Skip to main content

Corona Series Part 16 : कोरोना विश्वगुरू भारत आणि महासत्ता अमेरिका


Corona Series Part 16
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण आता पर्यन्त बरीच शास्त्रीय माहिती घेत आलो आहोत त्याच बरोबर आपण ज्या भारत भूमी मध्ये राहतो त्याच भारतभूमी मधील संस्कारवर चर्चा करत शास्त्रीय माहिती देखील अद्यायावत करू.

कोरोना विश्वगुरू भारत आणि महासत्ता अमेरिका

      काल अमेरीकाचे राष्ट्रपती डोनाल्ड टृंप यांनी भारताचा पंतप्रधानाना एक विनंती केली. अमेरिकेतिल जनतेला ह्या महामारीतून बाहेर काढण्यासाठी भारताकडे असणार्‍या Hydroxychloroquine ह्या औषधाचा पुरवठा करावा खूप वेळ चर्चा झाली असणारच. आणि आपल्या पंतप्रधानानि tweet करून सागितल We had good discussion and agreed to deploy the full strength of India –US partnership to fight against COVID-19”  सपूर्ण जग ज्या विषाणू च्या आजाराने पीडित आहे त्या पासून बचावाचे एक साधन म्हणून हे औषध वापरले जाते. हे औषध खरच किती महत्वाचे बनले आहे. अगदी 21 मार्च पर्यन्त हे औषध कोण तयार करत, कोणी ह्याचा शोध लावला, कशासाठी वापरला जात, ह्याच तसू भर देखील कल्पना नसणारे लोक देखील आज ह्या औषधा वर चर्चा करू लागले. हे म्हणजे अस झाला की Microscope खाली अळी दिसली तर जगा समोर अजगर दिसल्या सारखा आव आणायचा. असो त्या बातम्या वरच काही लोकांचा पोट भरत. पण एखाद्या प्रसिध्या होणार्‍या बातमी मधील सखोल ज्ञान आपल्याला अवगत व्हावे असे वाटते.
      हे औषध का, कुणासाठी, कधी, किती प्रमाणात, वापरावे ईत्यादी गोष्टी हायपूर्वी ही आपण Corona Series Part 12 मध्येजाणून घेतलं आहे. तरीही हे औषध अजूनही चर्चेत आहे म्हणून आपण आता अद्यायावत माहिती घेऊया. पण त्या पूर्वी ह्या करोनाच्या निमित्याने जाणवलेली एक दुसरी बाजू आप्ल्यसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय.
      एक ईग्रजी वर्तमान पत्रात (The Economic Times) बातमी पहिली Trump Seek Modi helps to releases Hydroxychloquine ordered by US to treat COVID-19 Patients ही बातमी वाचल्या नंतर अनेक प्रश्न पडले, ज्या देशाकडे वर्षाला एक तरी नोबेल परितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ आहे, किती तरी औषधाचे स्वामित्व हक्क (patents) असणार्‍या औषधनिर्माण करणार्‍या कंपन्या आहेत, विज्ञानाने ह्या ब्रमांडा मधील लपलेली रहस्य शोधण्यात यश प्राप्त करणारे. जो देश सपूर्ण जगात आर्थिक महासत्ता म्हणून गाजवतोय मागील 150 वर्ष त्यांचा हातात आर्थिक सूत्र आहेत. त्या विकसित महासत्तेला आज भारतासारखा प्रगतशील देशाकडे विनंती करावी लागली ती विनंती मान्य करून भारत आमेरिकेला मदतीचा हात पुढे करतोय. बर्‍याच वेळेला अस वाटून जायच भारत देखील एक दिवस महासत्ता बनेल पण आज वाटत की महासत्ता पुढे कधी तरी बनेल किवा नाही पण आज मात्र भारत हा एक विश्वगुरू म्हणून संपूर्ण जागा समोर उभा आहे.
      इथे आपल्याला दोन विचारांना मधला फरक नमूद करावासा वाटतो महासत्ता आणि विश्वगुरू.
ज्यावेळेस एखादा देश महासत्ता आहे असं म्हणतो म्हणजे त्याची सत्ता बाकीच्या देशांवर आहे (e.g. Belt and Road etc) असं त्याचं म्हणणं असतं. इतर देशांना तो त्याचे मागे उभे असलेल पाहतो इतर देश त्यांच्या बरोबरीला उभे राहणं त्यांना पसंत नसत. दूसरा विचार म्हणजे विश्वगुरू जो इतर देशांना दिशा दाखवणारा, आणि मदत करणारा त्यांच्या सुख दुखत सहभागी होऊन आपल्या बरोबरीने दुसर्‍या देशांना घेऊन जाणारा असा आहे. 
      भारत हा विश्वगुरू पदी विराजमान होवो अशी संकल्पना असेल तर त्याचा अर्थ दुसऱ्या देशांवर स्वामित्व गाजवणा-या असे नाही तर बाकीच्या देशांनाही पुढे घेऊन जाण्याचे सामर्थ्य या देशांमध्ये निर्माण करणे.
      आज च पहा स्वःतवर ह्या करोना सारखे संकट असतातना जो देश आपल्या 137 कोटी लोकांचे सरक्षण करत आहेच तरीही या भीषण परिस्थितीमध्ये भारताच्या पंतप्रधानांनी South Asian Association for Regional Cooperation (SAARC) देशांच्या प्रमुखांची वेब कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आणि 10 करोड रुपये ची मदत जाहीर केली हे त्या विश्वगुरू संकल्पनेचे द्योतक मानावे लागेल. 

चीन आणि संपूर्ण जगभरामध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना भारतात आणण्याचे धाडस दाखवले आपण जानता ह्या विषणूचा प्रभाव पाहून अनेक देशांनी आपल्या सीमा बंद करून आपल्या नागरिकणा बाहेरच्या देशातून स्व भूमीत न येण्याचा सल्ला दिला.
इराण सरकार ने भारतीय मूल नागरिकाची करोनाची तपासणी करण्यास असमर्था दर्शवली तेव्हा भारत सरकार ने सपूर्ण लॅब आणि कर्मचारी डॉक्टर पाठवले. शेजारी असणार्‍या मित्र देशांमध्ये (मालदिव) भारतामधील expert डॉक्टर ची एक तुकडी विविध औषधासहित पाठवली. यूरोपियन देशाला देखील एयर इंडिया च्या माध्यमातून मदत देण्यात आली आणि आज अमेरिका सारख्या बलाढय देशाला देखील आपण मदतीचा हात देतोय. ISRO सारखे संघटन एकाच वेळो विविध देशाचे 104 उपग्रह अवकशांत घेऊन जाताना जणू काही एकात्मतेचा मंत्रच जगाला देत आहे. शेजारील देशांमध्ये रोड प्रोजेक्ट्स (कलादान प्रकल्प म्यणामार, सित्त्व्वे पोर्ट, श्रीलंका बांग्लादेश सारख्या छोट्या देशा मध्ये धरण बांधणे, वीज निर्मिती किवा एअरपोर्ट बांधणी असो चाहबार पोर्ट, मालदिव, इंडोनेशिया, नेपाळ, भुतान सारख्या अनेक देशांना अर्थ पुरवठा असो) असे विविध प्रकल्पांना मार्फत या देशांना आपल्या बरोबर पुढे घेऊन जाण्याचा काम करत करत आहे. आज अमेरिका सारख्या मोठ्या देशात किती तरी भारतीय विद्वान त्या देशाच्या प्रगतिसाठी झटत आहेत.
      इतिहास कधी पुसला जात नाही आज ज्या देशांना आपल्या मदतीची अपेक्षा आहे तेथील राज्यकर्त्यांनी मात्र व्यक्तीगत फायद्यासाठी कधी ना कधी भारताचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला आहे. मग ह्या देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असो किवा सीमा वाद असोत, 1999 च्या कारगिल युद्धात जेव्हा पाकिस्तानी सैन्य हे टाईगर हिल सारख्या उंच ठिकाणी होते आणि भारतीय सेना ही डोंगराच्या पायथावर होती. तेव्हा ह्या दुश्मनचा सामना करण्यात अनेक अडचणी आल्या तत्कालीन वाजपेयी सरकारने ह्याच महासत्ता म्हणून मिरवणार्‍या अमेरिकेला विनती केली त्यांचा कडे असणार्‍या आधुनिक तंत्रज्ञाचा (GPS) वापर करूण आम्हाला पाकिस्तानी सैन्यचे स्थान् कळवले तेव्हा ह्याच अमेरिकेने विरोध करून आपली मदत तर केली नाहीच पण आपण अडचणीत कसे येऊ हे पहिले होते. मग ती पोखरण ची टेस्ट असो व न्यूक्लियर डील, ईराणवर अमेरिकेचे असणारे प्रथिबंध लक्षांत घेऊन कच्चे तेल कमी किमतीत मिळत असताना आपल्याला ईराण मधून तेल न घेण्यास सांगण्यात आल. अशी किती तरी उदाहरण असतील. चीन सारख्या देशाने तर डोकलम असो किवा कम्यूनिस्ट विचारधर भारतता रोवून नक्षली विचारधारा भारतात रुजवणे असो पण प्रतिकूल आणि अनुकूल दोन्ही परिस्थिति मध्ये मात्र आपण वसुधैव कुटुंबकम ही आपली संस्कृती सोडली नाही. आणि म्हणूनच भारत हा ह्या जगाचा मार्ग दर्शक गुरु म्हणून उभा राहण्यास योग्य आहे. आज खरच मला अभिमान वाटतो की मी भारताचा नागरिक आहे.
      आज अमेरिकेची ही विनंती कडे एक संधि म्हणून पहायची गरज आहे जिथ भारताल जागतिक पातळीवर स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवताना, विश्वागुरुची संकल्पना जगाला सांगता येईल, भारत हा एक शांति प्रिय देश आध्यात्मिक ताकत असणारा सपूर्ण मनुष्य जातीचा हित चिंतणारा देश आहे हे सिद्ध करता येईलच आणि करोना मुळे धडकी भरलेल्या अर्थ व्यवस्थेला सुधा एक हातभार लागेल. ह्या विश्वगुरू साठी समर्पित………

विश्व में गूँजे हमारी भारती ….
विश्व का हर देश जब भी
दिग्भ्रमित हो लड़खड़ाया ।
लक्ष्य की पहचान करने
इस धरा के पास आया ।
भूमि यह हर दलित को पुचकारती
हर पतित को उद्धारती
धन्य देश महान
धन्य हिंदुस्थान
विश्व में गूँजे हमारी भारती
जन जन उतारे आरती
      दुसरी बाजू आप्ल्यसमोर मांडून झाल्यावर  आता आपण आजच्या मुद्यावर येऊया अमेरिकेत ही ह्या Hydroxychloroquine औषधाची निर्मिती केली जाते पण आज रोजी 29 मिलियन डोस उपलब्ध आहेत परंतु ज्या गतीने हे विषाणू पसरत आहेत त्याचा विचार केला तर हे पुरेसे नाही. ह्या औषधाचा निर्माणचा बाबतीत भारत हा एक अवव्ल नंबर चा देश आहे त्याच कारण अस की हे औषध एक तर फार जुने आहे आणि ते मलेरिया (हिवताप) वर वापरले जाते. अमेरिकेच्या तुलनेत भारत आणि आफ्रिका सारख्या देशात मलेरिया चे रुग्ण अधिक आढळतात. वाचून धक्का बसेल पण हाय मलेरिया वर आज देखील कोणताही vaccine तयार झालेल नाही. मागील 2 वर्षा पासून clinical trials चालू झाल्या आहेत. भारता मध्ये असणार्‍या औषद्निर्माण करणारय कंपनी (IPCA, Cipla, Zydus, Wallace, LUPIN) ह्या महिन्याला 20 करोड गोळ्या बनवतात आणि जास्तीत जास्त ह्याचा दुप्पट बनवू शकतात. त्यामुळे वेळेची बचत होईल.  21 मार्च पासून ह्या औषधाची निर्यात बंद आहे त्या मुळे ह्याचे साठा आपलीए भरपूर प्रमानात आहे म्हणजेचे भारतीय जनतेला जरी ह्या औषधाची गरज लागली तरी आपण ती गरज भागवू शकतो. भारत मध्ये ह्या औषधाची निर्माण करण्याची किमत देखील कमी आहे.
      कोणत्याही औषधामध्ये दोन घटक असतात एक म्हणजे मूळ औषध i.e Active Pharmaceutical Ingredient (API) आणि इतर म्हणजे color, binder, test buds, stabilizer इत्यादि तर त्यातील जो API तो मात्र आपल्याला चीन कडून आयात करावा लागतो. समझा अतिशय प्रतिकूल परिस्थिति मध्ये जर हा API आपल्याला लागणार असेल तर चीन मधून कसे आणायचे ह्याचा एक मार्ग आपल्या भारतीय औषध निर्माण कंपन्यांनी सरकार ल सुचवला आहे तो म्हणजे भारतीय सेना मधील विमानाचा वापर करूण सर्व गोष्टीची खबरदारी घेऊन हा API आपल्याला चीन मधून इकडे आनता येईल. त्या साथी आवशक्य हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. जार चीन मध्ये हा API तयार केला जात असेल तर मग तिकडेच का ह्या औषधाची निर्मिती केली जात नाही आजच्या घडी ल औषधाची निर्मिती करन हे चीन ल अवघड नाही परंतु जागतिक पातळीवर चीन ची असलेली प्रतिमा पाहता मिळणार औषध कितीपत गुणकारी ठरेल ह्यात शंका आहे. आणि भारतावर असणारा सार्थ विश्वास हे त्याच मूळ कारण आहे.
      हा लेख वाचल्यावर मित्रहो आपण विचार करून प्रतिक्रिया कळवाव्या की आज भारताने कोणती भूमिका घेणं तुम्हाला योग्य वाटत. 
      भविष्यात भारताने विश्वगुरु च्या रूपात नावलौकिक मिळवावा की आधुनिक तंत्रज्ञानने विकसित अश्या वायरस युक्त (bioweapon), विविध शस्त्राने युक्त, भांडवलशाही, सप्लाय चैन मधील एक आर्थिक माहसत्ता बनतणा संस्कारहीन भारत असावा.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...