंत्रज्ञानाणे परिपूर्ण आहेत ते देश देखील जगाला औषधाचा
पुरवठा करण्यास नकार देत आहेत तिथे आज
पर्यन्त भारताने 55 देशांना Hydrocychloroquin, paracetamol असे कोरोंनाच्या उपचारासाठी आवशक्य असणारी औषधे वितरित केली. त्याच बरोबर जर
भारत सरकारने योग्य वेळी लॉकडाउन घोषित केला नसता तर हा विषाणू अधिक गतीने विश्वात
पसरला असता, सार्क देशांना केलेली मदत असेल
किवा भारता मध्ये आंतरगत यंत्रणा असो जी एकजूट भारतीय लोकांनी दाखवली आहे असे
उदाहरण जगात कुठे नाही. अश्या अनेक गोष्टीची नोंद अंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन
त्याचे एकजुटीचे प्रतीक म्हणून भारतीय तिरंगा पर्वतावर झळकवण्यात आला.
भारतीय तिरंगा पर्वतावर झळकने इतके महत्वाचे
आहे का ! आपल्याला कल्पांना असेल पूर्वीच्या काळी जेव्हा युद्ध होत असत तेव्हा
युद्ध फक्त रणभूमीवर खेळळे जात नव्हते तर रणभूमीच्या मागे युद्धासाठी आवशक्य योजना
आखल्या जात आणि शत्रू सैन्याचे मानसिक खच्चीकरण कसे केले जाईल याचे नियोजन केले
जात. आपले जे श्रधास्थान असते त्यचावर आघात झाला तर आपले मानसिक खच्चीकरण होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा काल पहा औरंगजेब, आदिलशाह किवा निजाम कोणीही असो ते जेव्हा स्वराज्यावर चालून आलेत तेव्हा येत
असतान वाटेत येणार्या सर्व प्रार्थनास्थळे मोडत येत जेणे करून युद्धाला सामोरे
जताना सामान्य लोकांचे मनोबल कमी होईल. युद्धात ध्वज, सेनापतीचे पतन झाले तर सेना रणभूमी मधून पळ काढत असे. आपण कधी हारतो जेव्हा
आपण मानसिक रित्या आपला पराजय स्वीकार करतो. आणि त्यामुळे अश्या युद्धाच्या वेळी
आपल मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी सकारात्मक गोष्टी कराव्या लागतात जेणे
करून आपले मनोबल वाढेल, आणी युद्धात विजयी
होण्याचा विचार सतत मनात घोळत राहील. ही सकरत्मकता आज भारतीय तिरंगा Mattehorn पर्वतावर झळकल्यामुळे आपल्या नागरिकन मध्ये येऊ
शकते. आणि म्हणूनच भारतीय तिरंगा Mattehorn
पर्वतावर झळकने इतके महत्वाचे आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
Salam india
ReplyDelete