Skip to main content

Corona Series Part 24 : कोरोना आरोग्य सेतु आणि अभियंता


Corona Series Part 24
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. माननीय पंतप्रधान आज राष्ट्राला सबोधित करणार होते ते काय बोलतता त्या अनुषंगाने आजचा लेख लिहायचा होतो.

कोरोना आरोग्य सेतु आणि अभियंता
      आजच लॉक डाउन 3 मे पर्यन्त वाढला. आपण लॉक डाउन कडे कसे पाहता त्यावर आपली मानसिक स्थिति येणार्‍या काळात कशी राहील हे अवलंबून आहे. मागील काही दिवस आपण वृतपत्र, बातम्या, टीव्ही, सोशल मीडिया या सर्वांची टीआरपी आणि ब्रॅंड वॅल्यू वाढली असून जवळपास सर्वच बातम्या ह्या नकारात्मक आहेत. नोकरी वरील गंडांतर, व्यवसायात नुकसान, नागरिकांचा मृत्यू ईत्यादी. परंतु आपण थोड सकारात्मक वृतीने लॉक डाउन कडे पहाल तर लॉक डाउन च्या काळात आपण आपल्या आयूषात वेळ नाही म्हणून काही गोष्टी करायच्या राहून गेल्या त्यातील काही गोष्टी सत्यात आणण्यासाठी मिळालील ही एक संधि ठरू शकते. त्याचबरोबर नजीकच्या काळात व्यवसाय व नोकरीमध्ये नवनवीन बदल घडू शकतात तसेच नवीन आव्हाने देखील उभी राहणार आहेत.
      आजचा पहा जगातील 50% लोकसंख्या आज रोजी लॉकडाउन जरी असली तरी विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या, शाळा, कॉलेज काही प्रमाणात आपली काम ऑनलाइन करू पाहत आहेत. कामाचे नियोजन करत आहेत हे नियोजन करण्यासाठी प्रत्यक्ष एकत्र येऊन बैठक किवा तास घेण्याची आवशक्यता कमी झाली आहे. वर्क फ्रॉम होम ह्या टॅग लाइन नुसार घर बसल्या आपली कामे काही प्रमाणात होत चाललली आहेत. त्या करिता विडियो कोनफरनसिंग सारखी अॅप्लिकेशन वापरत आहोत.
      मागील दशकापासून विडियो कोनफरनसिंग अॅप्लिकेशन तंत्रज्ञानचा वापर हळूवार वाढतोय. अमेरिकनमूल असणार्‍या Sykpe, Webex, आणि आता Zoom या तीन अॅप्लिकेशनचा वापर केला जातोय, स्काइप मात्र मागील 10 वर्षामध्ये या क्षेत्रात अधिराज्य गाजवतोय परंतु आताचा काळात नव्याने विकसित केलेले झूम अॅप्लिकेशन चा वापर भरपूर प्रमाणात वाढला आहे कारण त्याचा दर्जा, आणि लागणारा अत्यल्प डेटा. लॉक डाउन झाल्यापासून झूम अॅप्लिकेशनचे डाउनलोडिंग चा आलेख प्रचंड वाढला आहे. असे अॅप्लिकेशन रोजच्या जीवनात वापरल्याणे प्रदूषणाला आळा बसतोय तसेच बचत देखील होत आहे. अमेरिकेत झालेल्या एका सर्वे नुसार 19 बिलियन डोंलर इतका मुनाफा विविध कंपंनींना झाला आहे. परंतु काही तज्ञ व्यक्तींच्या म्हणण्यानुसार खाजगी सुरेक्षेच्या दृष्टीने झूम वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सायबर सुरेक्षेच्या दृष्टिने यूनिवर्सिटी ऑफ टोरोंटों मधील सिटिझन लॅब ने केलेल्या संशोधनानुसार झूम मधील काही सर्वर हे चीन मध्ये आहेत आणि हे अॅप्लिकेशन रन करणे करता दुसर्‍या छोट्या कंपनीचा (3rd पार्टी) वापर केला जात आहे अश्या तीन कंपन्या चीन मध्ये असून 700 लोक काम करत आहेत. विशेष म्हणजे हे झूम अॅप्लिकेशन चीन मध्ये वापरास बंदी केली गेली आहे.     चीन हा शब्द आविश्वासाचा समानार्थी शब्द झाला आहे त्यामुळेच आपल्या गोपनीय माहितीची चोरी होणयची शक्यता वरतवली जात आहे आणि काही अंशी अश्या घटना घडल्या आहेत. म्हणून तैवान ने मार्च महिन्यातच सरकारी कामास झूम वापरण्यास मज्जाव केला आहे. The Economic Times मध्ये प्रसिद्धा झालले बातमी पाहा Broadcast Audience Research Council (BARC) ही संस्था मीडियाला सबोधित करणार होते परंतु, त्याचा डाटा लीक झाला आणि ते मीडियाला संबोधित करू शकले नाही. आज गरजेच्या वेळी आपण हे तंत्रज्ञान वापरत आहोत परंतु आज वापरत असताना एक प्रश्न येतोय की भारतासारख्या मोठ्या देशात स्वतहाचे असे विडियो कोनफरनसिंग अॅप्लिकेशन असू नये का ! आज हि काळाची गरज बनली आहे. फक्त डिजिटल इंडिया म्हणण्या पुरताच आहे का ! आज इंटरनेटचा वेग वाडतोय किमत कमी होत आहे तरीही असे अॅप्लिकेशन तयार होण्यास काय अडचण आहे. आपले इथे असे अॅप्लिकेशन तयार करण्यास प्रतिभावंत अभियंते नाहीत का ! अडचण आहे ती राष्ट्रीय चारित्र्याची, स्वदेशी आणि आत्मनिर्भरता अश्या भावनाची होय स्वदेशी हा एक व्यवहार म्हणून पाहू नका भावना म्हणून पहा. त्यासाठी आज आपल्या शिक्षणात संस्कारात देशभक्तीचे जागरण झाले पाहिजे.
      जगाचा कोणत्याही देश घ्या तेथे आपल्या मातीतून निघालेले प्रतिभावंत अभियंते दिसतील.  कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये प्रतिभावान भारतीयांनी तंत्रज्ञान आणि माध्यमांच्या जगात अनेक महत्त्वाचे आणि सत्तेचे स्थान कायम राखले. तंत्रज्ञानाचा सर्वात अविश्वसनीय मार्गदर्शक म्हणजे अजय भट्ट, एक भारतीय-अमेरिकन संगणक आर्किटेक्ट, ज्याला (USB) यूएसबी मानकचे जनक म्हणून ओळखले जाते. इंटेल मधील प्रसिद्ध इंटेल पेंटीयम प्रोसेसरचे वडील विनोद धाम हे मूळचे पुण्यातील आहेत. सत्य नडेला मायक्रोसॉफ्टचे सीईओ, सबीर भाटिया हॉट मेलचे जन्मदाते. Google+ सोशल नेटवर्क मागचा माणूस म्हणून ओळखला जाणारे विक गुंडोत्र्रा Google चे सीईओ सुंदर पिचाई.  पुण्यात जन्मलेल्या फेसबुकच्या पहिल्या महिला अभियंता रुचि संघवी, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मोटोरोलाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पद्मश्री वॉरियर अशी किती तरी नावे आपल्या डोळ्यासमोर येतील परंतु आज स्वदेशीची गरज असताना अश्या बुद्धिवंतच्या बुद्धीचा त्यांच्या मात्रभूमीला उपयोग झाला पाहिजे परंतु असे होताना दिसत नाही. (ते तिकडे का गेले, इथ असणार्‍या अडचणी हा भाग वेगळा आहे).
      आज भारतासाठी म्हणून काम करणारे असे बुद्धिवंत अभियंते किती आहेत कदाचित जागतिक दर्जा वर त्यांची किर्ति पोहोचली नसेल. पण असे देशभक्तीने परिपूर्ण अभियंते (काही UPSC अधिकारी, ARMY मधील अभियंते) आज या भारतभूची सेवा नक्कीच करत आहेत. म्हनूनच मला ते वर नमूद केलेल्या लोकांपेक्षा जास्त आदर युक्त वाटतात. उद्याची गरज ओळखून भारत देखील सुरक्षित असे स्वतचे विडियो कोनफरनसिंग अॅप्लिकेशन तयार करेल अशी आशा आहे.
      अश्याच बुद्धिवंतच्या सुपीक कल्पनेतून आरोग्य सेतु ह्या अॅप्लिकेशन चा उदय झाला आहे. आज प्रधानमंत्रीनी ज्या सप्तपदी सांगितल्या त्यातील चौथे पाऊल म्हणजे हे अॅप्लिकेशन.
      मुळात हे अॅप्लिकेशन काय काम करेते. आपल्या शेजारी असणारे कोरोंनाचा हॉट स्पॉट ओळखते. तुमच्या शेजारी जर कोरोंना बाधित रुग्ण असेल किवा लक्षणे दिसणार व्यक्ति असेल तर ते तुम्हाला संभाव्य धोका लक्षांत घेऊन सूचित करते. कॉनटॅक्ट ट्रॅकिंग करते, आपण जर कोरोंना बाधित असाल तर आपण काय करावे काय करू नये अशी माहिती दिली जाते. त्या करिता आपला ब्ल्युटूथ, जीपीएस चालू असावे लागते. आणि आपण आपली खरी माहिती भरावी लागते. World Bank ने देखील भारताच्या अश्या अॅप्लिकेशनचे खूप कौतुक केले आहे. पंतप्रधानांच्या आव्हाना पर्यन्त 2 करोड लोकांनी हे अॅप्लिकेशन डाउनलोड केले आहे.
      चीन मध्येही कोरणा संक्रमण कमी करण्या मध्ये तेथील अश्या अॅप्लिकेशनचा मोलाचा वाटा आहे. अमेरिकेतही अश्या प्रकारचे अॅप्लिकेशन Google आणि Apple एकत्र येऊन तयार करत आहेत. परंतु हे अजूनही डेवलपमेंटच्या स्थिति मध्ये आहे.
      कोरोनाच्या लढ्या मध्ये अभियंते देखील तितकेच मोलचे काम करत आहेत. त्यांच्या याच कार्याल माझा लक्ष लक्ष सलाम. माझी विनंती आहे वाचकाना कृपया आपण आरोग्य सेतु अॅप्लिकेशन डाउनलोड करा आणि दुसर्‍यांना पण सांगा.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

  1. Request to all please download the aarogya setu app it is very informative

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...