Skip to main content

Corona Series Part 86 : कोरोना आणि आयसीएमआरचे परिक्षण

Corona Series Part 86

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि आयसीएमआरचे परिक्षण

कोरोना विषाणूचे काय परिणाम होतील किती दिवस बाधा राहील असे बरेच परिक्षण वेगवेगळ्या संस्थेमार्फत होत असते. असेच परिक्षण आयसीएमआरने १४ जुन रोजी जाहीर केले यांचा अभ्यासानुसार १५ नोव्हेंबरपर्यन्त भारतामध्ये कोरोनाचा आलेख सर्वोच बिन्दु गाठेल आणि तेव्हा भारतामध्ये आयसीयू, आयसोलेशन बेड आणि वेंटीलेटरची कमतरता भासेल. २५ मार्च ते ३१ मे मध्ये कडक लॉकडाउनमुळे संक्रमण दर ६९ ते ९७% कमी झाला आहे आणि मे मध्ये येणारा सर्वोच बिन्दु १५ नोव्हेंबरपर्यन्त पुढे ढकलला गेला. जर हा सर्वोच बिन्दु मे मध्ये आला असता तर मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले असते. लॉकडाउनच्या काळात आरोग्य विभागाला कोरोनाशी सामना करण्यासाठी कही प्रमाणात वेळ मिळाला आहे. आणि त्यामुळे आरोग्य विभागाचे मनोबल वाढून एक अंदाज आला आहे. भारताच्या जीपीडीच्या ६.२% ईतकी रक्कम आरोग्य विभागामार्फत कोरोना विषाणूवर उपाय करण्यासाठी लागू शकतात. सरकारी दवाखान्यात आज २१,४९४ वेंटीलेटरची आहेत यांची संख्या वाढवण्यासाठी ६०,८८४ वेंटीलेटरची खरेदी प्रक्रिया राबबण्यात आली आहे.

मागील काही दिवस रोज जवळपास १०.००० रुग्ण संपूर्ण भारतात बाधित होत आहेत आणि आपण पहिल्या ४ बाधित देशाचा यादीत आलो आहोत. अशीच संख्या वाढू लागली तर आरोग्य विभागामार्फत केलेल्या उपाय योजना जसे आयसीयू बेड ४.५ महिन्यात, आयसोलेशन बेड ५.५ महिन्यात भरून जातील आणि वेंटीलेटर ४ महिन्यात संपून जातील.

आयसीएमआरचे हे परीक्षण ईतर संस्थे मार्फत तपासले गेले नाही आहे त्यामुळे सर्वच गोष्टी योग्य असतील असे जरी नसले तरीही आरोग्य विभागाला आजूनही बळकटी देणे गरजेचे आहे हे समजून येत आहे तसेच आरोग्य खात्यामधील कर्मचार्‍यांवर अजून अधिक तान पडणार आहे. त्यामुळे खचून न जाता अजून जोमाने काम कारावे लागणार आहे. तसेच भारातमध्ये सध्या झोन नुसार नियम आणि अनलॉकिंग सुरू झाले आहे त्यामुळे असे परीक्षण छोट्या छोट्या क्षेत्रा नुसार होणे जास्त फायद्याचे ठरेले असते.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...