Corona Series Part 26
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, आणि सामाजिक संयम
लॉकडाउन वाढणार होता फक्त 14 एप्रिलला लॉकडाउन 2 ची घोषणा झाली.
आणि त्याच बरोबर मुबई (वांद्रे), सूरत, हैदराबाद मध्ये हजारोच्या संखेने अडकलेल लोकं रेल्वे
स्थानकावर आले. असेच आले का ते ? नाही इथं अफवाची
शेती भरभरून करण्यात आली होती मग त्या शेतीसाठी माध्यमांनी (पत्रकारांनी) जमीन
नांगरली, कोणत्यातरी कामगार संघटनेचे
अध्यक्षांनी बियाणे पेरले आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी त्याला योग्य खत पाणी
घतला आणि त्याचच पीक भरभरून रस्त्यावर आल त्या पीका सोबत पिकावर पडणारा रोग डोके
वर काडणार हे सर्वांनाचा ज्ञात होते पण दुर्लक्षित करायच हे ठरवलेलच होता. कारण
पीक आज आले उद्या ही येणार आहे त्याता रस नाही त्यापेक्षा त्या जमिनीवर अधिकार कसा
गाजवता येईल ह्या कडे सर्वाचे लक्ष होता. माध्यम लोकशाही मधील एक प्रमुख स्थंब आहे
कोणत्याही गोष्टीचे पुरेपूर विश्लेषण करताना त्याचे समाजावर काय परिणाम होऊ शकतो हा
विचार करणे गरजेचे आहे. ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली सबळ पुरावे नसतांना
एखादी बातमी काय करू शकते त्याच आज उदाहरण आपल्या समोर आलेच आहे.
एक गोष्ट लक्षात यायला हवी होती ती म्हणजे
असाच उद्रेक जर सपूर्ण भारतात झाला तर आपण कोरोनाबरोबरच युद्ध जे जिंकत चाललोय त्यात
आपली पीछेहाट आपल्याच सैन्यामुळे होईल. एक उदाहरणं इथ द्यावस वाटत विश्वास पाटील
यांच्या पानीपत मधील मराठयंच्या युद्धातील प्रसंग मराठे युधमद्धे जिवाची बाजू
लावून लढत असतात घोडदल, पायदळ, तोफखाना आखलेल्या युद्धनीती नुसार मार्गक्रमण करत
असतातत, युद्धाला तोंड फुटल्यावर इब्राहिम खान
गारदी याच्या तोफखान्याने अब्दालीच्या मधल्या फळीचं कंबरडं मोडलं होतं. मात्र
त्याच वेळी विठ्ठलपंत विंचुरकरांच्या तुकडीने गोल मोडला आणि रोहिल्यांच्या दिशेने
धाव घेतली. तोफखान्यासमोर आपलेच सैन्य आलेलं बघून इब्राहिम खानाला तोफखान्याचा
मारा बंद करावा लागला. याचा पुरेपूर फायदा अब्दालीने घेतला आणि उंटांवरच्या आपल्या
हलक्या तोफा पुढे करत मराठ्यांना भाजून काढलं," इथ सफाई कामगार, पोलिस, वैद्यकीय क्षेत्रामधील लोकं, सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि सुज्ञ नागरिक आपली जबदारी जिवाची
पराकाष्ठा करून पूर्णत्वास नेत आहेत परंतु काही माध्यम आणि राज्यकर्ते मात्र श्रेय
आणि सत्ता घेण्याचा नादात विठ्ठलपंतची भूमिका करू पाहत आहेत. आजची त्यांची ही
भूमिका नक्कीच समाजाला कोरोंनाच्या खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही. लॉकडाउन 1 सुरू
झाल्या वर ज्या प्रमाणे दिल्लीच्या आनंद विहार मध्ये लोक जमा झाले इथं ही
माध्यमांनी लॉकडाउन कसा मोडला जातोय हे दाखवण्यात टीआरपी आहे हे ओळखले होते परंतु
त्या नंतर त्या लोकांना त्यांचा गावी अतिशय नियोजन बद्ध पद्धतीने पाहोचवले गेले हे
मात्र दाखवले नाही कारण घरी पोहोचन्यात टीआरपी नाही. त्याच प्रमाणे मुबाई मध्ये घडू पाहत आहे. आरोप
प्रत्यारोप करण्यापेक्षा त्या लोकांचा प्रश्न कसा मार्गी लावता येईल हे पाहायला हवे.
आणि माध्यमानी सुद्धा नागरिकांचे मनोबल वाढेल अश्या बातम्या देणे गरजेचे वाटते त्या
मधून लोकांना घरी राहण्याची जाणीव होईल.
पुढे देखील 20 एप्रिल नंतर भारतामधील काही
भागात (ग्रीन झोन) लॉकडाउन शिथिल करण्यात येईल परंतु काही ठिकाणी लॉकडाउन (रेड
झोन) आहे असा राहील. काही भागतीतल वातावरण सुरळीत झाल्यावर रोजच्या आर्थिक सामाजिक
क्रिया होतील आणि त्याच्या बातम्या माधमामधून दाखवल्या जाणार आहेत. अश्या वेळी
नागरिकांनी संयम बाळगणे आणि आपल्या भावनानावर नियंत्रन ठेवणे खूप महत्वाचे आहे. आपण
जर असे केले नाही तर प्रशासनाला निर्माण झालेला गोंधळ निवारण करण्यात आपली शक्ति
घालवी लागेल आणि प्रशासनातील कोरोंनाचे योध्ये त्यात बळी पडतील तेव्हा बुडत्याचा
पाय खोलात या उक्ती प्रमाने कोरोंनाचा विळखा अधिक वाढू शकेल.
सर्व नागरिक, सामाजिक, राजकीय नेते, कार्यकर्ते,
माध्यम, समाजातीतल सर्वच घटकांनी याचा
विचार करावा आणि भारतावरील आलेल संकट आपल्या चुका मधून न वाढवता घरी राहायचा
राष्ट्रधर्म पाळूया, चला तर माग आजच आपण दृढ़ निश्चय करूया,
!! पूर्ण विजय संकल्प हमारा, अनथक अविरत साधना !!
!! निशिदिन प्रतिपल चलती आई, राष्ट्रधर्म आराधना !!
!! वंदे मातृभूमी वंदे, वंदे
जगजनणी वंदे !!
प्रा
डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
Comments
Post a Comment