Skip to main content

Corona Series Part 13 : कोरोना आणि रोगप्रतिकार शक्ति


Corona Series Part 13

      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

 गेले 2 दिवस एप्रिल फूल आणि आणि लोकांमधील संभ्रम अवस्था लक्षात घेऊन social मीडिया वर कोरोना संदर्भात कोणतीही पोस्ट करण्याचं टाळल, आज पासून पुन्हा आपण पुन्हा जास्तीत जास्त शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयोग करू.


 कोरोना आणि रोगप्रतिकार शक्ति

      एक दोन दिवसापूर्वी आपण काही औषधांवर चर्चा केली. औषधाबरोबर व्यक्तिचा अंगी असलेल्या नैसर्गिक ताकतीचा उल्लेख केला (Will Power) म्हणजेच, उमेद ह्या जगण्याचा उमेदीमुळे आपल्या शरीरात विविध रसारयनाचे स्त्राव होत असतात आणि आपली रोगप्रतिकारत्क शक्ति सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने काम करायल लागते. आज आपण रोगप्रतीकरक शक्ति बाबतीती थोडक्यात जाणून घेऊ. ह्या कोरोन सारखा विषाणू बरोबर दोन हात करताना काय होऊ शकत हे पाहू.

      त्यासाठी सर्वप्रथम आपली रोगप्रतीकरक शक्ति कशी काम करते ते नीट समजून घेऊ. आपले शरीरता रक्ता मध्ये लाल आणि पांढर्‍या पेशी असतात ह्या पांढर्‍या पेशीना आपणा सैनिक पेशी देखील म्हणतो. जस सीमेवरील जवान आपल्या देशाच्या सिमेच संरक्षण करत असतो त्यच प्रमाणे ह्या सैनिक पेशी कार्यरत असतात. एव्हडा चोख बंदोबस्त असताना सुद्धा काही दहशदवादी हल्ले होतात त्याच प्रमाणे आपल्या शरीरात देखील करोना सारखे दहशदवादी विषाणू (Antigen) प्रवेश करतात. जेव्हा ह्या विषाणूची चाहूल आपल्या शरीराला लागते तेव्हा आपल्या सैनिक पेशी (Antigen Presenting cells) ह्या करोना सारख्या दहशदवादी विषाणूला पकडतता आणि त्याचे ब्रेकडाउन करायला सुरवात करतता आणि त्या नंतर आपल्या शरीरातील कमांडर (B-Lymphocyte cell) यांचा समोर ह्या Antigen ला प्रस्तुत करतता हा कमांडर पुढे त्यांचा आभास करतो आणि त्यांना decode करायला सुरवात करून त्याच्या विरोधात शस्त्रे (anti-bodies) तयार करण्यास सुरवात करतो. ह्या anti-bodies पुढे जाऊन Antigen वर हल्ला चढवतो आणि त्यांना मारून टाकतात. अश्या प्रकारे शरीरात बाहेरून आलेले नको असलेलेल दहशदवादी विषाणूचा खात्मा करतता आणि आपल्या शरीराला लागण होण्यापासून वाचवतात. पण बर्‍याच वेळेला हा विषाणू अधिक ताकतवर आणि विकसित असतो त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ति (सैनिक पेशी) त्याचा हल्ला परतवून लावू शकत नाहीत आणि आपण आजारी पडतो तेव्हा आपण बाहेरून औषधरूपी मदत घेतो अश्याप्रकारे आपला शरीर हे कोणत्याही विषाणू, बॅक्टीरिया पासून आपल संरक्षण करन्याचा प्रयत्न करत असतं.

      करोना ह्या विषाणू बरोबर असणार्‍या युद्धा मध्ये आपल शरीर का आजारी पडत आहे समजून घेऊया मुळात करोना हा काय नवीन विषाणू जरी नसला तरी तो एक नव्याने विकसित (Modified) झालेला विषाणू आहे. त्यामुळे जेव्हा हा आपल्या शरीरात असतो तेव्हा तो कसं काम करतोय हे अजूनही आपल्या समजला नाही. पण करोना कुटुंबातील इतर जसे की SARRS, MERS विषाणू बद्दल आपल्याकडे माहिती आहे त्याचा आधारावर आपण त्याचशी दोन हात करण्याचं प्रयत्न करत आहोत. काल सांगितल्या प्रमाणे (Corona Series Part 3 & 12) काही औषधे आपण वापरत आहोत आणि आपला शरीर करोना मुक्त करत आहोत.

पुन्हा असा प्रश्न मनाला हुरहूर लावतो की समजा एकदा लागण होऊन बरे झाल्यावर  पुन्हा आपल्याला ह्या करोनाची लागण होऊ शकती का!

एकदा एखाद्या विषाणू ची लागणा झाली की आपला शरीर त्याच्या विरोधात anti-bodies तयार करत आणि पुन्हा जरी लागण झाली तरी त्या विषाणू ची ओळख पटवून आपल्या मेंदूला त्या पद्धतीने सूचना देत.

 जपान मध्ये करोनाच्या संदर्भात एक महिलेमध्ये पुन्हा करोनाची लागण झाल्याची केस समोर आली. बरेचसे शास्त्रज्ञ ह्या केस वर अभ्यास करत आहेत त्यातून अस लक्षात आल की SARS सारखा ह्या SARS-COV-2 (करोना) मध्ये Relaps होतोय हा विषाणू Reinfection करत नाही. MERS मात्र  Reinfection करतो म्हणजे नेमका काय होत पाहूया.

Relaps = Infection present inside the body

Reinfection = Infection from outside of body as like 1st time done

म्हणजे कोरोना सारखा विषाणू आपल्या शरीराला पुन्हा पुन्हा infected करू शकतो का?  करू शकतो काही  विशिष्ट कंडिशन मधेच तर त्या कोणत्या कंडिशन आहेत ते बघूया.

 1] In case of Relaps:
      जेव्हा एखाद्या विषाणू ची लागण होते तेव्हा कितपत लागण झाली आहे त्याला आपण म्हणतो virus lode. हा वायरस लोड चे प्रमाण लक्षात घेऊन डॉक्टर आपणास औषधाचा डोस देतात. पण काही वेळेस दिलेले औषध हे पर्याप्त मात्र मध्ये नसतं. (त्याची बरीच कारणे आहेत e.g ADME properties etc) तेव्हा हा विषाणू शरीरात सुप्त पद्धतींनी शिल्ल्क राहू शकतो. अश्या वेळी रूग्णाला बरे वाटत असते कारण विषाणू ची संख्या लागण करून त्याची लक्षणे दाखवण्या इतपत नसते त्याला आपण Dormant stage म्हणतो (विषाणू हा दबा धरून बसतो). जेव्हा त्या विषाणूला योग्य वातावरण मिळते तेव्हा तो पुन्हा reactivate होतो.  ह्या सगळ्याला आपण relaps म्हणतो. कोरोनच exact mechanism माहीत नसल्यामुळे ह्या आजारात relaps सारख्या काही केस आढळून आल्या. जरी आपण बरे झाला तरी किवा isolation, quarantine period संपला तरी तितकीच काळजी घेणं आवशक आहे.

 2] Mutation : 
      i.e Sudden Change जस की HIV, Influanza मध्ये विषाणू मध्ये सतत बादलाव होत असतो आणि त्यामुळे दिलेली औषधे आणि आपली रोगप्रतीकरक शक्ति यांना समजून येत नाही कश्या पद्धतीने सामना करावा. (अभ्यास करावा इतिहासचा आणि पेपर आला भूगोलाचा). काही रुग्ण मध्ये अश्या पद्धतीचा mutation होऊ शकत.

3 ] Immunity Compromise :
      काही लोकांना वेग वेगळे आजार पूर्वी पासून असतात त्या वेळी काही आजारण मध्ये Immune Suppression Drugs (ISD) चा वापर केला गेला असतो किवा चालू असतो. काही वेळेस आपल्या सैनिक पेशी ची दिशाभूल केली जातो आणि त्या मुळे ह्या पेशी आपल्याच पेशी मारून टाकतात आणि त्यामुळे आपली रोगप्रतीकारक शक्ति काही औषधे देऊन कमी करावी लागते. सर्वसाधारणपणे वार्धक्य, मधुमेह मध्ये किवा जुनाट आजार जसे की यकृत, पोटविकार, UTI infection, अजून एक मोठा कारण म्हणजे Malnutrition इत्यादि मध्ये आपली रोगप्रतीकरक शक्ति Compromise झालेली असते. अश्या वेळी जर कोरोना सारख्या विषाणू ची लागण झाली तर मात्र आपण ह्या विषणूचा सामना करू शकत नाही. आणि आपल्याला कोरोंनाची लागण होते.

 4] sampling Error :
      सुरवातील जेव्हा आपण तपासणी करतो तेव्हा काही वेळेला ह्या विषाणूची संख्या एक ठराविक प्रमाणापेक्षा कमी असते किवा अन्य काही कारणाने दिसून येत नाही आणि आपली टेस्ट negative येते पण कालांतराने पुन्हा टेस्ट केली असतं टेस्ट मात्र positive दिसते. आणि त्याचमुळे करोना सारख्या
विषाणू साठी आपण 3 ते 4 वेळा टेस्ट करतो.
      तर मित्रानो आपण आपली रोगप्रतिकार शक्ति काय 4, 8 दिवसात वाढवू नाही शकत त्यामुळे कोरोंना पासून बचाव करण्यासाठी आपण त्याचा मार्गाला न जाण हेच उत्तम त्या साठी तुम्ही लॉक डाउन च्या काळात जास्तीत जास्त घरी बसा आणि योग्य पद्धतीचा वापर करा (हात धुणे, मास्क  वापरणे, sanitizer वापरणे आदी). उद्या आपण Plasma Transmission Therapy बद्दल माहिती घेऊ.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...