Corona Series Part
22
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न
करत आहे.
कोरोना वैश्विक महामारी आणि औषध निर्मात्याची भूमिका
आज ह्या वैश्विक महामारी ने सारे जग व्यापले आहे. सर्व काही ठप्प
झाले आहे एव्हाना कधी न थाबणारी शहरे आज लॉकडाउन होऊन बसली आहेत. असे असताना समाजातील काही घटक मात्र जिवाची पर्वा न करता
अहोरात्र काम करत आहेत पोलिस, डॉक्टर,
सफाई कामगार, त्याच बरोबर एक असा घटक कार्य करत आहे ज्या
घटकाकडे मागील दशकाणूदशके सरकारने दुर्लक्ष केले आहे तो म्हणजे औषध निर्माते आणि
वितरक.
आज पोलिस, सफाई
कामगारांचा संपर्कात येणारा प्रतेक व्यक्ति आजारी असत नाही पण डॉक्टर, औषध वितरकाच्या संपर्काती बहुतेक लोक हे कोणत्यातरी आजाराने पीडित असतात
अश्यावेळी वितरक आपला जीव धोक्यात घालून समाजाची सेवा करण्यात तत्पर असतो. परंतु
आज औषध निर्माते आणि वितरकाची अवस्था अतिशय वाईट आहे कारण त्याला कोण वाली नाही.
अगदी शिक्षणापासून ते व्यवसायापर्यन्त.
एक गोष्टी च्या रूपात आज औषध निर्मात्यांची अवस्था मांडतोय एका
जंगलात एक सिहं एक राजकुमारीच्या प्रेमात पडतो तो त्या राजाकडे जाऊन राजकन्याशी
विवाहाची मागणी घालतो तेव्हा राजा होकार देतो आणि खूप अटी घालतो सिहाचे हे आयाळ, नखे आणि सुळे काडले तरच विवाहा होणार. सिहं
तयार होतो जेव्हा आयाळ, नखे, सुळे
काढले जातात तेव्हा सिहाचे सिहंपण हरवून बसते आणि राजा त्याला पिंजरामध्ये कैद
करून सर्कस मध्ये पाठवतो. त्या प्रमाणे आपल्या औषध निर्मात्यांची अवस्था झाली आहे.
शिक्षण AICTE मधून घ्या. औषध निर्मातेचे मंत्रालय हे
पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि काम आरोग्य क्षेत्रात केले जाते
म्हणजेच हा औषधनिर्माता त्याची ताकत ही कागपत्राची हालचाल करण्यात खर्ची होत
आहे. त्यामुळे भारतता औषधनिर्माना मधील नव
नवीन संशोधना होत नाही आहे आणि प्रगती खुंटुन हा सर्कस मधील सिहं प्रमाणे रोजच्या
कामात गुरफटून गेला आहे. कोणतीही सुविधा नाही, आर्थिक मदत
नाही, वरुण शिक्षण घेताना भरमसाठ फी,
व्यवसायात कर लादला जातोय आणि आज मात्र ह्या वैश्विक महामारी मध्ये संकटाचा सामना
करायला पुढे उभा केले जात आहे.
तरीही न डगमगता ह्या वैश्विक महामारी बरोबर असणार्या युद्धं
मध्ये कोणतीही ढाल हाती न घेता औषधामधील ज्ञानरूपी शस्त्र हाती घेऊन सेवा भावी
वृती ने 24 तास लढतोय. कोरोना सारख्या
रुग्णाचा सहवासात येत असताना माक्स, sanitizer ई सरक्षक साधने कशी वापरावी, व त्याची विलेःवाट कशी करावी याचे निशुल्क मार्गदर्शन करतोय. सर्वसामान्य
लोकांच्या मनाता कोरोना विषाणू च्या बाबतीत असलेली भीती दूर करण्यासाठी त्यांना
मार्गदर्शन, जनजागृती करतोय आणि त्यांचे मनोबल वृद्धींगत
करतोय. विविध औषद्निर्माण कंपनी मध्ये असणारे लोक लॉक डाउनच्या काळात देखील अधिक
वेळ कार्य करून औषधे मास्क ई ची निर्मिती करीत आहेत. काही कपण्यांनी आपली क्षमता
जावपास 10 पट वाढवली आहे आणि भारतच नाही तर आर्थिक महासत्ता असणार्या अमेरिका व
30 देशांना आपली सेवा कोणतीही आर्थिक वाढ न करता देत आहे खर तर औषद्निर्माण कंपनी
समोर असणार्या आव्हाना चा सामना करण्यासाठी आज तो अधिक आधिक पैसे कमवू शकतो असे न
करता आज आपल्या मनात वसुधैव कुटुंबकम ही आपली शिकवण लक्षांत घेऊन जगाचा पोशिंदा
म्हणून आपले समोर उभा राहत आहे. औषद्निर्माण शास्त्रज्ञ अहोरात्र कष्टाची परिसिमा
गाठून विविध संशोधन करत नवीन लस, औषध तयार करण्याचा प्रयत्न
करत आहेत. हे सर्व करत असताना त्याने समाजाकडून कसलीच अपेक्षा ठेवली नाही. संकटकाळी
जो कामस येतो तोच खरा मित्र त्याप्रमाणे आज जे कार्य औषध निर्माते आणि वितरक करत
आहेत त्याची जान समाजाने आणि सरकारने ठेवावी म्हणजे त्याचा अंगी पुन्हा नवी
आव्हाने स्वीकारायची उर्मि येईल.
आज कोरोंना सारख्या विषाणू निमिताने औषद्निर्माणांतील तांत्रिक
आणि आर्थिक अडथळे सरकारला जाणवले असतील येणार्या काळात अडथळे दूर करण्यासाथी आपले
सरकार योग्य पावले उचलून महाभारतातील अर्जुना प्रमाणे आपल्याला शक्तीशाली, स्वावलंबी बनवले की आपला एकलव्य केला जाईल हे पाहणे
उत्सुकतेचे ठरेल.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज
कोल्हापूर
Some of medical shop do very best work but some are more rude 👿and arrogant in this lockdown
ReplyDeleteWeldone pharma
ReplyDelete