Corona Series Part
21
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न
करत आहे. सदर लेखमधील लिखाण अंतरराष्ट्रीय वृतपत्र विविध न्यूज माध्यम WHO सकेतस्थळ ई वरील असणार्या
बातमीच्या आधारवरील विश्लेषण आहे तरी कोरोना बाबतील कोणतीही अफवा, जातीय तेढ किवा सरकारी कामात
अडथळा निर्माण करणे असा हेतु नाही आणि असा कोणताही मजकूर हा आक्षेप घेण्यासारखा
नाही. लेखकाचा उद्देश फक्त जनजागृती करणे हाच आहे.
कोरोना, चीन आणि World Health Organization (WHO)
संपूर्ण जगाला आरोग्य सेवा पुरवणे, संशोधनासाठी प्रोत्साहित करणे, विविध आजारांवर या जगतात एक सारखी योजणा राबवणे जे जे म्हणून काही मानवाच्या
आरोग्यासाठी करता येईल त्या सर्व गोष्टी करणे आणि संपूर्ण जगामध्ये आरोग्याच्या
बाबतीत संघटन करून त्याचे नेतृत्व करेने
हे उदीष्ठ ठेऊन 1948 साली WHO ची स्थापना झाली. आतातपर्यंत ह्या उदीष्ठे समोर ठेऊन हे संघटन कार्य करत आले
आहे.
आपणा
जानताच आज जगामध्ये आर्थिक महासत्ता होण्यासाठी प्रचंड मोठी स्पर्धा लागून राहिली
आहे ह्या आर्थिक महासतेच्या स्पर्धेत प्रगतशील राष्ट्रांनी WHO सारख्या सामाजिक, आरोग्याशी सबंधीत असणार्या
संघटनाना आपल्या मर्जी प्रमाणे चालवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आज त्याच
दुष्परिणामाने सपूर्ण विश्व व्यापले आहे. खर तर ह्या संकटकाळी WHO सारख्या संघटनांनी पारदर्शक आणि
निपक्षपाती प्रमाणे आज काम करायची गरज आहे परंतु कोरोना विषाणू चे प्रकरणं WHO ज्या पद्धतीने हाताळत आहे त्यामुळे
मनात शंकेचे काहूर उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. कोरोना विषाणू च्या संदर्भातील
काही घडामोडी आपण पाहू आणि त्याचा बारकाईने आणि पारदर्शकतेने अभ्यास करू.
27
फेब्रुवारी 2020 पर्यन्त चीनमध्ये कोरोंना विषाणूचे 79,251 बाधित रुग्ण होते आणि 3500 मृत्यूमुखी पडले होते
तेव्हा चीन व्यतिरिक्त जगातील 49 देशात 4,350 बाधित रुग्ण व फक्त 67 मृत्यू झाले होते. आणि आज एप्रिल ह्या सुरवातीचा
आठवड्यात आपण पहिलं तर चीन मध्ये बाधित किवा मृत्यू झालेली संख्या फार वाढली नाही
परंतु जगात मात्र आज 17 लाख पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आणि 90 हजार पेक्षा
जास्त मृत्यू झाले. ही एवडी मोठी हानी WHO सारखी संघटना रोखू शकली असती कीबहुना कमी करता आली असती पण जेव्हा संघटनेच्या
धोरणांना व्यक्तीगत फायद्यासाठी तिलांजली दिली जाते तेव्हा अशी हानी होणे हे रास्त
आहे.
सुरवातीला
वुहाण मध्ये जेव्हा कोरोनाचा फैलाव चालू झाला तेव्हा WHO चीनच्या बाजूने सकारात्मक होते आणि चुकीच्या बातम्या
प्रसिद्ध करत होते. ऑक्टोबर च्या शेवटी किवा नोहेंबर मध्ये रुग्ण दिसू लागले होते
परंतु चीन ने WHO ला अधिकारीक रित्या सांगायला 31 डिसेंबर पर्यन्त वाट पहायची आवशक्यता होती का...!
31 डिसेंबर या दिवशीच तैवान ने WHO ला कळवले होते की हा विषाणू एक माणसा पासून दुसर्या माणसा पर्यन्त संसर्ग
पसरवतोय ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष करण्यात आले. सपूर्ण जागतिक मीडिया ला कोरोना
समजायला 8 जानेवारी यावी लागली. चीन सरकारला सर्व प्रथम कल्पना देणारे 33 वर्षीय
डोळ्याचे डों लि विएंग्लियान यांचा आवाज दाबण्यात आला पुढे काही दिवसातच त्यांचा
मृत्यु झाला तरीही WHO गप्प होती. ईतर आजारात WHO फार कमी वेळात पेशंट झिरो पर्यन्त पोहोचली परंतु करोना बाबतीत मात्र त्यांना
यश आल नाही (की आणल नाही).
14
जानेवारी ला तर कहर करत अनेक उदाहरणे WHO समोर असताना आपल्या Twitter वरुण tweet केले“There is No Evidance to Human to Human Transfer of COVID-19” तेसेच 16 जानेवारी रोजी जेव्हा भारत, अमेरिका सारख्या देशांनी चीन वरुण येणारी विमानसेवा स्थगिती दिले आणि Travel Advisory जाहीर केली आणि
स्क्रीनिंग चालू केले तेव्हा WHO ने समर्थन न करता असे करणे कसे चुकीचे आहे हे संगितले आज ही आपण WHO च्या सकेतस्थळी आणि Twitter वर हे सर्व पाहू शकाल. फेब्रुवारीचा
दुसर्या आठवढ्यात वैश्विक महामारी घोषित करण्याची मागणी आली असता 11 मार्च
पर्यन्त वैश्विक महामारी घोषित करायला WHO कोणत्या मुहूताची वाट पाहत होते त्यांच त्यांनाच माहिती. 22 जानेवारी लॉक
डाउन घोषित केला परंतु 23 जानेवारी पासून चीन मध्ये नूतन वर्ष आरंभ होणार होते
तिथे 7 दिवस सुट्टी असते म्हणून एकट्या वुहाण मधून 50लाख लोक (काही लोक हा विषाणू
घेऊन) बाहेर पडले असे वुहाण च्या महापौर चे म्हणणे आहे. एक अभ्यासानुसार जर
नोहेंबर मध्ये चीन ने WHO ला कळवले असते आणि वैश्विक महामारी घोषित लवकर घोषित केली असती तर ईतर
देशांना देखील ह्या विषाणूच गांभीर्य लवकर समजला असतं आणि तर जवळपास 95% मृत्यु
वाचले असते. आता पर्यन्त आलेल्या सगळ्या विषाणूना त्यांच्या उगम स्थाना च्या
नावाने ओळखले जाते जसे नेफा विषाणू असो किवा एबोला असो (एबोला हे एक आफ्रिका मधील
नदीचे नाव आहे) परंतु कोरोन च बाबतीत WHO ने विशेष वागणूक दाखवली आणि ह्या विषाणू ल वुहाण विषाणू च्या ऐवजी nCOVID-19 विषाणू से नाव देण्यात आले. याचा आधार घेत चीन सपूर्ण जगाला
धमकी वजा विनंती करत आहे ह्याला चीनीविषाणू न सबोधता कोरोना किवा कोविहड 19 असे
म्हंटले जावे. अशी विशेष वागणूक WHO ने का दिली तर जागतिक पातळीवरील होणारी चीन ची बदनामी टाळण्यासाठी.
WHO चे अध्यक्ष डॉ टेड्रोस अधानोम
घेब्रेयेसुस हे अश्या देशाचे (एथोपिया) आरोग्य मंत्री होते, ज्या देशात चीन च्या One Belt One Rode च्या अंतर्गत बरेच
प्रकल्प चालू आहेत चीन ची प्रचंड अशी गुंतवणूक आहे. कदाचित डॉ टेड्रोस हे चीनच्या
ह्याच दबावाला बळी पडले आसवेत कारण ते एक कुशल संशोधक आहेत समाजकारणी किवा राजकरणी
नाहीत त्यामुळे समाजकरणाचा आणि राजकारणाचा त्यांचा अनुभव इथ कमी पडला असावा.
दिनांक
28 जानेवारी रोजी डॉ टेड्रोस हे चीन दौर्यावर गेले तेव्हा त्यांनी उलट चीन चे आणि
तेथील नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले ते म्हणले चीन पारदर्शकता बाळगून सर्व माहिती
सांगात आहे आणि ह्या विषाणूचा सामना कसा करावा हे चीन ने सार्या जगाला दाखवून
दिले आहे. चीन ने जगाला आपला जीव वाचवायला वेळ दिला आहे (China has brought the world time) या उलट 2003 मध्ये
जेव्हा सार्स विषाणू च फैलाव झाला तेव्हा फक्त 8000 रुग्ण बाधित होते आणि 800 लोक
मरण पावले तत्कालीन WHO च्या अध्यक्षा माजी पंतप्रधान नोर्वे डॉ ग्रो हरलेम बृंडलँड यांनी चीन ची
जबरदस्त आलोचना केली होते WHO च्या इतिहासात तेव्हा प्रथमच travel advisory जारी केली गेली होती. आणि अधिकारीकरीत्या चीन ची आलोचना केली होतती China gives globel health endanger असे विधान केले हेली होते. मागील 17 वर्षात असे काय घडले आहे की WHO ची भूमिका संशयाचा परिघात आली तर
2003 मध्ये चीन ची अर्थव्यवस्था ही निव्वळ 1.66 टृलियन डॉलर होते तर आज तीच अर्थव्यवस्था
ही 7 पटीने वाढून 12 टृलियन डॉलर झाली आहे. WHO हे एक सेवा सघटन आहे त्यामुळे आर्थिक चणचण ही असतेच
अश्या गरजेचं फायदा उठवत चीन ने WHO साठी देण्यात येणारे देणगी मागील 5 ते 6 वर्षात 50% ने वाढवली आहे. मागील
आर्थिक वर्षामध्ये 86 मिलियन डॉलर एवढी मोठी रक्कम तर देऊ केलीच शिवाय ज्या देशात One Belt One Rode, BRI असे प्रकल्प चालू आहे अश्या 35 देशात WHO चे कार्यालय बांधून दिले. जिसकी लाठी ऊसकी भेस अश्या
पद्धतीने चीन WHO ला हाताळत आपली मनमानी करत आहे. आजही अमेरिकाच WHO ला सर्वात जास्त निधि देत असला तरीही WHO चे चीन कडील झुकते माप पाहून
अमेरिकेन आपला हात अकडता घेतला आहे. WHO ने कोरोना बाबतील योग्य माहीत न देना. चीन ची टीका न करण, चीन मधील सी फूड मार्केट बंद
करण्याबाबत आवाज न उठवण, योग्य वेळी लॉक डाउन, वैश्विक महामारी travel advisory जरी न करन अश्या अनेक कु कर्म मुळे आज सपूर्ण जगाचे आर्थिक सामाजिक आणि
आरोग्य लॉक डाउन झाले आहे. या मधून भविषयत WHO वरील विश्वास उठल्या शिवा राहणार नाही.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Who also bias
ReplyDeleteChina use mony 💪
ReplyDelete