Skip to main content

Corona Series Part 17 : कोरोना हातात देतोय कटोरा


Corona Series Part 17
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना हातात देतोय कटोरा

      विविध संस्था, माध्यमं, अर्थशास्त्री, संख्याशास्त्रज्ञ, देखील आर्थिक संशोधनाच काम करत असतात आणि आपला ढोबळ अंदाज व्यक्त करत असततात. कालच असेच एक अर्थशास्त्राशी संबधित तज्ञाच्या मुलाखती चे विडियो नेट वर पाहत होतो, व काही दैनिक, मासिक चाळून पहिली आणि विषयाच गांभीर्य लक्षात आला आणि म्हणून आज मुदामून सांगावस वाटल.
      National Sampling Survey (NSS), Periodic Labor Force Survey (PLFS) सारख्या संस्था काही अंदाज आणि आकडे मांडत असतात, त्यांच्या आकडेवारी नुसार येणार्‍या 1 वर्षामध्ये भारतात जवळपास 136 मिलियन (13 करोड 60 लाख) नोकर्‍यांवर संक्रांत येणार आहे. ह्या 136 मिलियन नोकर्‍या immediate Risk च्या category मध्ये येणार आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये Economic Journal मधील आर्टिकल नुसार भारतता दरवर्षी जवळपास 1 करोड नव्याने नोकर्‍या निर्माण करन गरजेचं आहे असे असताना ह्या जागतिक मंदी च्या वेळीच नेमका हा करोना दुष्काळात तेरावा महिना जसा यावा तसा आपल्या आयुष्यात येऊन बसलाय आणि कोरोना जाताना मात्र आपल्या हाती कटोरा देऊन जाईल असे वाटू लागले आहे.
      प्रामुख्याने रोजंदारी, तसिका, मजुरी, कंत्राटी (इन्फॉर्मल सेक्टर) पद्धतीच्या ज्या काही नोकर्‍या आहेत त्या जाण्याची भीती व्यक्त होत आहेत, बहुदा त्या जाणार आहेतच ह्याच नाही तर बरेचसे कार्पोरेटे क्षेत्रा मधील लोकांचे वेतन कपात येणार्‍या काळात केली जाणार आहे. जागतिक मंदीच काळ जरी असला तरी मार्केट मध्ये एकाच वेळी सगळ्या औद्योगिक क्षेत्र मध्ये एकसारखी मंदी येत नसते परंतु जर संपूर्ण अर्थव्यवस्था जर ह्या कोरोना मुळे ठप्प होणार असेल तर ह्याचे दूरगामी परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत. काय होऊ शकत त्याचा जरा संखीकी च्या माध्यमातून अंदाज घेऊया (आपण फक्त अंदाजच करू शकतो).
      तरुणाचा देश, भारत देश इथे 137 करोड लोकांमधील 50% लोकसंख्या ही 25 वर्ष आणि 65% लोकसंख्या ही 35 पेक्षा कमी आहे 2018 च्या एक डेटा नुसार जवळपास 46 ते 47 करोड लोकसंख्या नोकरी करते. त्यातीतल जास्तीतजास्त 21.7 करोड लोक हे इन्फॉर्मल सेक्टर मध्ये नोकरी करतात. हा इन्फॉर्मल सेक्टर असा आहे की मनात आल की नोकरीवरून बेदखल करता येण सहज शक्य आहे कारण कोणत्याही प्रकारचा बॉन्ड, करार नसतो. ह्या 136 मिलियन (13.60 करोड) नोकर्‍या आहेत त्या मुख्यतः Non-Agricultural सेक्टर मध्ये आहेत त्याचे वर्गीकरण 3 प्रकारात करता येईल 1] 28 लाख Manufacturing Sector, 2] 49 लाख Non- Manufacturing Sector, 3] 59 लाख service Sector मध्ये नोकरी विभागलेल्या आहेत.
      आता आपण जे प्रमुख सेक्टर आहेत जे अर्थव्यवस्थे उभारी देण्यात हातभार लावतता त्यांची अवस्था पाहूया
Construction Sector: 
      बांधकाम विभागा हा प्रामुख्याने अर्थव्यवस्थेच्या जीडीपी वर अवलंबून असतो, जर जीडीपी चा आलेख वाढता असेल तर हे क्षेत्र देखील भरारी घेत नवीन नवीन प्रोजेक्टस चालू होतात नवीन घर ऑफिस दुकान ची खरेदी विक्री होते. त्यामुळे ह्या क्षेत्रात skilled आणि non skilled असे दोन्हीही कामगार लागत असतात पण सध्यस्थिति पाहता नवीन सोडाच आहे हे प्रोजेक्टस वेळेत पूर्ण होण अवघड आहेत त्यामुळे इथे प्रामुख्याने non skilled कामगारांची ची मागणी कमी होईल.

Aviation:
      21 दिवस लॉक डाउन तर आहेच पण त्या आधी पासूनच जगभरात कुठे ना कुठे तरी कोरनो ची साथी मुळे विमान सेवा पूर्णता बंद होती त्याहून ही आधीपासून भारत सरकार कडे विमान वाहतूक करणारे व्यावसायिक मदतीची अपेक्षा करत आहेत. कारण विमणा सेवे मध्ये जास्ती गुंतवणूक करावी लागतेच फक्त पगार च नाही तर विमानाचे पार्किंग, दुरूस्ती, इत्यादि प्रचंड खर्चीक बाबी आहेत. लॉक डाउन झाल्यापासूंच काही कंपन्यांनी 30% वेतन कपात जाहीर देखील केली आहे. तसेच सपूर्ण जगत tourism देखील बंद आहे त्यामुळे सगळ्यात मोठा फटका हा Aviation industries ना बसत आहे. आणि जवळपास 6 लाख नोकर्‍या ह्या high risk मध्ये आहेत.

Tourism:
      इटली, फ्रांस, अमेरिका, स्पेन, चीन सारख्या देशात जगामधून सर्वात जास्ती पर्यटक येतता आणि तुम्ही पाहिलत तर पर्यटकांच्या पसंदीदार देशातच ह्या करोनाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. जागतिक तुलनेने जरी भारत पर्यटकाच्या पसंती नुसार अव्वल नसला तरी भारतीय लोक भारतातच पर्यटनाचा आनंद घेत असतातत. तेच काही विदेश पर्यटक परकीय मुद्रा घेऊन येत असतता. परंतु ह्या कोरोनाच्या प्रभावामुळे घरातून बाहेर पडणच मुश्किल झाल्यामुळे पर्यटन क्षेत्र मोडकळीस येणार आहे. पर्यटन मुळे त्या त्या शहरातील बाजार पेठ, वाहतूक, पार्किंग करणार्‍या कर्मचारा पासून, हॉटेल, लौजिंग, अश्या सर्वच क्षेतत्रावर नकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. एक सर्वे नुसार जवळपास 2 करोड लोकांच्या उत्पन्नावर गदा येणार आहे. होणारे नुकसान भरून काडण्यासाठी हिवाळी सीझण ची वाट पहावी लागेल.

Automobile:
      मुळातच वाढत्या electrification मुळे automobile क्षेत्र त्रस्त होतेच मागील 9 महिन्याच्या जीडीपी मध्ये automobile हे सतत डाउन मार्केट दाखवत आहे. त्याच मुळे इथे ही मशीन वर काम करणारे व संगणक तंत्रज्ञ, मेस्त्री असे skilled कामगार सोडले तर त्यांचा हाताखाली काम करणारे कामगार आपली नोकरी वाचवू शकणार नाहीत असे जवळपास 1 ते 2 लाख कामगार रस्त्यावर येतील. कोल्हापूर म्हणजे foundry चे माहेर इथे ही परिस्थिति काही वेगळी नाही.


Retailers and FMCG:
      बिग बाजार, डी मार्ट, विविध सुपर मार्केट अश्या ठिकाणी 3 करोड 70 लाख लोक सेल्समन, कॅशियर, काऊंटर बॉय, सफाई कामगार अश्या विविध ठिकाणी काम करतात. ज्या गतीने असे सुपर मार्केट वाढले त्याच गतीने कमी होत चालले आहेत. जर 21 दिवस, महिना, 2 महीने असे मार्केट बंद झाले तर सेल्समन, कॅशियर, सारख्याचे वेतन देना शक्य होणार नाही आपसूक लोक कमी करावे लागतील. FMCG मार्केट चेन डळमळीत झाली आहे.

Textile and Leather:
      2 करोड लोक हे प्रत्यक्ष रित्या ह्या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. रोटी, कपडा, आणि मकान ह्या प्रमुख गरजा जारी असल्या तरी खिशात पैसे नसतील तर नवीन कपडे खरेदी शक्य होत नाही गरजे पुरते कपडे असतातच. जेव्हा अश्या प्रकारचा आर्थिक महामंदी चे प्रकार आढळून आला आहे तेव्हा उपभोग घ्यायच्या वस्तु वर आधी गंडांन्तर येत असतं त्यामुळे कापड मार्केट ल देखील मोठा फटका बसल्याने नोकर्‍यांची वाताहत होईल. तसेच चर्म उद्योग हा संपूर्ण आयात निर्यात वर अवलंबून आहे बरेच से consignment ह्या लॉक डाउन मुळे अडकून पडल्या आहेत त्यामुळे कॅपिटल गुंतवणूक अडकून पडली आहे.

Service:
      भारतीय अर्थव्यवस्थे मध्ये शेती नंतर सर्वात वाट हा सर्विस उद्योगाचा आहे जवळ जवळ 31% भारतीय नागरिक ह्या उद्योगाशी आधारित आहे. भारतीय अर्थ व्यवस्था वर काडण्यात खूप मोठा हातभार लावला आहे. ह्याच सर्विस उद्योगामुळे परकीय चलन देखील भारतता येत. परंतु कोरनो च विळखा ह्या उद्योगाला ही बसला आहे आणि म्हणून टेल एण्डेर्स ना रुक रुक लागून राहिली आहे. पुढे ह्या सेक्टर चा काय होईल हे सांगता येत नाही इतकी दयनीन अवस्था झाली आहे.

Entertainment, Add, Film Industry
      अचानक आज 21 दिवस आपण घरी बसलोय तेव्हा नव्या पिढीला करमणुकीचा एकच आधार आहे तो म्हणजे  चित्रपट, वेब सिरीज, डेलि टीव्ही शोज, इत्यादि पण पडद्यावर दिसणार्‍या नट, नाती च्या मागे मेकअप, कॅमेरा, लाइट, सेट वरील कर्मचारी अशी शेकडो लोकांची टीम कार्य करत असते आता शूटिंग थाबले तर पडद्यावरील लोकांना त्याचा फारसा फरक पडणार नाही मात्र पडद्या मागील लोकचे मात्र हाल होणार हे नक्की सपूर्ण उद्योग धंदे बंद असतील तर जाहिरात तरी कोण करणार.
      हे सगळे उद्योगधंदे आता सरकारकडे मदतीची आस लावून बसले आहेत, सरकार ने अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाथी मोठी आर्थिक मदत द्यावी टॅक्स मध्ये सूट मिळावी एक गोष्ट समजून घेण गरजेचं आहे ते म्हणजे कोणत्याही सरकारकडे स्वतचे असे पैसे नसतात कर आणि कर्जाच्या मध्यंतून जो काही पैसा उभा राहतो त्याचे विभाजन करून सरकार अर्थव्यवस्थे मध्ये पैसे घालते हे करत असतातना Infrastructure, Education, Health care इत्यादि महत्वाच्या ठिकाणी देण्यात येणार निधि कमी करून ज्या सेक्टर मध्ये नोकरी जात आहेत तिथे देन गरजेचं होईल आणि त्यामुळे देशाची होणारी प्रगति तर थांबेलच पण आपण 10 वर्ष मागे जाऊ. जर इतिहास पहिला तर अश्या महामारी आल्या आणि गेल्या पण अर्थव्यवस्था तेव्हा ही होती आताही आहे पुढे ही राहील ते पाहायल आपण मात्र जीवंत राहणं महत्वाचा आहे. कारण डबघाईला आलेली अर्थव्यवस्था संजीवनी देऊन पुन्हा उभी करता येईल पण मृत्यू झालेला माणसाला मात्र जिवंत करण्याची संजीवनी आज तरी आपल्याकडे नाही.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...