Skip to main content

Corona Series Part 19 : कोरोना, पाळीव प्राणी आणि वन्यजीव


Corona Series Part 19
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, पाळीव प्राणी आणि वन्यजीव
पाळीव प्राणी
      आज रोजी कोरोना मुळे 14,75,976 लोक संक्रमित झाले आहे त्यातील 86,979 लोक मरण पावले आहेत तर फक्त 3,17,272 लोक बरे झाले आहेत. आज मोठ्या, छोट्या शहरात राहणार कुटुंब म्हंटलं तर कमीत कमी 3 ते 4 लोक असतता ह्या 4 व्यक्ति सोबत बहुतेक घरात एक तरी वेगवेगळ्या जातीची कुत्री मांजरी असे पाळीव प्राणी असतात. किंबहुना काही लोकच्या घरात तर माणसे कमी आणि प्राणी जास्त आहेत. मनुष्य हा भावनिक आहे पूर्वी जेव्हा मनुष्य हा कळपात राहणारा मनुष्य प्राणी म्हणून गणला जात होता तेव्हा देखील तो अश्या जनावरांचे संगोपन करत असे. भारत हा खेड्याचय देश आज देखील कितीही सुधारणा झाली तरी खेड्या मध्ये सुद्धा गाय, म्हैस, बैल, मोर असे प्राणी पाळले जातता. आज जरी लॉक डाउन असला तरीही आपल्या घरी दूध येत आहे कारण आज सपूर्ण देश बंद जरी असला तरी आमचा शेतकरी राजा हा त्याची कामे करतोय रोज शेतीचे कामे करत गाय, म्हैस यांच्या धारा काडण्याचे काम चालू ठेवावे लागते. शहरात आज घरी आपल्या मुलासारखे वाढवलेल्या ह्या प्राणिमात्रा सोबत बरेच लोक आपला वेळ खर्ची करत आहेत. परंतु आजच्या ह्या भितियुक्त वातावरणात आपण कधी विचार केला का की मानव जाती पासून ह्या जनावराना देखील करोनाचा विळखा येऊ शकतो. किवा ह्या जनावरापासून पासून देखील आपल्याला करोनाचा धोका संभवू शकतो. कारण कोरोना विषाणू हा zoonosis च्या मार्गे मानवा मध्ये आला. (Zoonosis : Transfer from animal to human) (चिकन बद्दल असलेलेल समज गैरसमज ह्या बाबतीत आज आपण बोलत नाही आहोत) होऊ शकत का असे काही…….! आजा बघूया
      आपण जर करोना विषाणू ची वंशावळ पाहिलं तर हाजरो करोना विषाणू आज अस्थित्वात आहेत. त्या मधील फक्त 7 विषाणू हे मनुष्याला बाधित करतात त्यातील 6 विषाणू आपण शोधले आहेत जो माहीत नाही तो म्हणजे हा COVID-19. वटवाघूळ, उंट, सिवेट मांजर, सरीसृप प्राणी आणि पक्षी यांमध्ये करोना विषाणू आढळतो. पक्षी इतरत्र स्थलांतर करत असतता त्यामुळे हा विषाणू सर्वत्र पसरण्याचा धोका अधिक संभवतो. परंतु हा विषाणू त्यां प्राणी किवा पक्षी ना संक्रमण करत नाही त्याची कारणे अनेक आहेत. पण हे पाळीव पाणी zoonosis होण्यासाठी वाहक ठरतता. Zoonosis हे अतिशय दुर्मिळ घटना आहे. करोना विषाणू चे Zoonosis हे 3 वेळा झाले सर्वप्रथम 2002-03 मध्ये SARS मध्ये Bat civet cat Human. MERS मध्ये BatCammelHuman. आणि आता Bat snake / Cat Human.
      नोहेंबर 2019 पासून पहिले 2 ते 3 महीने human to animal संक्रमण अशी 1 देखील केस आपल्या नजरेस पडले नाही. WHO ने देखील आपल्या संकेत स्थळावर नमुद केले होते की infection to cat and dog from human is very unlikely. परंतु 27 फेब्रुवारी 2020 रोजी हाँगकाँग मध्ये एक पाळीव कुत्र्याची एक केस सापडली. ह्या कुत्र्याला त्याच्या मालकापासून संक्रमण झाले होते कारण त्याचा मालक कोरोनाग्रस्त असताना देखील त्याचा फार जवळ संपर्कात राहत असे. त्यामुळे ह्या कुत्र्यावर उपचार करून quarantine चा कालावधी संपल्यावर घरी पाठवण्यात आले. ह्या मुळे 20 मार्च रोजी हाँगकाँग सरकारने 25 पाळीव प्राण्याची कोरोंना चाचणी घेतली त्यातील 2 प्राणी हे कोरोंनाने प्रभावित सापडले पण हे सगळे प्राणी लक्षणे दाखवत नव्हते ते (A symptomatic) होते. त्यातील एका कुत्र्याचा मृत्यू झाला. इथे देखील हा कुत्रा 17 वर्ष वृद्ध होता म्हणजेच इथे ही हा विषाणू रोगप्रतिकार शक्ति कमी असणार्‍यावर घातक ठरत होता.
      बेल्जियम मध्ये देखील एक मांजरा मध्ये काही लक्षणे आढळून आली त्यामुळे त्याची चाचणी केली असता ते मांजर पॉजिटिव सापडले. ह्या 3 ते 4 केस स्टडी झाल्यावर WHO ने सपूर्ण जगाला आपल्या सकेतस्थळा मार्फत काही सूचना केल्या. जर आपला परदेशी प्रवास झाला असेल तर आपण आपल्या पाळीव प्राण्यांच्या अति जवळ संपर्कार्त राहू नये. कोरोंना ने प्रभावित असाल तर आपण प्राण्यांना देखील विलग करा इत्यादि.  भारतता मात्र आज पर्यन्त एक ही अशी घटना झाली नाही आहे ज्यामधे मनुष्या कडून हा विषाणू पाळीव प्राणी जसे गाय, म्हैस कुत्रा आणि मांजर कडे पसरला आहे. परंतु आपणा जर कोरोंना ने ग्रस्त रुग्ण असला तर मात्र आपण ह्या प्राण्यान पासून दूर राहायला हवे. 
      अमेरिकन संस्था Center for Desies Control (CDC) ने दिलेल्या माहिती नुसार हा विषाणू एक प्राण्या पासून दुसर्‍या प्राण्या मध्ये किवा मनुष्या पासून प्राण्यान पर्यन्त पसरत नाही (very rare case). पण हा मनुष्या पासून मनुष्या कडे अति वेगाने पसरतोय. असे जरी असले तरी काही अपवादात्मक उदाहरणे देखील समोर आली आहेत प्रामुख्याने वन्यजीव प्राण्याच्या संदर्भात.
वन्यजीव प्राणी
      अमेरिके मध्ये एकट्या न्यूयॉर्क शहरात आज पर्यन्त संक्रमित व्यक्तीची संख्या 80,000 असून त्यातील 4,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. अतिशया वेगाने संक्रमित होणारा हा विषाणू तेथील 16 मार्च ला बंद केलेल्या Bronx नावाच्या प्रणी संग्रहालयात दाखल झाला आहे. प्राण्याची देखभाल करणार्‍या व्यक्ति मार्फत हा विषाणू तेथे असणार्‍या 4 वर्षाच्या नादिया नावाच्या मलायान वाघिणीला संक्रमित केल आहे. ज्या व्यक्ति मार्फत संक्रमण झाले त्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आली नाही पण त्या वाघिणीला मात्र लक्षणे माणसात जशी लक्षणे दिसतात तशी लक्षणे दिसून आली आहेत. इथे हा विषाणू human to animal mutate आणि migration करत आहे का अशी शंका निर्माण होत आहे. त्यामुळे संशोधक अचंबित झाले आहेत. आता ह्या वाघिणी मध्ये हा विषाणू कसे संक्रमण करत,  mechanisum इत्यादि चा शोध घ्यावा लागणार आहे. कारण आधी म्हंटल्या प्रमाणे मांजरच्या प्रजाती मध्ये हा करोना विषाणू जरी पूर्वींपासून आढळत आला असला तरी तो कसलीही आजारची लक्षणे दाखवत नव्हता इथे मात्र हा SARS-COV-2 विषाणू जो Human to animal migrate होतोय तो मात्र त्या वाघिणीमध्ये लक्षणे तर दाखवत आहे आणि वाघिन आजारी पडली आहे. असे mutation झाल्यास नजीकच्या काळात प्रचंड मोठा धोका संभावतोय. तिथे असणारे 7 वाघ देखील अशी लक्षणे दाखवत आहेत चाचणी चालू आहे. आता मांजरची प्रजातीच ह्या विषाणूला कशी काय बळी पडली त्याचा कारण मनुष्य आणि मांजर ह्यांच्या असणारे एकसारखे Angiotensin I Converting Enzyme (ACE 2) प्रोटीन.
      वुहाण शहरात चीनी संशोधकांनी काही संशोधन प्रकाशित केले आहे पण हे संशोधन अजूनही प्राथमिक स्वरुपात आहे. (not peere reviewd) ह्या मध्ये त्यांनी वुहाण शहरातील मांजरांच्या चाचण्या केल्या त्यामध्ये त्यांना Antibodies आढळून आल्या (Antibodies : it generates by body when infection present) म्हणजेच ही मांजरे करोनाग्रस्त आहेत परंतु त्यांचा मध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. ह्या अभयसातून असे लक्षात येते की हा विषाणू Human तो animal and Animal to Animal देखील संक्रमण करतोय. (अजूनही WHO किवा CDC ने ह्याची पुष्टी केलेली नाही)  परंतु भविष्यात जर असे मोठ्या प्रमाणात घडले तर बर्‍याच्ष्य प्रजाती ह्या पृथ्वीतलावरून नामशेष होतील. दीड वर्षा पूर्वी Canier Distemper Virus ने भारतातील गीर अभयअरण्यातील 28 सिंह दोन आठवड्यात मरण पावले. 1994 मध्ये देखील ईस्ट आफ्रिकेत 30% सिंह मेले. ही वन्यजीवांची झालेली हानी आज पर्यन्त भरून निघाली नाही. ह्या विषाणूच सर्वात मोठा धोका हा मानवाचे पूर्वज चिंपाजी जातीला आहे कारण त्यांचा 98% डीएनए आपल्या होमोसापिन मानवाशी मिळतं जुळता आहे.
      हे सगळे पाहता भारत सरकार ने Central Authority of Indian आणि Nationa Tiger Consevation Authority of India यांना वन्यजीवांचे 24 X 7 निरीक्षण करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. भारता मध्ये जगातील जवळपास 3000 i.e 80% वाघ आहेत जर कोरणाचे संक्रमण झाले तर वाघांचे अस्थित्व नाहीसे होऊ शकते. दिनांक 4 एप्रिल 2020 रोजी मध्ये प्रदेशातील Pench अभयअरण्यात 10 वर्षीय एक वाघाचा मृत्यू श्वसन यंत्रणेतील बिघाडामुळे झाला आहे. पुढे त्याची इतर वाघांची तपासणी चालू आहे. लवकरात लवकर चाचण्या पूर्ण होऊन योग्य त्या उपाययोजना झाल्या पाहिजे नाही तर आपली पुढची पिढी वाघ, सिंह आणि चिंपाजी सारख्या प्रजाती पाहू शकणार नाही.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...