Corona Series Part 28
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, आणि भारतीय सेना
13-लाख लोकांचे संघटन असणारी जगातील दुसरी मोठी सेना म्हणजे भारतीय सेना. भारत
भूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारी आणि भूकंप, महापूर अश्या कोणत्याही नैसर्गिक
आपदा मध्ये भारताच्या नगरिकांकसाठी धावून येणारे संघटन. भारत सरकारच्या एका
सूचनेवर “सूचना के बाद सोचणा बंद” अश्या पद्धतिने जिथे गरज लागेल त्या
ठिकाणी आपले कर्तव्य करायला तयार असतता. काल परवाचा महापूरच पहा भारताच्या एका
टोकावर असणार्या सैन्य तुकड्या (कश्मीर,
अरुणाचल) मधून दुसर्या टोकाला महाराष्ट्र, केरळ सारख्या ठिकाणी झोकून देऊन काम करताना पहिले आहे. काही लोक मात्र टीका करत
असतता त्यांची ती जबाबदारी/ड्यूटीच आहे त्यासाठी त्यांना मानधन मिळत परंतु जबाबदारी
जेव्हा स्वतच्या जीववावर येते तेव्हा भले भले लोक जबाबदारी सोडून पळ काढतात परंतु
खात्रीने सागू शकू भारतीय सैन्य मात्र “राष्ट्रास्तव जे झिजले कणकण ! तेच खरोखर
विजयी जीवन”! या पंक्ती प्रमाणे एक वेळ वीर मरण स्वीकारतील पण जबाबदारी मधून
मागे हटणार नाहीत. आज कोरोंनाच्या वैश्विक महामारीच संकट असताना स्वतचा कुटुंबाची
काळजी न करता आपले सारख्या सर्व सामान्य नागरिकांसाठी सीमेवर दहशवाद आणि कोरोनाचा
सामना करत आहेत.
भारताची सीमा म्हंटलं की भारत-पाकिस्तान आणि
जम्मू कश्मीर पटकन आपल्या डोळ्यापुढे येणारे चित्र आहे सहाजिकच आहे कारण सर्वात
जास्त अस्थिरता असणारी सीमा आहे. जिथे सारे विश्व कोरोना सारख्या वैश्विक महामारीवर
मात करण्यासाठी उपाय योजना आखत आहे तिथे शेजारील देश मात्र भारतता मध्ये अस्थिरता, उग्रवादी घुसवण्याची रणनीती आखण्यात गुंग आहे.
पाकिस्तानला आजही कश्मीर प्रकरण कोरोनापेक्षा जास्ती महत्वाचा वाटते. कोरोना ही
जणू भारतात मध्ये अस्थिरता निर्माण करण्याची जणू काही एक संधि आहे असे त्यांचे
वागणे आहे. The Economic
Times मधील वृतामध्ये
श्रीनगर 15 कोर चे Lt.
Gen. B. S. Raju म्हणाले, दहशदवादी काश्मीर मधून भारतामध्ये धुसण्याचा
प्रयत्नात आहेत. असे Intelegent Report आले होते आणि १-२ एप्रिल च्या
दरम्यान LOC violation देखील झाले. त्या पाठोपाठ कुपवाडा
मध्ये भारतीय जवान आणि आतंकी यांच्या मध्ये गोळीबार झाला आणि हँड टु हँड लढाई झाली
तिथे घुसखोरी करू पाहनारे दहशदवाद्याना यमसदनी पाठवले परंतु आपले जवान देखील शहीद
झाले. पाकिस्तान त्यांच्या जन्मापासूनच युद्धबंदी (ceasefire) आणि पुढे लाइन ऑफ कंट्रोलचे उल्लंघन (LOC violation) करत आले आहे. मागील मार्च २०१९
मध्ये २६० वेळा युद्धबंदी आणि एलओसी चे उल्लंघन झाले परंतु चालू वर्षामधील मार्च
महिन्यात ४१० वेळा आणि जानेवारी २०२० पासून आज पर्यन्त १२०० वेळा पाकिस्तानी
सैन्याने युद्धबंदी आणि एलओसी चे उल्लंघन केले. हे दहशदवादी, उग्रवादी म्हणून काश्मीर मधील काही तरुण मुलाना पैसा, आणि धार्मिक रित्या भावनिक बनवून नियुक्त करतात
मागिल वर्षी ११९ लोकांच्या अश्या नियुक्त्या झाल्या परंतु कलम ३७० आणि कोरोनाच्या
लॉक डाउन मुळे मात्र परिस्थिति बदलली आणि ह्या ४ महिन्यात फक्त ६ लोकान ते गळाला
लावू शकले. त्यामुळे निराश आणि चिडलेल्या ह्या संघटना जास्तीत जास्त गोळीबार, एलओसीचे उल्लंघन करत आहेत. परंतू भारतीय सेना
त्यांचे हे मनसुबे उधळून लावल्या शिवाय राहणार नाही. पाकिस्तानी सैनिकी सरकारचे आणि
दहशदवादी संघटणेची ही एक बाजूची खेळी आहे. आता दुसरी बाजू पाहू.
पाकिस्तान मध्ये आतातपर्यंत कोरोनाचे ७६३८
रुग्ण असून १४३ मृत्यू झालेत. त्यातील ३४१० रुग्ण पंजाब प्रांता मध्ये आहेत. पंजाब
हा तसा दाट लोकसंखेचा,
आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनामधून सर्वात महत्वाचा प्रांत आहे. पाकिस्तान मधील
कोरोना बाधित रुग्णांना मिरपूर आणि गिलगिट-बाल्टिस्तान मधील Quarantine केंद्रामध्ये पाठवत आहे. अर्थात त्याचे स्थलांतर करत
असताना देखील विषाणूचा फैलाव होत आहे. गिलगिट-बाल्टिस्तान मध्ये दर १ लाख
लोकांमध्ये कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. २२०लोक/ १लाख. परंतु गिलगिट-बाल्टिस्तान
हे प्रेक्षणीय जरी असेल तरी हा भाग सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही आणि
इथे आंतरराष्ट्रीय पर्यटक ही येत नाही तरी देखील कोरोनाचे रुग्ण इथे जास्त आहेत. हे
हेतूस्पर केले जात आहे. त्याची बरीच कारणे आहेत एक तर पंजाबचे पाकिस्तानसाठी
असणारे महत्व इथे पंजाबा मधील नागरिकांची जास्त काळजी घेतली जात आहे, गिलगिट-बाल्टिस्तान मधील नागरिकांपेक्षा. काश्मिरीमधील
कार्यकर्त्यांनी आंदोलने केली परंतु त्यांचा आवाज दाबला जात आहे. दुसरे म्हणजे
पाकिस्तान आपल्या सैन्याला कोरोंनाच्या विषाणू पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत
आहे. आणि त्याच बरोबर कोरोनाचा फैलाव झाला तरी तो पाक अधिकृत कशिमर मधून भारतता व
भारतीय सैन्यला होऊ शकेल, त्याच संधीची वाट
पाहत पाकिस्तानी सेना भारताच्या भूमी मध्ये उग्रवादी, घूसखोरी, युद्धबंदी आणि लाइन ऑफ कंट्रोलचे उल्लंघन
करण्याचा अधिक प्रयत्न करण्यात आपली शक्ति वाया घालवत आहे.
या उलट भारतीय सेना मात्र सार्या जगाल एक
उत्तम उदाहरण देत आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडत आहे आणि कोरोना आणि सीमेचे
रक्षण अश्या दोन्हीही भूमिका पार पाडत आहे. सेने मध्ये social distancing पालन करणे अतिशय अवघड बाब आहे परंतु १३ लाख लोकांना
संक्रमनापासून वाचवन्याचे आवाहन त्यांनी स्वीकारले आहे त्याकरिता भारतीय सेनेने ऑपरेशन
नमस्तेची योजना आखली आहे. ह्या ऑपरेशन मध्ये भारतीय सैन्या मधील लोकांच्या
कुटुंबाची देखील जबादरी स्वीकारली आहे. तसेच राज्य, आणि केंद्र सरकारला लागेल ती मदत केली जाणार आहेत. त्यासाठी ८ quarntine ठिकाणे उभी केली गेली आहेत आणि आरएनआर दिल्ली, एएफएमसी पुणे, कमांड हॉस्पिटल बंगळुरू, लखनौ, उधमपुर अशी हॉस्पिटल सज्ज ठेवली आहेत. भारतीय नोदल
मार्फत विशाखापट्टणम, झासी, ई ८ ठिकाणी वैद्यकीय सेवाची यंत्राना लावली आहेच त्याचबरोबर वैद्यकीय सहायता
पुररावण्याकरिता दिल्ली ते गोवा अशी विमान सेवा देत आहेत. भारतीय सेनेतील डॉक्टर आवशक्य
असेल तिथे त्यांची सेवा पुरवत आहेत. सुरवातीला जेव्हा इराणमध्ये भारतीय लोक अडकले
होते त्यांच्या साठी पूर्ण लॅब वाहून नेण्याचे काम सैन्याने केले. चीन मधून API आणायचा आदेश आले तरी भारतीय वायु सेनेची विमाने सज्ज
आहेत. काश्मीर मध्ये रोजनदारी कामगार लोकांना स्वत अन्नधान्य वितरित केले. हे सर्व
करताना सीमेवरही लक्ष ठेऊन आहेत. तिथे सुधा कसे लढले पाहिजे त्याचे योग्य नियोजेएन
लावले असणारच आहे (ते गोपनीय असलेले बरे). अश्या प्रकारे भारतीय सेना दोन्ही
पातळीवर यशस्वी लढा देत आहे.
मी
आपनास एक विनंती करू ईचीतो, आपल्या
संपर्कामध्ये जर कोणत्या ही भारतीय सेने मधील अधिकारी, जवान किवा त्यांच्या कुटुंबामधील लोक असतील तर
त्यांना एक फोन करून विचारपूस करा आणि त्यांचे मनोबल वाढवा तुमचा एक फोन सीमेवर
लढनार्या सैनिकाला हत्तीचे बळ आणि भावनिक आधार देवू शकेल.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
Comments
Post a Comment