Corona Series Part
11
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न
करत आहे.
अफवा आणि कोरोना
दूरदर्शन वर 80 च्या दशकात रामायण नावाची मालिका चालू होती, आज ह्या लॉक डाउन मुळे सध्याच्या
मालिकांचे प्रसारण थांबले आहे म्हणून रामायण पुन्हा प्रसरित होत आहे. अगदी
माननीय पंतप्रधाननी सुद्धा जनतेला आवाहन करताना सांगितल लक्ष्मणरेषा ओलांडू
नका. त्याच रामायनातील एक घटना आठवली ती म्हणजे रामाने रावणाचा वध केल्यानंतर
रामराज्य चालू असत आणि रामाच्या राज्यातील एक धोभी हा सीतेच्या चारित्यावर शंका
घेतो आणि ही अफवा राजा म्हणजेच प्रभू श्री राम पर्यन्त पोहोचते आणि पुढे सीता
मातेला सुधा अग्निपरीक्षा द्यावी लागते. आता तुम्ही म्हणाला हे काय नवीन सांगात
आहात माहिती आहे आम्हाला सगळं रामायण, महाभारत, एक लक्षात घ्या ह्या पुराण कथे मधून जो बोध घ्यायला हवा तो आजही आपण घेतला
नाही. एका अफवा मुळेच देव रूपी राम आणि सीते च्या संसाराची वाताहत झाली. त्या धोभी
प्रमाणेच आज आपण अनुकरण करत आहोत. आज फुकटच्या (नगण्य किमतीत) मिळणार्या नेट चा
सोशल मीडिया च्या रूपाने ह्या धोभी चा अनादर्श आपणा अनुकरत आहोत. आणि सर्वसामान्या
जनतेला कोरोंनासारखी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.
कोरोनाचा बाबतीतिल कोणतीही पोस्ट
आली की त्या message मधील सत्यता पडताळायच्या आत आपण ती पुढे पाठवतो मला वाटत इथेच आपण चूक करतो.
कोरोना बाबतीतिल काही अफवा ह्या माझ्या ही whats up वर आल्या आहेत म्हणून त्या अफवाचा माझ्या सत्सत
विवेक बुद्धीचा वापर करून शास्त्रीय गोष्ठींच्या आधारावर निराकरणा करन्याचा
प्रयत्न करतोय.
कोरोना हा विषाणू हवे मार्फत
आपल्याला संसर्ग करू शकतो. असे काही message पसरत आहेत खरच हवेतून संसर्ग होतो
का की होत नाही शास्त्रज्ञ काय म्हणतात ते समजून घेऊ.
मुळात कोरोना विषणूचा (प्रादुरर्भाव
हा) mode of Transmission is due to droplet of infected person असा आहे. समजा एक व्यक्ति जेव्हा शिंकतो, खोखतो तेव्हा साधारणतः 3000 आणि 10,000 ड्रोप्लेट्स तयार होतता की ज्या मध्ये कोरोना सारख्या
आजारचे विषाणू असतात आता हे ड्रोप्लेट्स 2 ते 3 मिटर किवा जोराची हवा आणि त्याची दिशा नुसार
जास्तीत जास्त 50 ते 60 मिटर अंतर हवेमार्फत
प्रवास करू शकतात. (Travel of droplets depends upon the formation of aerosol)
जेव्हा हे ड्रोप्लेट्स बनतता ते
वजनाने जड असतात कारण त्यात पाण्याचे (mucus) ड्रोप्लेट्स असतात पृथ्वी वर असणार्या गुरुत्वाकर्षण शक्ति मुळे हे
ड्रोप्लेट्स खाली यायला लागतात तेव्हा ते कधी जमिनीवर, एखाद्या टेबलावर, रस्त्यावर, एखाद्या धातू वर किवा वस्तुवर पडू शकतात आता त्याच वेळी एखादा निरोगी व्यक्ति
अश्या वस्तूं च्या संपर्कात आला आणि त्याने त्या वस्तूंना स्पर्श करून आपल्या नाकाला, चेहेर्याला स्पर्श केला की मग ते
इन्फेकशन एक व्यक्ति कडून दुसर्या व्यक्ति कडे पसरते. ह्यातुण सामाजिक अंतर (Social Distancing) का महत्वच आहे
समजून येईल.
मग आपल्याला असे म्हणता येईल का की हवे मधून
कोरोंना पसरतोय तर त्याच उत्तर नाही असे आहे जर अस असतं तर सपूर्ण
हॉस्पिटल मधील कर्मचारी डॉक्टर सर्वांना ह्या आजाराची लागण झाली असती. ज्या ठिकाणी
लोकांची परदेशात जायची travel history नाही किवा एकही कोरणग्रस्त व्यक्ति किवा त्याचा संपर्कात असणार्या लोकांचा
संपर्क आला नाही अश्या कोणत्याही लोकांना ह्या कोरोंनाची लागण होणार नाही म्हणजेचे
हवा हे माध्यम म्हणून काम करत नाही.
शोध करत असतान सुधा कधी टप्पे
आसतता त्यातील अगदी प्राथमिक स्वरुपातील शोध निबंधामध्ये काही संशोधक म्हणतात की
हवा हे एक मध्य होऊ शकता पण कधी in significant condition म्हणजजेच जर कोरणग्रस्त व्यक्ति आपल्या सापर्कात असेल आणि Social Distancing आपण पाळत नसू तरच कोरोंनाची
लागण होते. (Princeton University, University
of California, National Institute of Health USA i.e. NIH) NO CONTACT NO INFECTION
विषाणू कुठे किती वेळ राहतो ह्या
बाबतीत पण खूप अफवा पसरल्या आहे
National Institute of Health USA मधील तपासानुसार विषाणू साठी असणारी ideal condition मध्ये कोरोना विषाणू हा कार्ड
बोर्ड वर 24 तास, प्लॅस्टिक आणि काही मेटल वर 3 दिवस सुधा त्याचा अस्थित्व टिकवून ठेऊ शकतो (only when ideal condition is present) तापमान, आद्रता स्वचता आदी मुळे फरक पडू शकतो. (वरील संशोधन अजून प्राथमिक स्वरुपात
आहे). शरीराच्या बाहेर 10 मिनिट हा विषाणू जगू शकतो, कपड्यांवर 24 तास प्लॅस्टिक आणि काही मेटल वर 2 तासा
पासून ते 8 दिवसा पर्यन्त असतो अश्या अफवा आहेत पण शास्त्रीय दृष्ट्या असा कोणताही
पुरावा नाही की हा विषाणू कोणत्या ठिकाणी किती वेळ राहू शकतो.
आल, लसूण, हळद, मिठाचा गुळण्या, सतत पाणी पिणे, विविध औषधी वनस्पति चा काढा, विटामीन सी, Acidic PH असणारी फळे ह्या सगळ्या
पदार्थांच्या सेवनामुळे कोरोना होत नाही
हे आल, लसूण, औषधी वनस्पति या सारखा नैसर्गिक पदार्थामध्ये आधी पासूनच Anti-microbial property असतेच पण ह्या पदार्थाचा सेवण
केल्यामुळे कोरोना च प्रधुर्भाव होत नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. World Health Organization (WHO) ने अशी कोणतीही guideline ह्या पदार्थांचा बाबतीत प्रसिद्ध
केली नाही. असे Message पाठव्णाऱया व्यक्ति ना हे समजत नाही की संपूर्ण जग ह्या विषाणू मुळे लॉक डाउन
आहे. इतकं जर सोप असतं तर आज ही वेळ आली असती का !
फक्त एन-95/ एन–99 मास्क वापरणे
योग्य आहे बाकी मास्क च काही उपयोग होत नाही
Center of Dieses Control (CDC), National institute of health and Family Welfare,
New Delhi ह्या सरकारी सस्थेने काही guideline दिल्या आहेत त्या आपण पाहू
जर आपण कोरोंनाग्रस्त रुग्णाच्या
सानिध्यात असाल किवा common public मध्ये असाल, ट्रॅवल हिस्टरी असेल, isolation मध्ये असाल सफाई कामगार, डॉक्टर आदी, सरकारी यंत्रणेचा भाग असणारे सर्वांनी मास्क वापरायचे आहेत.
कोणताही 3-Layer Surgical Disposable Mask (commonly Blue colored) हा मास्क वापरणे हे योग्य आहे ह्या मुळे संसर्ग टाळू शकू. पण एकदा वापरुन
झाल्यावर हा मास्कची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे.
झाला कोरोंना की माणूस मेला
वर सगीतलेल्या सस्थेच्या च्या
अहवाला प्रमाणे फक्त 1% fatality रेट आहे म्हणजे 1% लोक ह्या आजारमुळे मृत्यु मुखी पडले आहेत. त्यामुळे घाबरून
जाऊ नका कोरोना पासून होणारा आजार बरा होऊ शकतो जरी त्याच vaccine आता उपलब्ध नसल
तरीही
उन्हाळा चालू झाला की कोरोना पुन्हा
आपल्या माहेरी चीन मध्ये जाईल. तापमान जास्त असेल, तर करोनाचा विषाणू मरतो असे बरेचसे विनोदात्मक messages येत असतात फक्त विनोदाचा भाग सोडला तर बाकी काही अर्थ नाही. तापमान ह्या
विषयवर आपण स्वतंत्र लेख लिहिला आहे पुन्हा लिहीत नाही (Read Corona Series Part 5)
तर रामायणातील धोभी प्रमाणे आचरण
करायच की सुज्ञ नागरिकाची जबाबदारी पार पाडायची हे तुमच्या हातात आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Afvach afvaah saglikade
ReplyDelete