Corona Series Part
10
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लक्षात
घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. काल आपण मध्यवर्गीय आणि लॉक डाउन ह्या बाबतीत लिहिला ते
लिहत असतानाच विचार येत होता दारिद्र रेषेच्या खाली असणार्या लोकांचं काय!
आज थोडासा विचार करू
लॉक डाउन आणि स्थलांतरित होणारी कुटुंब
नव्या नवरी चे 9 दिवस अस बोली
भाषेत म्हंटलं जात. 23 मार्च पासून लॉक डाउन सुरू
झाला आणि दारिद्र रेषेच्या खाली असणार्या लोकांच्या अस्तित्वाची लढाई अधिक अधिक
कठीण झाली. सुरवातीच्या 22 ते 26/27 मार्च पर्यन्त मोठ्या शहरकडून गावंकडे
जाण्याचं ओढा इतका नव्हता जो की काल आणि आज दिसत आहे त्याचा कारण वर सागीतलेल्या
म्हणी मधी आहे. लॉक डाउन मध्ये आपल्या हाताला काम मिळणार नाही आपला रोजचं काम
सोडून इतर काही धंदा नोकरी करता येणार नाही ह्याची जाणीव मागील 2 दिवसात
प्रकर्षाने जाणवू लागली (सुरवातीच्या काळात काही लोक गेले ते वेळेपूर्वी शहाणे
झाले) सुरवातीचे 2,4 दिवस परिस्थिति च आढाव घेण्यात आणि पोलिस, सरकारी यंत्रान चा अंदाज घेण्यात गेली कदाचित पोलिस
आणि सरकारी यंत्रान ह्या लॉक डाउन मध्ये इतकी कडक भूमिका घेतील अस काहीसं ह्या
वर्गाला वाटल नसाव पण आपल्याल ह्या मोठ्या शहरामद्धे आता पुढचे 21 दिवस काम मिळणार
नाही, काही खायला देखील मिळणार नाही हे
समजल्यावर पोत्यात बेसल तेवड साहित्य डोक्यावर घेऊन ही लोक सपूर्ण कुटुंब सोबत चालत
500 ते 1000 किलोमीटर च प्रवास करावयास निघाली आणि ज्यासाठी लॉक
डाउन करावा लागला (Mass Gathering टाळण्यासाठी) त्या यंत्रणेचा चुथडा झाला. हवडा रेल्वे
स्थानकावर किवा दिल्ली असो वा मुंबई हजारो लोक गावी जाण्याची धडपड करताना दिसतात. दिल्ली
मधुन उत्तर प्रदेश साठी १००० बस सोडण्यात आल्या, एक न्यूज पेपर च्या माहिती नुसार राजस्थान मधल्या 26 लाख
लोकसंखा असणार्या एका छोट्या शहरात काल एका दिवशी 17,800 लोक आले आहेत आणि त्यांच
स्क्रीनिंग करण्यात आल आहे. अर्थात ह्यात काय फक्त त्या
लोकांची आणि सरकारला दोष देऊन उपयोग नाही. प्रमुखाने त्याचीही काही कारणं आहेत.
1] भारतात झालेले औद्योगीकरण विषम
आहे प्रत्येक राज्यात एक सारखा औद्योगीकरण झालेल नाही सर्वात जास्ती
औद्योगीकरणामद्धे महाराष्ट्र अव्वल आहे त्यानंतर, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटका, तमिळनाडू, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, असे आहे. कश्मीर आणि नॉर्थ ईस्ट मध्ये मात्र औद्योगीकरण फारसे दिसत नाही ह्या
मुळे वर्षभर कामाचा शोधात हे लोक मोठ्या शहरात राज्यात स्थलांतरित होत राहतात.
आताच्या ह्या लॉक डाउन मध्ये पूर्णपणे बंद झालेला इन्कम सोर्स.
2] इन्कम सोर्सच बंद होणार असेल तर
गावाकडे जाण्याची ओ, ही ओढ निर्माण होणे साहजिक आहे कारणं माणूस
हा भावनिक असतो.
३] कामा निमित्या स्थलांतरचे
प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. i) Inter District 62% ii) Between two District 26% iii) Between two Stats 12% आज रस्त्यावर दिसत आहेत ते प्रामुख्याने ii) 26% आणि iii)12% मधील जनता आहे. टक्केवारी मध्ये हा आकडा मोठा वाटत जरी नसला तरी 12% म्हणजे जवळपास 14
करोड लोक होतील आणि 2011 च्या आकडेवारी नुसार जवळपास 3 करोड
लोकसख्या (labor) ही दारिद्ररेषेच्या खालील आहे. जर एवढी प्रचंड
गर्दी जर रस्त्यावर येणार असेल तर आपला लॉक डाउन २१ दिवसात संपणार आहे का आणि
मुळात तो यशस्वी होणार आहे का. त्यासाथी spice jet सारख्या काही विमानसेवा देणार्य कंपनी ने सरकार कडे
निवेदन दिले आहे की रस्त्यावर असणार्या जनतेला काही तासात आम्ही त्यांचा गावी
पोहोचवू पण ह्या वर अजून निर्णय झाला नाही.
3] देशावर आलेल हे संकटा मधली
अनिश्चितता, कारण हा लॉक डाउन किती दिवसा
चालणार आहे हे प्रशासन आता सागू शकत, प्रशासनच काय कोणीच सांगू नाही शकणार.
जर आपण लॉक डाउन ची पूर्वा कल्पना
दिली असती तर हा ताण कामी झाला असतता लोक आपल्या गावी गेली असती पण आपली इटली
सारखी अवस्था झाली असती. तिथे मीडियाने सूत्र चा माध्यमातून बातमी लिक केली आणि
लोक इन्फेकशन घेऊन सपूर्ण इटली मध्ये पसरले. २३ मार्चला लॉक डाउन झाल्या मुळे फक्त
काही % लोक (काही हजार) हे आता रस्त्यावर दिसत आहेत ह्या स्थांनातरीत होणार्या
लोकांना विनती आहे की त्यांनी स्वतहून स्वतच्या घरी Home Quarantine होण गरजेचं आहे. जेव्हा ते
एखाद्या राज्यात प्रवेश करतील तेथील सरकारी यंत्रना आता सज्ज झाली आहे त्याच
स्क्रीनिंग करून घ्यायला.
केंद्र सरकारने ह्या दारिद्ररेषेच्या
खालील लोकांसाठी 5 किलो धान्य दरमहा जादा द्यायची व्यवस्था केली आहे. तसेच राज्य सरकरांना
28,000 करोड रुपयाचा State Disaster Response Fund (SDRF Fund) वापरणायची मुभा
दिले आहे. तसेच PM- CARE ह्या नावाने वेगळा निधि उभा करण्याचे काम चालू केल आहे.
सांगायचा मुदा इतकाच आहे की आज
हातावरच पोट असणार्या व्यक्तींनी (panic), घाबरून न जाता जवळील प्रशासनाला मदत करा, संयम राखा, तुमच्या अडचणी प्रशासनाला सांगा, प्रशासनाला नियोजन करून तुमची मदत करायला वेळ द्या तोपर्यंत संयम राखा, अस रस्त्यावर येऊन तुम्ही एक तर
कोरोंना पसरवाल आणि कोरोंना मुळे नाही तर मग उपासमारी मुळे गतप्राण व्हाल.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Comments
Post a Comment