Corona Series Part 27
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, आणि रॅपिड अॅंटी बॉडी टेस्ट
काल चर्चा केल्याप्रमाणे २० एप्रिल नंतर ग्रीन आणि ऑरेंज
झोन मधील लॉकडाउनचे नियम शिथिल होतील परंतु रेड झोन मध्ये असणारा भाग मात्र लॉकडाउन
राहणार आहे. देशातील ७७६ जिल्यामधील १७० जिल्हे हॉटस्पॉट म्हणून गणले गेले आहेत
त्यातील १४ जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत.
मनात
प्रश्न निर्माण होतो. रेड झोन (१७० जिल्हे) मध्ये असणारा भागातील लोकांच्या मनात
अस्थिरता निर्माण होऊ लागेल जर एक पत्रावर हजारो लोक रेल्वे स्थानकावर जमा
होण्याची मानसिक अवस्थेत आज समाज असेल तर शेजारील भागात जनजीवन सुरळीत होऊ लागले
तर एक एक दिवस लॉकडाउन मध्ये व्यतीत करन समजतील काही उतविल लोकांना असहय होऊ शकेल.
मानवाचे काही स्वभाव आहेत आणि त्यातूनच समजाचा स्वभाव निर्माण होतो आज जवळपास महाराष्ट्रच
काय तर संपूर्ण भारत लॉकडाउन आहे. सगळीकडेच आर्थिक व्यवहार बंद आहे परंतु एक
जेव्हा ग्रीन झोन मधील कारखाने, ऑफिस आर्थिक
व्यवहार चालू होऊ लागतील तेव्हा रेड झोन मधील काही कामगार वर्ग, व्यापारी हे संयम राखू शकणार
नाहीत (शक्यता आहे असेच होईल असे नाही) आणि हे अनधिकृत रित्या स्थलांतरण करण्याचा
भूमिकेत असतील कारण ३ मे नंतर लॉकडाउनच निघेल याची जबाबदारी कोणी घेऊ शकणार नाही. अर्थातच
पोलिस आणि प्रशासनावर कायदा आणि सुव्यवस्था रखण्यचे बरडन वाढेल आणि ते त्यांची
जबाबदारी निभावतील. आता रेड झोन मधील हा भाग ग्रीन झोन मध्ये बद्ल्ण्यासाठी शास्त्रीय
दृष्ट्या काय करावे लागेल. Quarantine, isolation चे पालन हा एक भाग आहे परंतु त्याहून ही महत्वाचे म्हणजे जास्तीत जास्त
लोकांच्या चाचन्या कराव्या लागतील.
भारतता कोरोनाची चाचणी करण्यासाठी प्रत्येक
जिल्ह्यामध्ये लॅब उपलब्ध नाहीत त्यामुळे कोरोनाची चाचणी करून त्याचा निकाला समजण्यासाठी
१ ते ३ दिवस लागत आहेत. इथे भारत सरकार
प्रय्त्न्शील आहे लागणारा वेळ कसा कमी करता येईल काही दूसरा उपाय करता येईल का? तेव्हा पूल
चाचणीचे सूत्र, रॅपिड अॅंटी बॉडी टेस्टच्या वापराचा प्रयोग करावा असा विचार ICMR कडून सरकारला देण्यात आला. सरकार ने हा विचार आमलात
आणायचे मानी करून केरळ, महाराष्ट्र, राजस्थान ई राज्य सरकाराना रॅपिड अॅंटी बॉडी टेस्ट
वापरास परवानगी दिली आहे.
रॅपिड अॅंटी बॉडी टेस्ट काय हे समजून
घ्यायच्या आधी कोरोनाची टेस्ट काशी केली जाते हे समजून घेणे गरजेचं आहे. कोरोंनासाठी
Polymerase Chain Reaction (PCR test) आणि Nucleci
Acid Test (NAT) केली जाते. त्याची किमत ४५०० रु आहे. कोरोना हा RNA विषाणू आहे. सर्वप्रथम रुग्णाच्या घशातून नमूना घेतला जातो. Reverse Transcription Polymerase Chain
Reaction चा वापर
करून RNA चे DNA मध्ये रूपांतर करून पुष्कळ प्रती केल्या जातात आणि फ्लोरोसेंट लाइट/ stain चा वापर करून कोरोनाच्या विषाणूचे प्रमाण ठरवले जाते.
सर्व प्रक्रिया पूर्ण होणेकरिता ७ ते ८ तास लागू शकतात त्यातून ही सपूर्ण देशातून
येणारे नमुने आणि असणार्या लॅब याची सांगड घातली असता एक नमुन्याचा निकाल त्या
व्यक्ति पर्यन्त पोहोचण्यासाठी २ ते ३ दिवसाचा कालावधी लागू शकतो. अश्या वेळी कमी
वेळेत जास्त नमुने तपासण्या करिता रॅपिड अॅंटी बॉडी टेस्टच उपयोग होऊ शकतो.
रॅपिड अॅंटी बॉडी टेस्टचे किट हे मलेरिया, डेंगू,
किवा pregnecy टेस्ट किट सारखे असते. त्याची
किमत ३०० ते १००० रु आहे. हे किट कसे उपयोगाला येऊ शकते त्यासाठी एक उदाहरण समजून
घेऊ जसे राज्यसेवा लोकसेवा आयोगाचा जागा १०० ते १००० निघतात परंतु लोखो लोक
नोकरीसाठी अर्ज करतात अश्या वेळी एकच परीक्षा घेऊन पास होणारय सर्वांची मुलाखत
घेणं हे वेळ आणि पैसा आणि श्रमदायी आहे म्हणून आधी पूर्व, मुख्य आणि मुलाखत घेतली जातात प्रत्येक प्ररीक्षिच्या टप्प्यात परीक्षर्थांची
संख्या कमी होत जाते. तसेच रॅपिड अॅंटी बॉडी टेस्ट म्हणजे एक प्रकारची पूर्व चाचणी
आहे.
जेव्हा एखयादया व्यक्तिला कोणताही विषाणूची
बाधा होते तेव्हा शरीरामद्धे अॅंटीबॉडीज तयार होऊ लागतात (Corona Series Part 13) रॅपिड
अॅंटीबॉडी टेस्टमध्ये नेमक हेच तपासल जाते, व्यक्तिच्या शरीरातील रक्ताचे नमुने (१-२ ड्रॉप) किट वर घेतले जातता आणि अॅंटीबॉडीज
आहेत की नाही याची पुष्ठी केली जाते. सर्वप्रथम विषाणूची लागण झाली की दोन
प्रकारचे Immunoglobuline
तयार होतता त्यातील एक Immunoglobuline -M (IgM) हे सुरवातीला २ दिवसात तयार होतात. रॅपिड अॅंटी बॉडी टेस्टमध्ये IgM हजर असेल तर आपले शरीर कोणत्या ना कोणत्या विषाणू, जिवाणूने संक्रमित झाले आहे असे समजले जाते. पुढे ७
ते १० दिवसात शरीरात Immunoglobuline-G (IgG) चे प्रमाण वाढले जाते एकदा का IgG चे प्रमाण वाढले की आपण इम्यून होतो. (विषाणूशी लढा
देण्यास सक्षम).
जिथे कोरोनाचा हॉट स्पॉट आहे किवा रेड झोन
आहे तिथे कमीत कमी वेळेत कोरोंनाची मुख्य टेस्ट करणे शक्य नसल्याने जास्तीत जास्त
लोकांच्या रॅपिड अॅंटीबॉडी टेस्ट केली जाईल. समजा इथे अॅंटीबॉडी टेस्ट पॉजिटिव आली
तर रुग्ण कोरोंना पॉजिटिव समजला जाईल आणि निगेटिव आली तर तपासणी
करणारे डॉक्टर ठरवतील त्या व्यतिची PCR / NAT टेस्ट
करण आवशक्य आहे की नाही.
समझा डॉक्टराना काही रुग्णांमध्ये अॅंटीबॉडी
टेस्ट निगेटिव आढळली परंतु काही कोरोनाची काही लक्षणे किवा प्रवास झाला
असेल तर त्या व्यतिची PCR / NAT टेस्ट केली जाईल.
काही व्यक्ति मध्ये अॅंटीबॉडी टेस्ट
निगेटिव आहे तसेच कोणतीही लक्षणे नाही किवा प्रवास झालेला नाही तरी
देखील खबरदारी म्हणून त्या व्यक्तिला डॉक्टर ७ ते १० दिवस quarantine होण्याचा सल्ला दिला जाईल आणि पुन्हा १० दिवसाने अॅंटीबॉडी
टेस्ट केली जाईल.
अश्या
प्रकारे रॅपिड अॅंटी बॉडी टेस्टचा वापर करून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांची
कोरोनाची चाचणी केली जाईल. आणि एकदा का तपासणीचे प्रमाण वाढले की बाधित रुग्ण
सापडतील त्यांना isolate
केल जाईल आणि कोरोनाचा फैलाव
होण्यापासून थांबवले जाईल. आणि आपसूकच रेड झोन हळू हळू ऑरेंज आणि ग्रीन झोन
होण्यास मदत होईल व लॉकडाउन संपून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येईल.
प्रा
डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
Comments
Post a Comment