Skip to main content

Corona Series Part 23 : कोरोना आणि औषध निर्मान कंपनी


Corona Series Part 23
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. काल आपण औषध निर्माते आणि वितरक यांवर थोडक्यात विचार मंथन केले आज तोच विषय पुढे घेत कोरोना सारखा एक विषाणू मुळे औषध निर्मान कंपनीचे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य बाबतीत सविस्तर माहिती करून घेण्याची गरज आहे. त्याच कारण अस की येणार्‍या काळात असे अडथळे येत राहणार आहेत व आंतर्राष्ट्रीय स्तरावर आता मुत्सद्देगिरी (Diplomacy) होत राहणार आहे.

कोरोना आणि औषध निर्मान कंपनी
      विकसित देशात मलेरिया जवळपास नाहीसा झाला आहे परंतु विकसनशील देशात आजही मलेरिया ने होणारे मृत्यूचे प्रमाण आधिक आहे. भारतामध्ये Hydroxychloroquine (HCQ) हे मलेरिया, Lupus, Rheumatoid Arthritis, अश्या विविध आजारांवर वापरले जाते आणि म्हणूनच भारत हा जगातील तिसरा औषध निर्माण करणारा देश आहे तसेच HCQ च्या निर्मानात 70% इतका मोठा वाटा उचलतो. दरमाह 20 करोड (40टन) गोळ्या भारतीय कंपन्या तयार करत आहेत परंतु गोळ्या निर्माण करण्याची क्षमता याहून पाच पट अधिक वाढवू शकतात.
      आज 13 देशांना आपण 2 दोन वर्गात निर्यात करतोय एक म्हणजे अर्थ व्यवस्था भक्कम असणारे अमेरिका, जर्मनी सारखे विकसित देश त्यंच्याशी व्यवहार करून निर्यात तर मानवता लक्षात घेऊन आर्थिक दृष्ट्या कमकुवत भुतान, नेपाळ, मालदिव (SAARC) देश यांना मोफत देत आहोत. हे करताना दोन्ही पातळीवर यश मिळत आहे, एक म्हणजे भारतात ह्या गोळ्यांची कमतरतात भासणार नाही हे आणि भारतता बाहेर निर्यात करून व्यवहार व विश्वगुरू ची प्रतिमा सांभाळतोय. भारतात ह्या गोळ्यांचा साठा आहे तरी किती! कोरोना बाधित रुग्णाल 14 गोळ्याचा कोर्स करावा लागतो त्या प्रमाणे उपलब्ध असणार्‍या 10 करोड गोळ्या ह्या 71 लाख लोकांना पुरतील इतक्या निर्यात केल्या आहेत तर आज 3.8 करोड गोळ्या खाजगी क्षेत्रात व 2 करोड जादा गोळ्यांचा साठा सरकार कडून ठेवण्यात आला आहे तसेच सरकारच्या सुचणेनुसार 10 कोटी गोळ्याचा buffer स्टॉक विविध कंपन्या मध्ये ठेवण्यात येणार आहे. अशी माहती Indian Drug Manufacture Association (IDMA) चे executive director अशोककुमार मदन, सेक्रेटोरी दारा पटेल यांनी जाहीर केली आणि हेल्थ मंत्रालयचे लव अग्रवाल म्हणतात  सरकार हे भारतीय औषध निर्मान कंपनी ना Make in India मार्फत सर्व सुविधा पुरवीत आहे.
      1990च्या दरम्यान 70% API भारतामध्ये निर्माण केले जात परंतु सरकारची चुकीची धोरणे आणि जागतिक बाजारात चीन ची सप्लाय चेन ह्या ना त्या कारणाने मागे पडत गेलो मागील काही दशकात 24 अब्ज किमतीचे API भारताने निर्यात केले आहे त्यातील 90% चीन मधून खरेदी केले जाते. आज गुजरात मधील औषध निर्मान कंपांनी 70,000 हजार करोड रुपये इतका (35%) वाटा उचलतता परंतु जर चीन ने API देणे बंद केले तर फक्त पुढे 3 ते 4 महीने काम चालू राहू शकते अशी दयनीय अवस्था आहे.
      2012 मध्ये व्ही एम कटोच नावाची कमिटी गठित केली 2015 साली रीपोर्ट मध्ये नमुद केले API तयार करण्यासाठी exclusive Park करणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने 2017 साली ड्रग्स निर्मिती साठी ड्राफ्ट बनवण्यात आला परंतु त्याचे कायद्यात रूपांतर झाले नाही. 2014 मध्ये अजित डोवाल म्हणाले इतक्या मोठ्या प्रमाणात चीन कडून क्च्चा माल घेणे भारतीय सुरक्षाच्या दृष्टीने आपयकारक आहे. असे असेल तर भारतात API निर्माण का केल जात नाही कारण API तयार करताना होणारे प्रदूषण, आपल्या कडे असणारे प्रदूषण मुक्त API निर्माण तंत्रज्ञाचा अभाव (Central Pollution Control Board कडून मान्यत मिळवण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात), कमी उत्त्पन, कर, सरकारचे दुर्लक्ष अशी बरीच कारणे सांगता येतील.
      आज कोरोनाच्या निमिताने औषध निर्मानाचे महत्व भारतीयांना समजून आले असेल तहान लागल्यावर विहीर खोदायला लागलो तर तहान भागात नाही अशी काहीशी परिस्थिति आज आपल्यासमोर उभी आहे. त्यातून ही काही सरकारच्या आणि औषध निर्मान कंपांनीच्या सकारात्मक बाजू पाहून आज ह्या कंपन्या तग धरून आहेत. परंतु भविष्यातील भारताचा विचार करता आज पायाभरणी करन आवशक्य आहे. त्या अनुषंगाने 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकी मध्ये नीती आयोगाचे सीईओ, अमिताब कांत विविध मंत्री तथा औषध निर्मान कंपनीचे सीईओ हजर होते. Central Drug Standard Control Organization यांनी 53-असे जीवनावशक्य ड्रग्स निवडले आहेत ज्यांचा कच्चा माला करिता चीन वरील निरभरता संपवून Make in India चा प्रयास केला जाणार आहे. त्याच प्रमाणे केंद्र सरकर ने 21 मार्च 2020 रोजी 9940 करोड हे API साठी आणि 3820 करोड वैद्यकीय साधनान करिता असे 13,000 करोड रुपयाचे पॅकेज देऊ केले आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून bulk drug पार्कची स्थापना केली जाऊन 3,000 करोड रुपये पुढील 5 वर्षासाठी (for infrastructure) दिले जाणार आहेत. अमेरिकेला संकटकाळी केलली मदतीचा फायदा आपण घेऊ शकतो अमेरिकेती तंत्रज्ञाचा वापर करून आपण प्रदूषण विरहित API निर्माण कर शकतो, आज फक्त काही ठराविक ड्रग्ससाठीच अमेरिकन मार्केट भातीय कंपन्यांसाठी खुले केले आहे त्याचा विस्तार अपेक्षित आहे. आज चीन अमेरिकेला लागणारे antibiotic तयार करून निर्यात करतो तो निर्यात भारताकडून घेण्याचा आग्रह आपण मित्र देश अमेरिकेला करू शकू जेणे करून एम्प्लॉयमेंट वाढेल आणि current deficiet सुद्धा कमी होईल. सकल्पित गोष्टी अपेक्षित पद्धतीने झाल्या तर भारतीय औषध निर्माण कंपन्या खरोखरच नवी दिशा मिळून देशाच्या जीडीपी मध्ये मोठा हातभार लावतील आणि अर्थव्यवस्था भकाम होऊन भारतीय औषध निर्मान कंपनीचे आपले जागतिक स्थान 1 नंबर वर जाईल. 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...