Skip to main content

Corona Series Part 85 : कोरोना दिल्ली, आणि मृत्युदर

Corona Series Part 85

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना दिल्ली, आणि मृत्युदर

भाग 44 मध्ये  कोरोनाच्या मृत्युदरा बाबतीत विश्लेषण केले आहे या मध्ये जागतिक पटलावर होणार्‍या मृत्यूचे आकडे पाहिले. दिल्ली मध्ये मात्र कोरोना विषाणूमुळे नेमके किती मृत्यू होत आहे याची संख्या शोधून काढने लस शोधून काढण्यापेक्षा कठीण काम झाले आहे. जगात सगळीकडे जवळपास एकसारखेच मृत्यूची कारणे समोर येत आहेत आणि आपल्या पेक्षा छोटे मोठे देश कोरोनाशी सामना करत जगाकडून वाहवाह मिळवत आहेत परंतु आपल्या देशात मात्र सावळा गोंधळ सुरूच आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने होणारे मृतांच्या संख्या नेमकी किती आहे यामध्ये गोंधळ आहे. आता मृत नागरिकांची संख्या महत्वाची का असते कारण त्यावरून विषाणू बाबतीत माहीत होऊ शकते नेमके पुढे काय केले पाहिजे त्याचे नियोजन करता येते. दिल्ली सरकारनुसार १२७१ रुग्ण आज पर्यन्त दगावले आहेत. दिल्ली मध्ये ईस्ट, नॉर्थ सेंट्रल, साऊथ अश्या ३ महानगर पालिका आहेत यांचा नुसार मृताची संख्या वेगळी सांगितली जाते.  दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार मार्च मध्ये २ एप्रिल मध्ये ५७ मे ४१४ आणि जुन १०पर्यन्त ६१२ असे १०८५ रुग्ण दगावले आहेत परंतु तीन महानगरपालिकाच्या आकडेवारी नुसार ही संख्या २०९८ ईतकी आहे. नेमके असे का होते आहे हे पाहणे महंत्वाचे आहे. अमेरिकेमध्ये नेमका मृत्यू कश्यामुळे झाला हे तेथील तज्ञ डॉक्टरची एक टीम ठरवते जर व्यक्ति कोरोनाबाधित असेल आणि हृदयविकाराने मृत्यू झाला तर मृत्यू ची संख्या कोरोनाच्या संख्येमध्ये धरली जात नाही. ईटली मध्ये सगळे मृत्यू कोरोंनाच्या मृत्यू मध्ये धरले जातात. दिल्लीमध्ये मध्ये मृत्यूची संख्या ठरवण्यासाठी २८ एप्रिलला दिल्ली सरकार कडून डॉ अशोक कुमार, डॉ विकास डोगरा आणि डॉ आर दास  यांची त्रि सदसीय समिती नेमण्यात आली आहे. दररोज संध्याकाळी ५ वाजता रुग्णालयातील नोडल अधिकारी या समितीला संख्या कळवतो. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे ठरवण्याचा आधिकार त्या त्या रुग्णालयातील डॉक्टर आणि नोडल अधिकारी ठरवतात. रुग्णालयाला संख्या कळवण्याचे बंधन आहे जर संख्या आली नाही तर दुसर्‍या दिवशी त्याचे कारण द्यावे लागते. अशी स्टँडर्स ऑपरेटिंग प्रक्रिया आहे. असे असूनही मृत्यूच्या संखे मध्ये तफावत दिसत आहे.

नेमका घोळ ९ मे पासून सुरू झाला सरकारी आकडा ६६ असून महानगरपालिका आणि रुग्णालयातून संख्या ११६ आली. म्हणून दिल्लीचे प्रमुख सचीव विजय देव म्हणाले सरकारला मृत्युचा आकडा कळवळा जात नाही आहे. म्हणून आरोग्य सचीवा पद्मिनी सिंगला यांनी महानगरपालिकेला पत्र देऊन दहन आणि पुरलेलल्या रुग्णाची संख्या मागवण्यात आली. १६ मे रोजी ही संख्या ४२६ आली आणि १७ मे पर्यन्त सरकारी आकडा १९४ होता. याचे दोन अर्थ होटाटा एक तर सरकारला संख्या नागरिकांना कळवायची नाही किंवा महानगरपालिका कडून संख्या जास्त कळवली जात आहे. हा मुद्दा उच्च न्यायालयत गेला आणि कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला.

आज हा मुद्दा चर्चेत घेण्याचे कारण की जगभरात कोरोनाशी लढा देताना योग्य शास्त्रीय माहिती मिळवून त्याचा वर अभ्यास केला जात आहे. आणि राजधानी मध्ये संखेचा खेळ करत बसलो आहे. भारता मध्ये कोरोना येऊन संक्रमण कमी झाले तरीही विषयचे महत्व का समजत नाही. आज सपूर्ण भारत एकत्र येऊन लढा देण्याची वेळ असताना वादाचे मुद्दे बाजूला करणे महत्वाचे आहे असे झाले नाही तर येणार्‍या काळात भारत प्रथम क्रमांकाचा देश बनेल आणि कोरोनाचा आश्रय दीर्घकाळ भारतात राहील.  

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

 

 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...